- DESCRIPTION
- INDEX
दख्खनच्या सहा सुभ्यापैकी खानदेश हा एक महत्त्वाचा आणि समृद्ध सुभा होता. इ. स. 1752 साली भालकीच्या तहाने तो मराठ्यांच्या ताब्यात आला. या सुभ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सुभ्यातील प्रशासनाचे कांही पैलू हे मराठी राज्यात अस्तित्वात असलेल्या प्रशासनापेक्षा भिन्न होते. त्यावर फारुकी आणि मोगल शैलीचा प्रभाव होता. यात मराठा काळात कांही बदल झालेत काय? किंवा मराठा प्रशासन आणि येथील प्रशासनात कोणता फरक होता याबाबत आजपर्यंत कोणी संशोधन केले नाही. खानदेशच्या प्रशासनात अनेक कर्तबगार अधिकारी होवून गेलेत. कुकुरमुंढ्याचा कमाविसदार असाच एक कर्तबगार अधिकारी होता.
कुकरमुंढ्याच्या कमविसदाराला त्या भागातील रयतेची पिके भिल्लांचा उपद्रवापासून वाचविणे महत्त्वाचे होते. म्हणून तो आपल्या पत्रात पुढे पेशव्यांना लिहितो की, कंकालेकर भिल्लांचा मोड करणे हे अशक्य आहे असे नाही. पण जमा थोडी खर्च फार ऐसा प्रकार आहे. म्हणून कंकालेकाराशी करार केला. अशी बुद्धिचातुर्य वापरणारी अधिकारी मंडळी या सुभ्यात होवून गेली. ती प्रथम अप्रकाशित पेशवे दप्तरातून या ग्रंथाद्वारे उजेडात येत आहे.
खानदेशमधील शहरे, उद्योगधंदे, सावकारी व्यवसाय, ग्राम वतनदार, वस्तूंच्या किंमती, कृषी जीवन, चलन व्यवस्था आणि येथील सांस्कृतिक जीवन यांचा अप्रकाशित मौलिक साधनांच्या सहाय्याने आढावा घेत हा ग्रंथ वाचकांच्या हाती सोपवीत आहे. तो मराठ्यांच्या इतिहासात नक्कीच भर टाकणारा आहे. या आत्मविश्वासाने हा ग्रंथ आपल्या हाती सुपुर्द करीत आहे.
Madhyaugin Khandesh
- राजकीय, भौगोलिक जीवन व अभ्यासाची साधने : खानदेश नावाची व्युत्पत्ती – पेशवेकाळातील खानदेश सुभा – अभ्यासाची व्याप्ती – खानदेशचा राजकीय इतिहास – अभ्यासाची साधने
- सुभा प्रशासन : सुभ्यातील महत्त्वाचे अधिकारी – 1) सरसुभा-कामे-वेतन – कार्यालय – सरसुभ्यावर पेशव्यांचे नियंत्रण, 2) मामलेदार – वेतन व भत्ते – कार्यालयातील अधिकारी व त्यांचे पगार
- ग्रामजीवन व प्रशासन : मौजे धील वतनदार – (अ) पाटील – पाटलाची कामे – पाटीलकीच्या वतनाची खरेदी – विक्री – पाटलाला मिळणारे हक्क – दस्तुर – अ) मानपान, ब) नक्त, क) गला, ड) सेवा
- खानदेशमधील कृषी व्यवसाय : शेतकरी आणि त्याच्या शेतीविषयक गरजा – शेतकर्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्याने केलेले प्रयत्न – शेती परिस्थितीचे प्रातिनिधिक उदाहरण (मौजे भवाली)
- जमीन महसूल : जमिनीची मोजणी – जमीन मोजणी पथक – जमीन मोजणीबद्दल तक्रार – जमिनीचे वर्गीकरण – (1) लागवडीखाली असलेली जमीन – अ) अव्वल ब) दू क) सीम
- विविध कर किंवा पट्ट्या : 1) पांढरपट्टी 2) कर्जपट्टी किंवा जास्तीपट्टी 3) पेशकशी 4) दिवाण दस्तुरी 5) लग्नटका किंवा पाटदाम 6) राबणूक 7) हवालदारी 8) बाभुळपट्टी 9) मिरासपट्टी 10) फुरोई
- खानदेशमधील सावकारी व्यवसाय : कर्ज घेण्याचा उद्देश – कर्जाची मुदत – कर्जाची फेड – कर्ज वसुलीच्या चौथाईबाबत – देशपांडे यांची कर्ज वसूल करून देण्याबाबत पेशव्यांना विनंती –
- खानदेशमधील उद्योगधंदे व व्यापार : खानदेशमधील विविध व्यवसाय – 1) कापड व्यवसाय 2) घोंगड्या विणण्याचा व्यवसाय 3) साखर आणि गूळ व्यवसाय 4) तेल व्यवसाय 5) पादत्राणे तयार करणे
- खानदेशमधील चलन : नाण्यांवर समान चिन्हांचा अभाव – टाकसाळ – टाकसाळीत लागणार्या वस्तू – टाकसाळीतील कामगार – नाणी पाडण्याची क्रिया – नाणे पाडण्याबद्दल घेतली जाणारी मजुरी
- खानदेशमधील सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचे काही पैलू : खानदेशमधील सण व उत्सव – 1) दीपावली 2) विजयादशमी (दसरा) 3) गुढीपाडवा 4) होळीचा सण 5) मकरसंक्रांत 6) तुळशीचे लग्न
- उपसंहार : नंदुरबार येथील जनतेला उपद्रव- सुभा प्रशासनातील दोष- शेतीस पाणीपुरवठा- उजाड महालाची कमाविशी- जमीन मोजणे आवश्यक होते- जमीन महसुलातील भिन्नता- सावकारांना होणारा उपद्रव