मराठी कथेची वाटचाल
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
आलेला अनुभव सांगणे, कथन करणे ही मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. सांगणे आणि ऐकणे ही त्याची सहजप्रवृत्ती आहे त्यातूनच त्याच्या सांस्कृतिक जडणघडणीच्या काळापासून गोष्ट जन्माला आली. मानवी जीवन गतीशील व परिवर्तनशील असल्याने त्याच्या बदलत्या जीवनमूल्यांबरोबर त्याच्या साहित्यादि कलेच्या निर्मितीत व स्वरूपात बदल होत गेलेले आहे, कथा साहित्याच्या बाबतीतही तेच पाहायला मिळते. म्हणून संस्कृत कथा, लोककथा यांच्या मौखिक परंपरेपासून सुरू झालेली कथा बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार अबाधितपणे वाटचाल करीत राहिली.
आधुनिक काळात शिक्षण व मुद्रणाची माध्यम आलीत. साहित्य प्रसाराची साधने म्हणून नियतकालीके नंतर प्रकाशन संस्था सुरू झालीत. स्वतंत्र मराठी साहित्याच्या निर्मितीला बहर येत गेला. त्यात कथा साहित्याने फार मोठी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. प्रत्येक पिढीत कथाकारांचे त्यात लक्षवेधी योगदान आहे. बहुजन समाजातील कथाकारांनी विशिष्ट विचारधारा म्हणून कथेचा प्रवाह अधिक प्रवाही व खळाळता ठेवलेला आहे. आजतागायत मराठी कथा नवनवे रुप घेऊन वाचकांसमोर येतच आहे. अशा कथा साहित्याच्या उगमापासून तर आजपर्यंतचा प्रवास कसा होत गेला, हे ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या डॉ. शकुंतला भारंबे-फेगडे यांनी मराठी कथेची वाटचाल म्हणून या समीक्षा ग्रंथात सांगितला आहे. त्याचा साहित्याचे विद्यार्थी व संशोधक अभ्यासक यांना संदर्भ साधन म्हणून उपयोग होईल यात शंकाच नाही.
– डॉ. मनोहर सुरवाडे
Marathi Kathechi Vatchal
1) मराठी कथा : उगम आणि वाटचाल
2) ग्रामीण कथा : उगम आणि विकास
3) साठोत्तरी कथाप्रवाह
4) साठोत्तरी ग्रामीण कथा
5) सारांश