मध्ययुगीन भारत (इ.स. 1206 - 1707)
Medieval Indian (1206 A.D. - 1707 A.D.)
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. उत्तर भारतात महंमद तुघलकाचे आसन डळमळू लागले होते. या संधीचा फायदा घेऊन हरिहरने इ.स. 1336 मध्ये स्वतंत्र हिंदू राज्यांची स्थापना केली. विजयनगर येथे संगम वंश, शाल्व वंश, तुल्ववंश व अरविंद वंश असे चार घराण्यांनी सुमारे पाऊणेतीनशे वर्ष राज्य केले. तालिकोटच्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याचा विनाश झाला. पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले त्याच बरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट करून मोगल साम्राज्याची उभारणी केली. मोगल घराण्यात बाबर, हुमायून, अकबर, जहांगिर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले.
प्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन व मोगलकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चितच उपयोगी सिद्ध होईल.
Madhyayagin Bharat (1206-1707)
- दिल्ली सुलतानशाहीची स्थापना : (अ) दिल्ली सुलतानशाही काळातील ऐतिहासिक साधने : सुलतानशाहीकालीन पुरातत्वीय साधने, सुलतानशाहीकालीन वाङ्मयीन साधने, सुलतानशाहीकालीन परकीय प्रवाशांचे वृत्तांत, सुलतानशाहीकालीन नाणकशास्र
(ब) महंमद घोरीचे आक्रमण (1175-1206) : महंमद घोरीच्या भारतावरील स्वार्या, घोरीचा प्रतिनिधी म्हणून कुतुबुद्दीनची कामगिरी (इ.स. 1192-1206), महंमद घोरीचा मृत्यू, महंमद घोरीची योग्यता, महंमद घोरीच्या विजयाची व भारतीय सत्तांच्या पराभवाची कारणे, तुर्की विजयाचा भारतावरील परिणाम (क) दिल्ली सुलतानशाहीचा संस्थापक – कुतुबुद्दीन ऐबक (1206-1210) : कुतुबुद्दीनचे राज्यारोहण (24 जून 1206), कुतुबुद्दीन ऐबकच्या मोहीमा, कुतुबुद्दीन ऐबकची योग्यता - प्रारंभीचे दिल्लीचे सुलतान व त्यांचे योगदान : (अ) शम्सुद्दीन अल्तमश (1211 ते 1236) : दिल्ली सुलतानशाहीचा खरा संस्थापक, शम्सुद्दीन अल्तमशची कामगिरी, अल्तमशची योग्यता, (ब) रझिया सुलतान (1236-1240) : रुकनुद्दिन फिरोजविरुध्द बंडे, रझियाची कामगिरी, रझियाविरुद्ध कारस्थान, रझियाची अप्रियता, रझियाची योग्यता, (क) घियासुद्दीन बल्बन (1266-1286) : बल्बनचे पूर्वजीवन, बल्बनची राज्यव्यवस्था, बल्बनची योग्यता
- दिल्ली सुलतानशाहीचा साम्राज्यविस्तार : (अ) अल्लाउद्दीन खिलजी – साम्राज्यविस्तार (1296-1316) : अल्लाउद्दीनच्या प्रारंभिक अडचणी, अल्लाउद्दीनचा उत्तर भारतातील साम्राज्यविस्तार, अल्लाउद्दीनचे दक्षिण भारतातील धोरण, अल्लाउद्दीनचे मंगोल धोरण, अल्लाउद्दीनची योग्यता, अल्लाउद्दीन खिलजीच्या प्रशासकीय सुधारणा, महसूल सुधारणा, लष्करी सुधारणा, न्यायव्यवस्था, हिंदू सरंजामदारांप्रती धोरण, आर्थिक नियंत्रण (ब) महंमद बिन तुघलक – निरनिराळे प्रयोग : (1) महंमद बिन तुघलक (1325-1351) – महंमद तुघलकाचे निरनिराळे प्रयोग, महंमद तुघलकाचे प्रयोग अयशस्वी होण्याची कारणे, महंमदाची योग्यता (2) फिरोझ तुघलक (इ.