Prashant Publications

My Account

मराठी लेखिकांची ग्रामीण कथा स्वरुप व समीक्षा

Authors: 

ISBN:

SKU: 9789395227537
Marathi Title: Marathi Lekhikanchi Gramin Katha : Swarup va Samiksha
Book Language: Marathi
Published Years: 2023
Pages: 164
Edition: First
Category:

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

‌‘मराठी लेखिकांची ग्रामीण कथा : स्वरुप व समीक्षा’ हा डॉ. शकुंतला भारंबे-फेगडे यांचा पीएच.डी. प्रबंध आणि त्याविषयीच्या संदर्भ साधनांचा पुन्हा नव्याने चिकित्सक मांडणी करणारा समीक्षा ग्रंथ आहे. स्वयंसिद्ध, कल्पक व प्रतिभावान मराठी स्त्रियांच्या कथात्म कलाकृतींचा एक अभ्यासक स्त्रीने घेतलेला हा आस्वाद स्वरूप धांडोळा अनेकार्थाने महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक काळात भारतीय स्त्री जीवनात स्थित्यंतरे होत गेले. आधुनिक स्त्री पुरुषप्रधान समाज व्यवस्थेच्या दास्यातून मुक्त होऊन मोकळा श्वास तिला घेता आला. तेव्हा तिने अंगभूत प्रतिमा गुणांना विकसित करण्याची धडपड केली. साहित्यिक गुण दाखवून आणि यश प्राप्त करून तिने साहित्याच्या क्षेत्राला स्वतःची ओळख निर्माण केली. कथा-कहाण्यांच्या मौखिक परंपरेपासून तर आधुनिक लघुकथा, नवकथा आणि साठोत्तरी कथाप्रवाह या कथा साहित्याच्या प्रत्येक वळणावर स्त्रियांनी त्यांचा सहभाग नोंदविलेला आहे.
साठोत्तरी कालखंडात ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन, विज्ञान आणि बालसाहित्य अशा विविध संज्ञा व विचार धारांच्या अनुषंगाने मराठी साहित्याचे प्रवाह खळखळत पुढे आले. त्यातही लेखिकांनी जमेल तसे नव्हे, तर लक्ष वेधून घेणारे साहित्य निर्माण केलेले आहे. त्यापैकीच ग्रामीण साहित्यप्रवाहातील कथा साहित्याची निर्मितीही मराठी लेखिकांनी केलेली आहे. त्याचा शोध घेऊन डॉ. शकुंतला भारंबे-फेगडे यांनी केवळ प्रबंधच तयार केला नाही, तर त्याशिवाय साक्षेपी समीक्षा देखील केलेली आहे. त्यातूनच प्रस्तुत ग्रंथ आकारास आलेला असून समीक्षेच्या क्षेत्रात त्याचे मोल खूपच आहे. कारण त्यांनी बदलते भारतीय स्त्रीजीवन, मराठी लेखिकांच्या कथांची वाटचाल, लेखिकांच्या ग्रामीण कथांच्या प्रेरणा, त्यांचे स्वरूप, त्यातील ग्रामीण अनुभवविश्व, वातावरण, खेड्यातील माणसे, ग्रामीण भाषा यांसह लोकजीवन व लोकसंस्कृती या विषयीचे विश्लेषण त्यांनी केलेले आहे. त्यामुळे हा ग्रंथ एक संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासनीय झालेला आहे. तितकाच वाचनीयदेखील आहे. रसिक, वाचक व अभ्यासक त्याचे स्वागत करतील यात शंकाच नाही.

Marathi Lekhikanchi Gramin Katha : Swarup va Samiksha

(1) भारतीय स्त्रीजीवन
(2) मराठी लेखिकांचे कथालेखन
(3) मराठी लेखिकांची ग्रामीण कथा : प्रेरणा व स्वरूप
(4) मराठी लेखिकांच्या कथांतील ग्रामीण अनुभववेिश
(5) मराठी लेखिकांच्या ग्रामीण कथांतील व्यक्तिरेखा
(6) मराठी लेखिकांच्या ग्रामीण कथांची भाषाशैली

RELATED PRODUCTS
You're viewing: मराठी लेखिकांची ग्रामीण कथा स्वरुप व समीक्षा 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close