मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1000 ते 1857)
History of Medieval India (AD 1000 to 1857)
Authors:
ISBN:
₹750.00
- DESCRIPTION
- INDEX
इ.स. 1206 पासून इ.स. 1757 पर्यंतचा भारताचा कालखंड हा मध्ययुग समजला जातो. अरब मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणाच्यावेळी भारतात विभिन्न राज्ये होती. त्यांच्यात राजकीय एकतेचा अभाव होता. या काळात मुसलमान आक्रमक इस्लाम धर्माचा झेंडा हातात घेऊन आपल्या सैन्यानिशी भारताच्या सरहद्दीवर येऊन धडकले. मुहम्मद बिन कासिम, महंमद गझनी, कुतुबुद्दीन ऐबक, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक या आक्रमकांनी अनेक आक्रमणे करून संपत्तीची लूट केली. तुघलक साम्राज्याच्या विघटनातून दक्षिणेत बहमनी व विजयनगर साम्राज्याचा उदय झाला. इ.स. 1526 साली बाबर यांनी भारतावर आक्रमण करून दिल्ली सल्तनतचा शेवट केल्याने मुघल सत्तेचा ध्वज फडकू लागला. भारतात इस्लामी सत्ता स्थापन होण्यापूर्वी भारतीय कलेचा विकास झालेला होता. मध्ययुगात होऊन गेलेल्या अनेक साधुसंतांनी आपल्या काव्याद्वारे जनतेला उपदेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेविरुद्ध संघर्ष करुन मराठा सत्तेची स्थापना केली. तद्नंतर छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी अमूल्य योगदान देवून मुघल सत्ता खिळखिळी केली. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये महाराजा रणजितसिंह यांनी मुघलांना प्रखर विरोध करून स्वतंत्र शीख सत्तेची पायाभरणी केली. तद्नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कटकारस्थाने करून भारतात सत्ता स्थापन केली. प्रस्तुत ग्रंथात दिल्ली सल्तनत आणि मुघल काळातील राजकीय इतिहास, सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती, प्रशासन, कला, वास्तुकला व स्थापत्य कलेची सविस्तर माहिती दिली आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.
Madhyayugin Bharatacha Itihas
- इतिहासाची साधने : पुरातत्वीय साधने – 1. उत्खननातील अवशेष 2. वस्त्रे 3. अलंकार 4. शस्त्रास्त्रे व अवजारे 5. नकाशे 6. चित्रे 7. राजवाडे 8. किल्ले 9. इमारती 10. बाग व बगीचे
- अरबांची भारतावर आक्रमणे : राजकीय स्थिती, राज्यव्यवस्था, आर्थिक स्थिती, व्यापार, वाणिज्य व उद्योगधंदे, सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती; अरब आक्रमणापूर्वीचा सिंध – प्रारंभिक आक्रमण
- तुर्कांची भारतावर आक्रमणे : मुहम्मद गझनी यांचा उदय, महमुद गझनी यांच्या हिंदुस्थानावरील स्वार्या, दक्षिण भारतातील राज्ये, महमुद घोरींची भारतावरील आक्रमणे, मध्य भारत काबीज
- दिल्ली सुलतानशाही : गुलाम वंश (इ.स. 1206 – इ.स. 1290) – अ) स्थापना व दृढीकरण – 1) कुतुबुद्दीन ऐबक – कुतुबुद्दीन ऐबक यांचे पूर्वचरित्र (इ.स. 1206 – इ.स. 1211), राज्यप्राप्ती
- सल्तनतकालीन प्रशासन : केंद्रीय प्रशासन – 1) सुलतान 2) मजलिस-ए-खलवत 3) मंत्रिमंडळ; प्रांतीय प्रशासन, सुभेदार, परगणा प्रशासन, ग्राम प्रशासन, कर व्यवस्था, लष्करी व्यवस्था, गुप्तहेर व्यवस्था
- सल्तनतकालीन समाज व संस्कृती : सामाजिक परिस्थिती – 1) हिंदू समाज 2) मुस्लिम समाजावर हिंदू धर्माचा प्रभाव 3) मुस्लिम समाज 4) हिंदू समाजाची स्थिती 5) जातीप्रथा 6) गुलामगिरीची प्रथा
- सल्तनतकालीन कला, वास्तुकला व साहित्य : वास्तूकला – 1. कुतुबमिनार 2. ढाई दिन का झोपडा 3. रायपिथौरा किल्ला 4. अल्तमश यांची कबर 5. नासिरूद्दिन महमुद यांची कबर 6. बल्बन यांची कबर
- विजयनगर साम्राज्य : विजयनगर साम्राज्याची स्थापना (1336); हरिहर (इ.स. 1336-इ.स. 1353), बुक्क (इ.स. 1353 ते इ.स. 1379), हरिहर व्दितीय (इ.स. 1379-इ.स. 1404)
- बहमनी राज्य : अल्लाउद्दीन हसन बहमनी (इ.स. 1347 ते इ.स. 1358), मुहम्मदशाह पहिले (इ.स. 1358-इ.स. 1373), मुजाहिदशाह (इ. स.1373 ते इ.स. 1377), मुहम्मदशाह दुसरे
- जहिरूद्दीन मोहम्मद बाबर : जन्म व बालपण (इ.स. 1483-इ.स. 1494), फरगणा प्रांताचे राजे (इ.स. 1494-इ.स. 1504), काबुलचे राजे (इ.स. 1504-इ.स. 1525), बाबर यांची युध्दप्रणाली
- सम्राट हुमायून : राज्यारोहण (30 डिसंबर 1530), सम्राट हुमायून यांच्या अडचणी – अ) अंतगर्त अडचणी ब) बाह्य अडचणी; सम्राट हुमायून यांची कामगिरी, सम्राट हुमायून व शेरशहांचा संघर्ष
- शेरशहा सुरी : शेरशहांचे प्रारंभिक विजय, सम्राट शेरशहा सूरी यांची कामगिरी, शेरशहांचा साम्राज्यविस्तार; शेरशहांचे प्रशासन – 1. केंद्रीय राज्यव्यवस्था 2. प्रांतीय शासन व्यवस्था 3. सरकार (जिल्हा प्रशासन)
- सम्राट जहिरूद्दीन महंमद अकबर : राज्यारोहण, सम्राट अकबर यांच्यापुढील समस्या, सम्राट अकबर यांचा समस्यांवर विजय, पानिपतचे दुसरे युद्ध (इ.स. 1556), सम्राट अकबर यांच्या विजयाची कारणे
- सम्राट जहांगीर : सलीम यांचे बंड, सम्राट जहांगीर यांच्या बारा आज्ञा, राजपूत विद्रोह (एप्रिल 1606), सम्राट जहांगीर यांचा साम्राज्य विस्तार; नूरजहाँ, नूरजहाँची कारकीर्द (इ.स. 1611-इ.स. 1627)
- सम्राट अबुल मुजफ्फर शहाबुद्दीन मुहम्मद शहाजहान : सम्राट शहाजहान यांचा राज्याभिषेक (इ.स.1628), सम्राट शहाजहान यांच्या शासन काळातील महत्वाच्या घटना, सम्राट शहाजहान यांचे दक्षिण धोरण