मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 ते इ.स. 1818)
History of the Marathas (A.D.1630 - 1818 A.D.)
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
सतराव्या शतकातील हिंदुस्थान म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व मुगलशाही या इस्लामी सत्तांचा युद्धमय काळ होय. या सत्तांमध्ये हिंदू धर्माला न्याय मिळत नव्हता. हिंदूची मंदिरे फोडली जात होती, मंदिरातील मूर्त्या नष्ट केल्या, हिंदू स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. शहाजी राजे व जिजाबाई यांनी आपल्या जीवनात या सर्व शासन सत्तांचा कडवट अनुभव घेतला होता. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शून्य बनलेल्या समाजात राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचे कार्य केले. स्वराज्यासाठी उपयुक्त घटकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले असामान्य धैर्य, पराक्रम, शक्ती-युक्तीच्या यथायोग्य वापराचे भान तसेच सामान्य मराठी जनांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, महाराणी ताराबाई यांनी प्रचंड संघर्ष केल्याने मोगलशाही खिळखिळी झाली. तद्नंतर छत्रपतीपदी शाहू महाराज आल्यानंतर पेशवेपदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. पेशव्यांमध्ये बाजीराव पहिला याने मोगली सत्तेचा पाडाव केला. मराठ्यांची सत्ता संपूर्ण हिंदुस्थानभर पसरली. पानिपत लढाईच्या घनघोर संग्रामानंतर मात्र मराठ्यांच्या सत्तेला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली.
Marathyancha Etihas
- मराठा सत्तेचा उदय आणि इतिहासाची साधने : (अ) मराठ्यांच्या इतिहासाची साधने – (ख) मराठी साधने (खख) इंग्रजी साधने (खखख) फ्रेंच साधने (खत) पोर्तुगीज साधने, (ब) मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी, (क) शहाजीराजे भोसले, जिजाबाई व शिवाजीराजांचे बालपण – (ख) शहाजीराजे भोसले, (खख) जिजाबाई भोसले
- स्वराज्याची स्थापना ते राज्याभिषेक व कर्नाटक मोहिम : (अ) विजापूरच्या आदिलशाहीची संबंध – (ख) जावळी, (खख) अफजलखान प्रसंग आणि त्याचे महत्त्व, (ब) शिवाजी महाराज-मुघल संबंध – (ख) शाहिस्तेखानाची स्वारी (खख) सुरतेची पहिली स्वारी (खखख) मिर्झा राजा जयसिंगची मोहिम व पुरंदरचा तह (खत) आग्रा भेट आणि सुटका, (क) राज्याभिषेक आणि कर्नाटक मोहिम – (ख) राज्याभिषेक (खख) कर्नाटक मोहिम (इ.स.1676)
- छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन : (अ) लष्करी प्रशासन, (ब) मुलकी प्रशासन
- छत्रपती संभाजी महाराज ते मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध : (अ) छत्रपती संभाजी महाराज-मोगल संबंध, (ब) मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध, (ख) छत्रपती राजाराम महाराज (खख) महाराणी ताराबाई आणि मोगल, (क) मराठा स्वातंत्र्य युद्धातील धुरंधर, (ख) संताजी घोरपडे (खख) धनाजी जाधव (खखख) रामचंद्रपंत अमात्य
- सत्तेचे एकत्रीकरण आणि मराठा राज्याचा विस्तार : (अ) महाराणी ताराबाई आणि छ. शाहू महाराज संघर्ष, (ब) बाळाजी विश्वनाथाची कामगिरी, (क) पेशवा बाजीराव थोरला (पहिला)
- मराठा सत्तेचे दृढीकरण : (अ) पेशवा बाळाजी बाजीराव (नानासाहेब), (ब) पानिपतच्या तिसर्या युद्धाची कारणे आणि परिणाम – (ख) पानिपतच्या तिसर्या युद्धाची कारणे (14 जाने. 1761) (खख) तिसर्या पानिपतच्या युध्दाचे परिणाम, (क) मराठा सत्तेच्या पराभवाची कारणे
- पानिपतच्या युद्धानंतर मराठा सत्तेचे पुनरुज्जीवन व पतन : (अ) पेशवा माधवराव पहिला, (ब) बारभाई कारस्थान (ख) नाना फडणीस (खख) महादजी शिंदे, (क) मराठा सत्तेचे पतन
- पेशवेकालीन प्रशासन आणि समाजव्यवस्था : (अ) मराठा मंडळ किंवा संयुक्त राज्यव्यवस्थेच्या निर्मितीची कारणे, (ब) जाती व्यवस्था
Related products
-
मराठ्यांचा इतिहास
₹395.00