मराठी वाङ्मय प्रकारांची सैद्धांतिक रचना व अध्यापन पद्धती
Authors:
ISBN:
₹495.00
Out of stock
- DESCRIPTION
- INDEX
आशयाच्या मांडणी तंत्रानुसार वाङ्मय प्रकारांचे वर्गीकरण केले जाते. तेच आज सर्वमान्य आहे. संस्कृत पंडितांनी मात्र मांडणी तंत्रापेक्षा ‘आशयाची भव्यता’ लक्षात घेऊन वाङ्मयाचे वर्गीकरण केले. उत्तमोत्तम, उत्तम, मध्यम आणि अधम काव्यप्रकारात जगन्नाथ पंडिताने वर्गीकरण केले. आनंदवर्धनाने ‘ध्वनितत्त्व असलेले, सुचक’ काव्य उत्तम असल्याचे सूचित केले. आधुनिक काळात ही तत्त्वे स्वीकारली जात नाही. पाश्चिमात्यांनी इंग्रजी साहित्यांत स्वीकारलेल्या तंत्रांचा आधार घेऊन वाङ्मयप्रकारांचा स्वीकार केला जातो. प्रा. अ. बा. मंचरकरांनी साहित्य प्रकारांची स्वरुप वैशिष्ट्ये सूचित करतांना कथनात्मकता – नाट्यात्मकता आणि काव्यात्मकता या तीन मूळधर्मांचा आधार घेऊन वाङ्मय प्रकारातील वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न केला. त्याद्वारे प्रत्येक साहित्य प्रकारांच्या संकल्पनेतील विविधता लक्षात घेता येते.
Marathi Wadamya Prakaranchi Saiddhantik Rachana V Adhyapan Paddhati
- कवितेची निर्मिती : काही विचार – प्रा.डॉ. प्रभाकर रामचंद्र पवार
- कविता : संकल्पना व स्वरुप – प्रा. सखाराम बाबाराव कदम
- ‘कविता’ वाङ्मय प्रकाराची सैद्धांतिक रचना व अध्यापन पद्धती – प्रा. सचिन अशोक पाटील
- ‘काव्य’ एक कलाकृती – सौ. सुषमा सुरेश मुळे
- साहित्याची समृद्धी आणि सैद्धांतिक रचना – डॉ. एस. ए. इंगळे (गिरी)
- नाटक वाङ्मय प्रकाराची सैध्दांतिक रचना व विकास – प्रा.डॉ. एम. बी. धोंडगे
- ‘नाटक’ या वाङ्मय प्रकाराचे स्वरूप, वैशिष्ट्ये – प्रा. शिवाजी हुसे
- नाटकातील स्वभावलेखन या घटकाचे स्वरूप, संवाद, भाषा यांचे विवेचन – प्रा. एस. एस. शिंदे