मानवी हक्क आणि मूल्यांचे अध्यापन
Teaching of Human Rights and Values
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलीन डी रूझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्कांचा जाहीरनामा तयार केला. मानवाधिकार ही संकल्पना फारच विस्तृत आणि व्यापक आहे. ही संकल्पना मुख्यत्वेकरुन विश्वबंधुत्वाच्या भावनेशी निगडीत आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाशी मानव अधिकारांचा घनिष्ठ संबंध असतो. सदरील पुस्तकात मानवी हक्काची संकल्पना, अर्थ, व्याख्या, मानवी हक्क आणि बालक, मानवी हक्क आणि महिला, अल्पसंख्यांक व मानवी हक्क, अनुसूचित जाती-जमाती यांचे हक्क, मानवी हक्कांसाठी शिक्षकाची भूमिका, मानवी हक्क व मूल्यांचे अध्यापनासाठी शिक्षण, मानवी हक्कांचे उल्लंघन अशा महत्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.
अल्पसंख्यांकांचे प्रश्न, सांप्रदायिकता, दहशतवाद, नक्षलवाद, निराश्रितांचे प्रश्न, दारिद्य्र, बेकारी, कुपोषण, एड्स आणि पर्यावरणाचा र्हास अशी मानवी हक्क उल्लंघनाची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. मानवी हक्कांची माहिती सर्वांना व्हावी म्हणून शाळा, महाविद्यालयांमधूनच गांभीर्याने शिक्षण देणे गरजेचे असून त्यासाठीच सदरील पुस्तकाचे लेखन प्रयोजन.
Manvi Hakka Aani Mulyanche Adhyapan
- मानवी हक्क (मानव अधिकार): मानवी हक्क : संकल्पना, अर्थ आणि व्याख्या, मानवी हक्कांच्या रक्षणाची गरज, भारतीय राज्यघटनेतील मानवी हक्क, मानवी हक्क शिक्षण : अर्थ, महत्व, मानवी हक्क शिक्षणाची गरज, बालक हक्क : संकल्पना, गरज आणि महत्व, स्त्रियांचे हक्क : संकल्पना, गरज आणि महत्व, मानवी हक्क कायदा, 1993.
- सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांची सद्यस्थिती आणि त्यांचे हक्क: राष्ट्रीय दृष्टीकोनातून स्त्रिया आणि मुले यांचे सामाजिक दर्जासंदर्भात हक्क, मानवी हक्क आणि महिला, राष्ट्रीय महिला आयोग, अल्पसंख्यांक आणि मानवी हक्क, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग : भारतीय रचना किंवा स्वरुप, भारतीय परिस्थितीत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि इतर स्थानिक (स्वदेशी) लोकांची सद्यस्थिती, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाचे मानवी हक्क.
- मानवी हक्कांसाठी शिक्षकाची भूमिका: मानवी हक्काच्या अध्यापनाचे महत्व व गरज, मानवी हक्कांच्या अध्यापनात शिक्षकाची भूमिका, समाज आणि शाळा यात मानवाधिकारांसाठी उपक्रम, समाजात आणि शाळेत मानवाधिकारांची जागरुकता/जाणीव-जागृती.
- मानवी हक्क आणि मूल्ये यांच्या अध्यापनासाठी शिक्षण: मानवी हक्क आणि मूल्ये यांच्या अध्यापनाचे हेतू, मूल्यांचा अर्थ आणि संकल्पना, मानवी हक्क आणि मूल्ये यांच्या अध्यापनाची गरज आणि महत्व, मूल्यांचे प्रकार, मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी विविध कार्यक्रम.
- मानवी हक्कांची पायमल्ली: मानवी हक्कांचे उल्लंघन, अनुसूचित जाती-जमातीच्या मानवी हक्कांची पायमल्ली, स्त्रियांच्या मानवी हक्कांची पायमल्ली, मुले किंवा बालकामगारांच्या मानवी हक्कांची पायमल्ली, अल्पसंख्यांक समाजाच्या मानवी हक्कांची पायमल्ली, अपंग व जेष्ठ नागरीकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली.