मानव विकास व शासकीय कार्यक्रम
Human Development and Government Programme
Authors:
ISBN:
₹525.00
- DESCRIPTION
- INDEX
मानव विकासाचा एकंदरीत विचार करता, मानव विकास काय ते प्रथम पहायला हवे. मानवाच्या विविध विकासाचा व वाढीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानव विकास होय. मानवी जीवनाचा प्रारंभ गर्भधारणेपासून होतो. गर्भधारणा ते किशोरावस्था या काळात मानवाची वृद्धी व विकास होतो. विकास प्रक्रियेचा प्रारंभ मात्र गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत सुरु असतो. निसर्गात असणाऱ्या विविध प्रकारच्या जीवसृष्टीमधील श्रेष्ठतम अशी सृजनात्मक प्रक्रिया जेव्हा घडली तेव्हाच मनुष्य निर्मिती झाली. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. विकास प्रक्रियेवर आंतरिक तसेच बाह्य घटकांचा प्रभाव पडत असतो. बालवयात शारीरिक व मानसिक क्षमतांच्या स्वरूपात क्रमिक परिवर्तन होतात त्याला विकास म्हणता येईल. अशा प्रकारे मानवाच्या सर्वांगीण विकासाचे व विविध अवस्थेतील परिवर्तनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र हे मानव विकासशास्त्र होय असे म्हणण्यास हरकत नाही.
Manav Vikas V Shaskiya Karyakram
प्रकरण 1 मानवी विकासाचा परिचय
1.1 मानवी विकासाचा अर्थ व परिभाषा
1.2 मानवी विकासाची व्याप्ती व महत्त्व
1.3 मानवी विकासाच्या पायऱ्या/अवस्था
1.4 मानवी विकास आणि कौटुंबिक संबंध
1.5 बाल अध्ययनपद्धती : 1) रनींग रेकॉर्ड (चालू रेकॉर्ड), 2) मुलाखत पद्धती, 3) निरीक्षण पद्धती, 4) चरित्रात्मक पद्धती, 5) व्यक्ती वृत्तांत पद्धती, 6) प्रायोगिक पद्धती
प्रकरण 2 पूर्वबाल्यावस्था
2.1 पूर्वबाल्यावस्थेचा अर्थ, परिभाषा, महत्त्व आणि वैशिष्ट्ये
2.2 पूर्वबाल्यावस्थेतील शारीरिक विकासात्मक कार्ये
2.3 भावना व भावनिक अभिव्यक्ती
2.4 सामाजिक विकास, क्रियात्मकता आणि खेळातील रुची
2.5 भाषिक विकास, नैतिक अभिवृत्ती आणि वर्तन
प्रकरण 3 उत्तर बाल्यावस्था
3.1 उत्तरबाल्यावस्थेचा अर्थ, परिभाषा आणि वैशिष्ट्ये
3.2 उत्तरबाल्यावस्थेतील भावनिक विकास
3.3 उत्तरबाल्यावस्थेतील सामाजिक विकास
3.4 उत्तरबाल्यावस्थेतील भाषिक विकास
3.5 उत्तरबाल्यावस्थेतील नैतिक विकास
प्रकरण 4 पूर्वबाल्यावस्थेतील शिक्षण
4.1 पूर्वबाल्यावस्थेतील शिक्षणाचा इतिहास
4.2 पूर्वबाल्यावस्थेतील शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्ट्ये
4.3 पूर्वबाल्यावस्थेतील शिक्षणात तत्त्वज्ञाचा शैक्षणिक सहभाग
4.4 पूर्वबाल्यावस्थेतील शैक्षणिक संस्था बालवाडी आणि किंडरगार्डन
4.5 अनौपचारिक प्राथमिक शिक्षण आणि त्यांचे महत्त्व
प्रकरण 5 पालक-बालक संबंध
5.1 पालक-बालक संबंधाची संकल्पना आणि परिभाषा
5.2 पालक-बालक संबंधाचे महत्त्व
5.3 पालक शैलीचे प्रकार- हुकूमशाही, निष्काळजी, मुक्ताचार
5.4 बालसंगोपन पद्धतीचे प्रकार आणि गरज
5.5 पालक शिक्षक सभा
प्रकरण 6 पौगंडावस्था
6.1 पौगंडावस्थेचा अर्थ, परिभाषा आणि वैशिष्ट्ये
6.2 पौगंडावस्थेतील विकासात्मक कार्य, शारीरिक विकासातील वाढ व बदल
6.3 पौगंडावस्थेतील भावना व भावनिक वर्तन
6.4 पौगंडावस्थेतील सामाजिक विकास
6.5 पौगंडावस्थेतील वैयक्तिक काळजी व धोके
प्रकरण 7 किशोरावस्था
7.1 किशोरावस्थेतील परिभाषा आणि वैशिष्ट्ये
7.2 किशोरावस्थेतील शारीरिक वाढ
7.3 किशोरावस्थेच्या समस्या आणि पायऱ्या
7.4 किशोरावस्थेतील व्यावसायिक आवड आणि छंद
7.5 किशोरावस्थेतील सामाजिक बदल
प्रकरण 8 व्यक्तिमत्त्व विकास
8.1 व्यक्तिमत्त्व विकासाचा अर्थ, परिभाषा आणि महत्त्व
8.2 व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करणारे घटक
8.3 व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रकार आणि वैशिष्ट्ये
8.4 व्यक्तिमत्त्व विकासातील समायोजन आणि विषमसमायोजन (कुसमायोजन)
8.5 व्यक्तिमत्त्व विकास आणि संभाषण कौशल्य
प्रकरण 9 प्रौढावस्था ते वृद्धावस्था
9.1 प्रौढावस्था आणि वृद्धावस्थेची संकल्पना आणि परिभाषा
9.2 प्रौढावस्थेतील विकासात्मक कार्य आणि शारीरिक बदल
9.3 मध्यप्रौढावस्था संकल्पना आणि विकासात्मक कार्य
9.4 मध्यप्रौढावस्थेतील शारीरिक, मानसिक आणि रजोनिवृत्तीच्या वेळातील बदल
9.5 वृद्धावस्थेतील समस्या : कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक
प्रकरण 10 मानवी हक्क आणि शासकीय कार्यक्रम
10.1 मानवी हक्कांची संकल्पना आणि परिभाषा
10.2 मानवी हक्कांचे कायदे आणि बालक संरक्षण
10.3 शासकीय कार्यक्रम – एकात्मिक बालविकास सेवा योजना
10.4 सार्वत्रिक लसीकरण योजना
10.5 किशोरवयीन प्रजनन आणि लैंगिक आरोग्य