मातीमोल (काव्यसंग्रह)
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
मातीमोल होणं म्हणजे सगळं काही गमावणं, जे काही केलं त्याला काहीही किंमत न मिळणं असा सरधोपट अर्थ अनेकदा लावला जातो. मात्र, या अर्थाच्याही पलीकडं ज्याला मातीचं मोल आकळतं, त्यालाच मायमातीची वेदना उमगू शकते. कवी डॉ. कुणाल पवार यांना हे माती ‘मोल’ नेमकं कळलेलं आहे, याची प्रचिती या संग्रहातील कवितांमधून येते. म्हणूनच जेव्हा ते म्हणतात, ‘मी मात्र उतू न जाता राहावं जमिनीवरच सामान्य माणसातला कवी म्हणून अखेरपर्यंत!’ तेव्हा त्यांच्या कवितेतला प्रामाणिकपणा अधिक उठून दिसतो. आपली नाळ ही मातीशी जोडलेली असते हे कधी विसरू नये. याच प्रेरणेतून मातीशी इमान राखून तिच्याबद्दलची आत्मीय असोशी या कवितांमधून पदोपदी दिसत राहते. याच मातीत शेती फुलते, शेतकऱ्यांच्या स्वप्नांचे बीज रुजते, याच मातीच्या गर्भातून सर्जनाचा जन्म होतो… माती खूप काही देते आणि शिकवतेही… जेव्हा जेव्हा अस्मानी-सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडतं तेव्हा हीच माती त्यांचा आधार होते, पुन्हा नव्याने रुजण्याचा आशावाद पेरते. कवी डॉ. कुणाल पवार यांच्या या संग्रहातील कवितांमधून हा मातीनंच दिलेला आशावाद दिसतो. शेतकरी बापाचं पिढीजात दु:ख मांडताना ही कविता हळवी होते, कातर होते… कधी कधी विद्रोहाचीही भाषा करते पण त्याला आक्रस्ताळेपणाचा जरासुद्धा स्पर्शही होऊ देत नाही. या संग्रहाच्या रुपाने कवी डॉ. कुणाल पवार यांनी मराठी कवितेच्या मातीत नवं रोप लावलेलं आहे, त्याला आशयसमृद्धीचं खतपाणी वेळोवेळी मिळावं आणि अनुभवांच्या अनेक अंगांनी हे कवितेचं रोप बहरत जावं ही अगदी मनापासून शुभेच्छा… बाकी माती सकस आहेच गरज आहे ती फक्त तिची योग्य ती मशागत करण्याची… पुनश्च एकदा कवी डॉ. कुणाल पवार यांचे कौतुक आणि स्वागत…
– दुर्गेश सोनार
Matimol
माय मातीचा मळा
- माझी कविता
- बांधावरचा बाभूळ
- बाप आणि बैल
- बा विठ्ठला!
- बाप नीटसा कळलाच नाही..
- निसर्ग खेळ
- काळ्या आईच्या कुशीत…
- गाव
- आभाळ तुझं फाटू दे…
- बाप शेतकरी
- गावची माती
- माय माती
- पोशिंदा
- आत्महत्या… ह्याची नि त्याची
- मातीमोल
- ऑनलाइन वर्ग
- काळी आई
- बाप्पा
गोतावळा
- बाई
- लायक व्हायचं आहे..
- आयुष्यावर आरटीआय
- लेक
- माय
- डिजिटल नाती
- नारी
- बाप म्हणजे…
- राखीच्या धाग्याला जागशील का?
- बाप म्हटलं की…
- मैत्री
- शब्द
- जीवन गाणे
सामाजिक कळवळा
- माणसाने प्रेमाने वागायला हवं…
- सामान्य माणसा
- रोगमुक्त कविता..
- वादळं
- पुस्तकं
- भाव मनीचा
- कविते…
- थापाबंदी
- रंग
- पक्षांतर
- आमचं ठरलंय…
- सत्तासुंदरी
- राजकीय झेंडे
अभंग
- पंढरीच्या देवा
- पांडुरंगा
- उत्तरार्धी
- लबाड साधू संत
- तूच खरा सखा
- अनाथांच्या नाथा
- तुझ्या पायरीशी…