मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल इतिहास
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा कालखंड प्रारंभापासून ते मराठी सत्तेच्या अखेरपर्यंत आहे. या सहा-साडेसहा शतकांमध्ये सुरुवातीला तेराव्या शतकात महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती. नंतर बहामनी सत्ता, शिवकाळ, पेशवाई अशा सत्ता बदलत गेल्या. या सत्तांबरोबरच तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक वातावरण बदलत गेले. या बदलांचे प्रतिबिंब त्या-त्या काळच्या वाङ्मयात पडले. यादवकाळ, बहामनीकाळ, शिवकाळ व पेशवेकाळ या राजकीय कालखंडांची सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी येथे विस्ताराने सांगितली आहे. या चारही कालखंडातील महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय व इतर संप्रदायातील वाङ्मय व महत्त्वाचे ग्रंथकार यांचा येथे निर्देश केलेला आहे. त्याचप्रमाणे पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय, बखर वाङ्मय व गद्य वाङ्मय या मध्ययुगीन वाङ्मयप्रवाहांचीही सविस्तर चर्चा केली आहे. ग्रंथकारांच्या चरित्राचा धावता आढावा घेऊन साहित्यकृतींच्या विवेचनाला महत्त्व दिले आहे. यादृष्टीने हे लेखन महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.
Madhyayugin Marathi Vadmayacha Sthul Itihas
- वाङ्मयेतिहास संकल्पना आणि मराठी भाषा, वाङ्मयाचा उगम : 1.1 वाङ्मयेतिहास : संकल्पना आणि स्वरूप, 1.1.1 वाङ्मयेतिहासाची संकल्पना, 1.1.2 वाङ्मयेतिहासाचे स्वरूप, 1.1.3 वाङ्मयेतिहास लेखनाचे प्रकार, 1.2 मराठी वाङ्मयेतिहासाचे कालखंड : स्वरूप चर्चा, 1.2.1 कालखंडाची निश्चिती, 1.2.2 मराठी वाङ्मयेतिहासाचे कालखंड, 1.3 मराठी भाषा व वाङ्मयाचा उगम.
- यादव काळ व बहामनी काळातील वाङ्मयनिर्मिती (भाग 1) : 2.1 यादवकालीन सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी, 2.1.1 यादवकालीन सामाजिक पार्श्वभूमी, 2.1.2 यादवकालीन सांस्कृतिक पार्श्वभूमी, 2.2 बहामनीकालीन सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी, 2.2.1 बहामनीकालीन सामाजिक पार्श्वभूमी, 2.2.2 बहामनीकालीन सांस्कृतिक पार्श्वभूमी, 2.3 महानुभाव वाङ्मय : प्रेरणा, प्रवृत्ती आणि स्वरूप, 2.4 महानुभाव वाङ्मय, 2.4.1 महानुभाव गद्य ग्रंथ: लीळाचरित्र, स्मृतिस्थळ, दृष्टान्तपाठ, 2.4.2 महानुभाव पद्य ग्रंथः महदंबेचे धवळे, साती ग्रंथ.
- यादव काळ व बहामनी काळातील वाङ्मयनिर्मिती (भाग 2) : 3.1 वारकरी वाङ्मय : प्रेरणा, प्रवृत्ती व स्वरूप, 3.1.1 संत ज्ञानेश्वर, 3.1.2 संत नामदेव, 3.1.3 संतमेळा, 3.1.4 संत एकनाथ, 3.1.5 शेख महंमद, 3.2 इतर संप्रदायांतील वाङ्मयनिर्मिती, 3.2.1 मुकुंदराज, 3.2.2 नृसिंहसरस्वती, 3.2.3 दासोपंत, 3.2.4 फादर स्टीफन्स, 3.2.5 ब्रम्हगुणदास.
- शिवकाल आणि पेशवेकाळातील वाङ्मयनिर्मिती : 4.1 शिवकालीन सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी, 4.1.1 शिवकालीन सामाजिक पार्श्वभूमी, 4.1.2 शिवकालीन सांस्कृतिक पार्श्वभूमी, 4.2 पेशवेकालीन सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी, 4.2.1 पेशवेकालीन सामाजिक पार्श्वभूमी, 4.2.2 पेशवेकालीन सांस्कृतिक पार्श्वभूमी, 4.3 संत तुकाराम, 4.4 संत रामदास.
- पंडित आणि शाहिरांची वाङ्मयनिर्मिती : 5.1 पंडिती वाङ्मय : स्वरूप, प्रेरणा, प्रवृत्ती आणि वैशिष्ट्ये, 5.1.1 मुक्तेश्वर, 5.1.2 वामन पंडित, 5.1.3 रघुनाथ पंडित, 5.1.4 मोरोपंत, 5.2 शाहिरी वाङ्मय : स्वरूप, प्रेरणा, प्रवृत्ती आणि वैशिष्ट्ये, 5.2.1 अनंत फंदी, 5.2.1 परशराम, 5.2.2 राम जोशी, 5.2.3 प्रभाकर, 5.2.4 होनाजी बाळा.
- बखर आणि गद्य वाङ्मयनिर्मिती : 6.1 बखर वाङ्मय : स्वरूप, प्रेरणा, प्रवृत्ती आणि वैशिष्ट्ये, 6.2 बखर वाङ्मय, 6.2.1 सभासदाची बखर, 6.2.2 शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र, 6.2.3 शिवदिग्विजय, 6.2.4 पानिपतची बखर, 6.2.5 भाऊसाहेबांची बखर, 6.3 गद्य वाङ्मय, 6.3.1 आज्ञापत्र.