महाराष्ट्रातील किल्ले सांस्कृतिक योगदान
The Castles and Cultural Contribution of Maharashtra
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
कोणताही समाज हा साहित्यावर टिकतो, तो केवळ पूजा-पाठ आणि कर्मकांड यांच्यावर टिकत नसतो. साहित्य हा समाजाचा मूळ पाया असतो. तो दृढ करण्याचे महत्वाचे कार्य मध्ययुगीन काळात दुर्गांनी केले. हेमाद्रिचा चर्तुवर्ग चिंतामणी हा ग्रंथ दौलताबादच्या किल्ल्यात लिहिला गेला. जैनांचा पहिला ज्ञानकोश याच दुर्गावर कलानिधी वैद्यनाथ यांनी तयार केला. इ.स.1493 च्या सुमारास जैन महाकवी जिनदास आणि पुण्यसागर यांनी हरिवंश पुराणाची रचना केली. हा ग्रंथ 67 अध्यायांचा असून त्यात अकरा हजार ओव्या आहेत. या ग्रंथातून जैन परंपरेत श्रीकृष्णाची असलेली व्यक्तीरेखा महाराष्ट्राला समजू शकेल. केशव याने वैद्यकशास्त्रावर तर त्याचा पुत्र बोपदेव याने व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, साहित्यावर तीन, भागवत तत्त्व विशद करण्यासाठी तीन आणि तिथी निर्णयावर एक इतक्या ग्रंथ रचना स्वत: केल्या. बागलाणची राजधानी मुल्हेर किल्ल्यावर इ.स.1610 मध्ये कवी मधुकर याने कथा कल्पतरू हा ग्रंथ पूर्ण केला. तो मुल्हेरचा उल्लेख वाटिकानगर, मयुराचल असा करतो. त्याच्या ग्रंथातून तत्कालिन बागलाणच्या राजाच्या व मुल्हेर किल्ल्याच्या वैभवाची व समृद्धीची कल्पना येते. पन्हाळा येथे पंडित रामचंद्र अमात्य यांनी मराठा राजनीतीवरील आपला प्रसिद्ध ग्रंथ आज्ञापत्र हा लिहिला. लोकमान्य टिळकांनी सिंहगडावर आर्क्टिक होम इन द वेदाज आणि गीतारहस्य या दोन प्रसिद्ध ग्रंथांच्या मुद्रण प्रती येथेच तयार केल्या. गोपाल नायक, शारंगदेव, कवी नरेंद्र यांच्या कला दुर्गातच विकसित झाल्या म्हणून दुर्ग हे साहित्य आणि कलेचे सृजनदाते होते असे म्हटले पाहिजे.
Maharashtratil Kille Ani Sanskrutik Yogdan
- महाराष्ट्रातील दुर्गांचे सांस्कृतिक योगदान : दिपावली, विजयादशमी, शिमगा, गुढी पाडवा, गोकुळाष्टमी, रामनवमी, मकरसंक्रांत, मुसलमानी सण – चांदरात, मोहरम, महाराष्ट्रातील दुर्गावरील मंदिरे व मशिदी
- महादुर्ग किल्ले धारूर : ‘धारूर’ शब्दाची व्युत्पत्ती, राष्ट्रकूटकालीन शहर, धारूर दुर्ग उभारणीचे टप्पे, धारूर दुर्गाची बलाढ्यता, धारूर दुर्गाची उभारणी-दूरदृष्टीचा किश्वरखान, दुर्गातील महत्त्वाच्या इमारती
- मुरुडचा जंजिरा : या दुर्गाच्या अजिंक्यत्वाची कथा, महम्मद गावानची शापवाणी, शक्तीपेक्षा युक्तीने मेढाकोट जिंकला, बेटावरील चंद्रकोर, बावीस नव्हे एकोणवीस बुरूज
- सिंहगड : सिंहगड हे शिवपूर्वकालीन नाव, शहाजीच्या सुटकेसाठी शिवाजीने सिंहगडचा ताबा सोडला, मोगलांकडे सिंहगड, मराठे पुन्हा सिंहगड जिंकतात, राजाराम महाराजांचे निधन
- अहमदनगर : अहमदनगर किल्ला बांधण्याची पार्श्वभूमी, किल्ल्यातील विहिरी, मुलूक-इ-मैदान तोफ, मोगलांच्या वर्चस्वाखाली अहमदनगरचा किल्ला, मराठ्यांच्या अमलाखाली अहमदनगरचा दुर्ग
- परांडा : परांड्याची विविध नावे, परांड्याचे भौगोलिक स्थान, परांडा किल्ला कोणी उभारला?, परांडा किल्ल्याची रचना, परांडा किल्ल्यातील मशीद, बुरूजावरील तोफा, किल्ल्याला होणारा पाणीपुरवठा
- रायगड : रायगडची विविध नावे, शिवाजीने रायरीस घोषित केले रायगड, औरंगजेबाच्या काळात रायगड झाला इस्लामगड, राजकुटुंब औरंगजेबाच्या ताब्यात, छत्रपती शाहूंची रायगड मोहिम, सिद्दीचा पुन्हा हल्ला
- नळदुर्ग : किल्ल्याचा विस्तार, किल्ल्याची विविध नावे, चालुक्य कालीन मातीचा किल्ला, गड दर्शन- किल्ल्याचे प्रवेशद्वार, खंदक, तटबंदी, उपळ्या बुरूज, किल्लेदाराचा वाडा, नवबुरूज, बारादरी, अंबरखाना
- पन्हाळा : भौगोलिक स्थान, पन्हाळ्याची विविध नावे, किल्ल्याची दुर्गमता, पन्हाळा किल्ला कोणी बांधला?, पन्हाळगड दुर्गावरील सत्तेतील परिवर्तने, कदंब घराण्याची सत्ता
- सोलापूर : सोलापूर किल्ल्याचे भौगोलिक महत्त्व, सोलापूर नावाची व्युत्पत्ती, सोलापूरचा किल्ला कधी बांधला, सोलापूर किल्ल्याच्या निर्मितीची कथा, खंदकाच्या दुरूस्तीची आज्ञा, किल्ल्यातील इमारती
- देवगिरी उर्फ दौलताबाद : दुर्गाचे भौगोलिक स्थान, देवगिरी किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, देवगिरी नाव कसे पडले : आख्यायिका, देवगिरीची आणखी काही नावे