स. 1351-1388) – फिरोझ तुघलकाची कामगिरी, फिरोझशहाची योग्यता, तैमूरलंगाची भारतावर स्वारी (1398-1399) (क) सय्यद आणि लोदी घराणे – सुलतानशाहीचे पतन : (1) सय्यद घराणे (1414-1450) (2) लोदी घराणे (1451 ते 1526) – बहलोल लोदी (1451 ते 1489), सिंकदर लोदी (1489-1517), इब्राहिम लोदी (1517-1526); दिल्ली सुलतानशाहीच्या पतनाची कारणे
- विजयनगर व बहामनी साम्राज्य : (अ) विजयनगर साम्राज्याचा उदय – हरिहर, बुक्क, कृष्णदेवराय : हरिहर (1336-1353), बुक्क पहिला (1353-1379), हरिहर दुसरा (1379-1404), देवराय दुसरा (1419-1446), कृष्णदेवराय (1509-1530), अच्युतराव (1530-1542); तालिकोटची लढाई (1565), (ब) बहामनी साम्राज्याचा उदय आणि विस्तार : हसनची राजवट (1347-1358), महंमद शाह पहिला (1358-1375), फिरोजशहा (1397-1422), अहमद शाह (1422-1435), अल्लाउद्दीन दुसरा (1435-1457), हुमायून (1457 ते 1461), महंमदशाह तिसरा (1463-1482); महंमद गवाणचे योगदान, (क) बहामनी साम्राज्याचे विघटन : बहामनी साम्राज्याची पाच शकले, बहामनी साम्राज्याच्या पतनाची कारणे
- मोगल साम्राज्याची स्थापना : (अ) मोगल कालखंडातील ऐतिहासिक साधने : मोगलकालीन पुरातत्वीय साधने, मोगलकालीन वाङ्मयीन साधने, मोगलकालीन परकीय प्रवाशांचे वृत्तांत, मोगलकालीन नाणकशास्र, (ब) बाबर – मोगल साम्राज्याचा संस्थापक (1526-1530) : पानिपतची पहिली लढाई (21 एप्रिल 1526), खानुवाची लढाई (16 मार्च 1527), घाघराचे युध्द (6 मे 1529), (क) हुमायून-शेरशहा सूरी संघर्ष, शेरशहा सूरीच्या प्रशासकीय सुधारणा : हुमायून व शेरशहा संघर्ष (इ.स. 1532-1540), शेरशहा सूरीच्या सुधारणा (1540-1545), शेरशहाचा साम्राज्यविस्तार, शेरशहाची राज्यव्यवस्था, इतर सुधारणा, शेरशहा सुरीच्या प्रशासकीय सुधारणा, केंद्रीय प्रशासन व्यवस्था, प्रांतीय प्रशासन व्यवस्था, ग्राम प्रशासन, जमीन महसूल व्यवस्था, शेतसाराची पध्दत, शेतकर्यांचे हितसंवर्धन, जमीन महसूल व्यवस्थेतील दोष, शेरशहाचे लष्करी प्रशासन, शेरशहाची न्यायव्यवस्था
- मोगल साम्राज्याचे मजबुतीकरण : (अ) अकबर – मोगल साम्राज्याचा विस्तार, मनसबदारी, धार्मिक धोरण : राज्यारोहणसमयी भारताची राजकीय परिस्थिती, पानिपतची दुसरी लढाई (5 नोव्हेंबर 1556), अकबराचा साम्राज्यविस्तार, अकबराचे धार्मिक धोरण, अकबराचे राजपूत धोरण, अकबराचा दीने-इलाही धर्म, दीने-इलाहीची प्रमुख तत्वे, अकबराची मनसबदारी पध्दत, मनसबदारांची श्रेणी, मनसबदारांची नेमणूका, मनसबदारांचे वेतना, चेहरा व डाग पध्दत (ब) जहांगीर व शहाजहान – साम्राज्यविस्तार, दक्षिण धोरण : (1) जहांगीर (1605-1628) – राजपुत्र खुसरोचे बंड (इ.