महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक चळवळी
Social and Political Movements in Maharashtra
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सुरू झालेली पहिली सामाजिक चळवळ म्हणून सत्यशोधक चळवळीचा विचार होतो. तत्कालिन समाज व्यवस्थेत ब्राह्मण पुरोहित वर्गाचे वर्चस्व खूप वाढले. त्यांनी बहुजन समाजाला रूढी, प्रथा, परंपरा तसेच अंधश्रद्धेच्या जोखडात बांधून ठेवल्याने सत्यशोधक चळवळीने त्याचा प्रचंड विरोध केला. धार्मिक परंपरावादाला व अंधश्रद्धेला आव्हान देणारी तसेच मुस्लीम समाजात आधुनिक सुधारणावादाचे बिजारोपण करून प्रबोधन घडवून आणण्यात मुस्लीम जगतातील पहिली चळवळ म्हणून मुस्लीम सत्यशोधक चळवळीचा उल्लेख करावा लागतो. हिची स्थापना महाराष्ट्रात पुणे येथे 22 मार्च 1970 रोजी हमीद दलवाई यांनी मुस्लीम युवकांच्या बैठकीत केली. यासोबतच दलित चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आदिवासी चळवळींचा देखील उल्लेख करावा लागेल. क्रांतीकारी परिवर्तनवादी चळवळ म्हणून महाराष्ट्राच्या व काही प्रमाणात भारताच्या इतिहासात दलित चळवळीचे योगदान आहे. प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर कालखंडात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने गती घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अनेक प्रयत्न झाले. याचप्रमाणे बिहार व अन्य राज्यांतही आदिवासी चळवळी अत्यंत तीव्र व व्यापक स्वरूपाच्या होत्या. पण महाराष्ट्रात मात्र तसे आढळून येताना दिसत नाहीत.
Maharashtratil Rajkiya V Samajik Chalwali
- सत्यशोधक चळवळ : 1.1. सत्यशोधक चळवळ, 1.1.1. प्रास्ताविक, 1.1.2. सत्यशोधक समाजाचा उद्देश, 1.1.3. तत्वे, 1.1.4. सत्यशोधक चळवळ महात्मा फुले, 1.2. सत्यशोधक चळवळीचे परिणाम व महत्व, 1.2.1. मूल्यमापन व परीक्षण, 1.2.2. सत्यशोधक चळवळीचे यश, 1.2.3 सत्यशोधक चळवळीचे अपयश, 1.3 सत्यशोधक चळवळ आणि सद्यःस्थिती, 1.3.1. सत्यशोधक समाज व चळवळीची प्रत्यक्ष भूमिका, 1.3.2. कार्य व भूमिका, 1.4. मुस्लिम सत्यशोधक चळवळ, 1.4.1. पार्श्वभूमी, 1.4.2. स्थापनेचा उद्देश, 1.4.3. उदयाची कारणे, 1.4.4. मुस्लिम सत्यशोधक चळवळ व हमिद दलवाई, 1.4.5. चळवळीचे कार्य, 1.4.6. मूल्यमापन.
- दलित चळवळ : 2.1 प्रास्ताविक, 2.2 पार्श्वभूमी, 2.3 दलित चळवळ-व्याख्या व अर्थ, 2.4 दलित चळवळीच्या उदयाची कारणे, 2.5 दलित चळवळीच्या कार्याचे स्वरुप, 2.5.1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्व दलित चळवळ, 2.5.2. डॉ. आंबेडकरकालीन दलित चळवळ, 2.5.3. डॉ.आंबेडकरोत्तर दलित चळवळ, 2.5.4. दलित चळवळीचे मूल्यमापन वा यश-अपयश.
- संयुक्त महाराष्ट्र चळवळ : 3.1 प्रास्ताविक, 3.2 राज्य पूनर्रचना समित्या, 3.2.1. समित्या नेमण्याची पार्श्वभूमी, 3.2.2. दार कमिशन, 3.2.3. फाजलअली कमिशन, 3.2.4. जे.व्ही.पी. समिती, 3.2.5. नागपूर करार, 3.3 संयुक्त महाराष्ट्र समिती, 3.4 महाराष्ट्र राज्याची स्थापना-निर्मिती, 3.5 मुंबईचे महत्व.
- आदिवासी चळवळ : 4.1 प्रास्ताविक, 4.1.1. आदिवासीचा अर्थ, 4.1.2. आदिवासीची व्याख्या, 4.1.3. आदिवासी समाजाची वैशिष्ट्ये, 4.2 सामाजिक चळवळ म्हणजे काय, 4.3 आदिवासी चळवळीचा उदय, 4.4 आदिवासी विकासाच्या समस्या, 4.5 महाराष्ट्रातील आदिवासींच्या चळवळी, 4.5.1. बिरसा मुंडाची चळवळ, 4.6 आदिवासी विकासाच्या उपाय-योजना, 4.6.1. शासकिय स्तरावरील प्रयत्न, 4.6.2. निमशासकिय स्तरावरील प्रयत्न, 4.7 सद्यकालिन आदिवासी चळवळ, 4.8 मूल्यमापन.