Prashant Publications

My Account

मानव संसाधन व्यवस्थापन

Human Resource Management

Authors: 

ISBN:

SKU: 9789382414926
Marathi Title: Manav Sansadhan Vayvsthapan
Book Language: Marathi
Published Years: 2016
Edition: First

275.00

  • DESCRIPTION
  • INDEX

कोणत्याही व्यवसाय संस्थेच्या यशस्वी उद्दिष्ट्ये पूर्तीचे आणि यशापयशाचे श्रेय कुशल मानव संसाधनालाच आहे. भूमी, श्रम, भांडवल, संयोजन हे उत्पादनाचे चार प्रमुख घटक आहेत त्या शिवाय अलिकडच्या काळात माहिती तंत्रज्ञान हा घटक जोडला जातो. हे सर्व घटक एकत्र आल्याशिवाय कोणत्याही वस्तूंचे उत्पादन शक्य नसते. त्यामुळे मानवाचे ज्ञान, कौशल्य, गुणवत्ता, प्रवृत्ती इत्यादींचा श्रम या उत्पादन घटकांवर अपरिहार्य परिणाम असतो. संस्थेत कार्यरत असणार्‍या विविध स्तरांवरील कर्मचारी किती कार्यक्षमतेने, कौशल्याने, जबाबदारी आणि स्वयंप्रेरणेने कार्ये करतात यावरच संपूर्ण व्यवस्थापनाची परिणामकारकता अवलंबून असते. कर्मचार्‍यांकडून योग्य प्रकारे आणि जास्तीत जास्त कार्ये घेणे हाच कर्मचारी व्यवस्थापनाचा प्रमुख उद्देश असतो.

मानव संसाधन व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. या विषयात व्यवस्थापनातील मानवी घटकांबाबत असणार्‍या सर्वच पैलुंचा सुक्ष्मपणे अभ्यास करावा लागतो. या विषयाचे विद्यार्थ्यांना सहज आकलन व्हावे आणि विषयाची गोडी निर्माण व्हावी तसेच व्यवसाय संस्थांमधील आणि उपक्रमातील मानव संसाधन व्यवस्थापन व विकास संदर्भातील सर्व अद्यावत तंत्रे आणि मानसशास्त्रीय सिद्धांताचाही परामर्श सदरील पुस्तकात अत्यंत सुलभ भाषेत घेतला आहे.

Manav Sansadhan Vayvsthapan

विभाग – 1

  1. मानव संसाधन विकासाची ओळख : 1.1 मानव संसाधन विकासाची व्याख्या – संकल्पना, 1.2 मानव संसाधनाची वैशिष्ट्ये, 1.3 मानव संसाधनाचे उद्देश व कार्य, 1.4 मानव संसाधनाची व्याप्ती आणि विकास
  2. मानव संसाधनाचे नियोजन : 2.1 मानव संसाधन नियोजन : व्याख्या, 2.2 मानव संसाधन नियोजनाची वैशिष्ट्ये, 2.3 मानव संसाधन नियोजनाचे महत्त्व, 2.4 मानव संसाधन नियोजनातील टप्पे
  3. कार्य विश्लेषण आणि रचना : 3.1 व्याख्या, 3.2 कार्यविश्लेषणाचे घटक, 3.3 कार्यविश्लेषणाचे फायदे / महत्त्व, 3.4 कार्यविश्लेषणाची वैशिष्ट्ये, 3.5 कार्यविश्लेषणचे उद्देश, 3.6 कार्यविश्लेषणाच्या पद्धती
  4. भरती : 4.1 अर्थ आणि व्याख्या, 4.2 भरतीचे स्त्रोत, 4.3 भरतीच्या विविध पद्धती
  5. निवड : 5.1 कर्मचारी निवड, 5.2 निवड कार्यपद्धती, 5.3 मुलाखत – व्याख्या, उद्दिष्टे, प्रकार, तत्त्वे, 5.4 परिचय प्रक्रिया – अर्थ व व्याख्या, उद्दिष्ट्ये, स्वरुप, टप्पे, महत्त्व
  6. रोजगार आणि नियुक्ती : 6.1 रोजगाराचा अर्थ आणि व्याख्या, 6.2 रोजगारातील समस्या, 6.3 रोजगाराची प्रभावी साधने, 6.4 नियुक्तीचा अर्थ आणि व्याख्या, 6.5 नियुक्तीचे स्वरुप आणि उद्देश

विभाग – 2

  1. कर्मचारी प्रशिक्षण : 1.1 अर्थ आणि व्याख्या, 1.2 प्रशिक्षणाची आवश्यकता, 1.3 प्रशिक्षणाची उद्दिष्टये, 1.4 प्रशिक्षणाच्या पद्धती, 1.5 प्रशिक्षणाचे प्रकार
  2. व्यवस्थापन विकास : 2.1 व्यवस्थापन विकासाचा अर्थ व व्याख्या, 2.2 व्यवस्थापन विकासाचे महत्त्व आणि आवश्यकता, 2.3 व्यवस्थापकीय दृष्टीकोन, 2.4 व्यवस्थापन विकासाची उद्दिष्ट्ये
  3. कर्मचार्‍यांच्या तक्रारी : 3.1 अर्थ आणि व्याख्या, 3.2 कामगारांच्या तक्रारींची कारणे, 3.3 कर्मचार्‍यांच्या तक्रारींची वैशिष्ट्ये, 3.4 कर्मचारी तक्रार निवारण यंत्रणेची तत्त्वे, 3.5 तक्रार निवारण – व्याख्या
  4. कर्मचार्‍यांची शिस्त : 4.1 अर्थ आणि व्याख्या, 4.2 शिस्तीचे उद्देश, 4.3 बेशिस्तपणा व बेशिस्तीची कारणे, 4.4 तक्रार हाताळणीचे तत्त्व, 4.5 तक्रार निवारण पद्धत
  5. कर्मचार्‍यांच्या कामगिरीचे मूल्यामापन : 5.1 व्याख्या – अर्थ आणि वैशिष्ट्ये, 5.2 हेतू आणि महत्त्व, 5.3 कामगिरी मूल्यमापनाच्या पद्धती आणि प्रक्रिया, 5.4 मूल्यमापनातील समस्या
  6. मानव संसाधन व्यवस्थापनातील ताज्या घडामोडी : (अ) मानव संसाधनाचा लेखाजोगा, ब) मानव संसाधन विभागाचे लेखापरिक्षण, क) मानवी भांडवल, ड) ज्ञान व्यवस्थापन, ई) कामाचा दजा
RELATED PRODUCTS
You're viewing: मानव संसाधन व्यवस्थापन 275.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close