स. 160), जहांगीरचे विजय व विस्तार, सम्राज्ञी नूरजहानचा कारभार, जहांगीरची योग्यता (2) शहाजहान (इ.स. 1628 ते 1658) – शहाजहानच्या राज्यकारभारातील टप्पे, वारसा हक्काचे युध्द (इ.स. 1657-1658), शहाजहाचे युग मध्ययुगीन भारतातील सुवर्ण युग (क) औरंगजेब – राजपूत धोरण, अहोम संघर्ष, शीख धोरण, दक्षिण धोरण : औरंगजेबाचा साम्राज्यविस्तार, औरंगजेबाचे धार्मिक धोरण, औरंगजेबाचे राजपूताविषयक धोरण, औरंगजेबाचे दक्षिण भारत धोरण, मोगल साम्राज्याच्या पतनाची कारणे
- प्रशासकीय व्यवस्था : (अ) केंद्रीय व प्रांतीय प्रशासन : मोगलकालीन केंद्रीय प्रशासन – सम्राट, मंत्रीमंडळ, मोगलकालीन प्रांतीय प्रशासन, मोगलकालीन लष्करी प्रशासन, लष्कर व्यवस्था (ब) महसूल व्यवस्था : मोगलकालीन जमीन महसूल पध्दत, मोगलकालीन प्रचलित काही महसूल पध्दती – गल्ला बक्षी पध्दत, हस्त-ओ-बूद पध्दत, कानकूट पध्दत, नसक पध्दत, पेरणी क्षमता व नांगर पध्दत, इब्त पध्दत; मोगलकालीन जमीन महसूल पध्दतीची वैशिष्टये (क) न्याय व्यवस्था व सैन्य प्रशासन : मोगलकालीन न्यायव्यवस्था – धार्मिक विधिनियमांची न्यायालये, सामान्य विधिनियमांची न्यायालये, राजकीय अधियोगांची न्यायालये; इस्लामी कायद्याने मान्यता दिलेले गुन्हे; मोगलकालीन शिक्षेचे प्रकार – हद्द, तझीर, किसास, तशहीर, राष्ट्रद्रोहाची शिक्षा, मोगल सम्राटांचे गुन्हे संबंधी बदल
- अर्थव्यवस्था, समाज आणि संस्कृती : (अ) अर्थव्यवस्था – कृषी, व्यापार व उद्योगधंदे : मोगलकालीन कृषी व्यवस्था, मोगलकालीन व्यापार, वहातूक व दळणवळणाची साधने, व्यापारी केंद्रे, व्यापारी जमाती, परराष्ट्रीय व्यापार, मोगल कालखंडातील बंदरे, खुष्कीचा मार्ग, मोगलकालीन उद्योगधंदे (ब) समाज – वर्णव्यवस्था, महिलांचे स्थान, भक्ती व सूफी चळवळ : मोगलकालीन सामाजिक जीवन, हिंदू समाजातील वर्ण व्यवस्था, वेशभूषा, अंलकार व शृंगार, आहार पद्धती, सण-उत्सव व यात्रा, मुस्लीम समाजातील कुटुंब, गुलामगिरी, मनोरंजनाची साधने; मोगलकालीन स्रियांची स्थिती – बहुपत्नीत्वाची चाल, पडदा पध्दत, सामाजिक दर्जा, स्रीशिक्षण, राजकारणात सहभाग; हिंदू स्रियांची स्थिती – बालविवाह पध्दत, बहुपत्नीत्वाची चाल, विधवा स्रियांची परिस्थिती, सती व जोहार पध्दत, स्री-शिक्षण व शिक्षणातील अडथळे, वेश्या व्यवसाय; भक्ती चळवळ : महानुभव, वारकरी, सुफी पंथ; भक्ती मार्ग चळवळीतील प्रमुख संत, महानुभाव पंथ, महानुभाव पंथाचे कार्य, वारकरी संप्रदाय व संप्रदायाचे कार्य, सुफी पंथ व कार्ये, भारतातील सुफी संप्रदाय, भारतातील प्रमुख सुफी संत (क) संस्कृती – कला आणि स्थापत्य : बाबरच्या काळातील कला व स्थापत्य, हुमायूनच्या काळातील कला व स्थापत्य, शेरशहाच्या काळातील कला व स्थापत्य, अकबराच्या काळातील कला व स्थापत्य, जहांगिरच्या काळातील कला व स्थापत्य, शहाजहानच्या काळातील कला व स्थापत्य, औरंगजेबाच्या काळातील कला व स्थापत्य