माही माय बहिनाई
Authors:
ISBN:
₹135.00
- DESCRIPTION
- INDEX
‘बहिणाईची गाणी’ चे गारूड 1952 पासून मराठी मनावर कायम आहे. बहिणाबाईंच्या गाण्यांची निर्मितिप्रक्रिया सहृदयपणे उलगडून दाखवणारी ‘खोप्यामधी खोपा’ ही कादंबरी, साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला ‘बहिणाबाई चौधरी’ हा काव्यचिकित्सा करणारा मोनोग्राफ, ‘बहिणाईची गाणीः शैलीवैज्ञानिक समीक्षा’, अनुवादविज्ञानाचे भान सांभाळून आणि बोली रूपांतराच्या मर्यादांची जाण ठेवून केलेला ‘बहिणाईना गाना’ हा अहिराणी बोलीतील अनुवाद हा आगळावेगळा उपक्रम इ. पाच सहा पुस्तकांमधून बहिणाबाईंचे काव्यकर्तृत्व विविध अंगांनी मांडणारे प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे बहिणाईचा घेतलेला ध्यास व अभ्यास,चिंतन यातूनच ‘माही माय बहिनाई’ हा खानदेशी – तावडी बोलीतील काव्यसंग्रह साकार झालेला आहे.
एखादा विषय (थीम) घेऊन त्यावर मराठी भाषेत लिहिलेला पाच पन्नास कवितांचा संग्रह काढणे, ही कल्पना आता नवीन राहिलेली नाही. क वयित्री बहिणाबाई चौधरी आणि त्यांची कविता या विषयावरील कवितांची एक छोटेखानी पुस्तिका इंद्रजित भालेराव यांच्यासारख्या प्रसिद्ध कवीने यापूर्वी काढली. आहे. प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे यांचा ‘माही माय बहिनाई’ हा खानदेशी – तावडी बोलीतील अष्टाक्षरी छंदातील 50 कवितांचा संग्रह बहिणाबाईंचे व्यक्तिमत्त्व व कवित्व, तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण, बहिणाबाईंच्या काव्याचे प्रयोजन आणि त्यांच्या काव्याची चिकित्सक व आस्वादक समीक्षादेखील या कवितेतून वाचकांसमोर मांडते.
अस्सल तावडी बोलीतील या कविता बहिणाबाईंच्या गाण्यांशी जातकुळी सांगतात त्यामुळे बहिणाबाईंची भाषा अहिराणी, लेवा गणबोली की खानदेशी – तावडी बोली हा प्रश्नही आपोआप निकालात निघतो. कारण ‘बहिणाईची गाणी’ आणि ‘माही माय बहिनाई’ या संग्रहातील कवितांची बोली एकच आहे. बहिणाबाईंची कविता हा कवीच्या चिंतनाचा आणि चिकित्सेचा विषय असल्याने केवळ भक्तीपोटी केलेल्या आस्वादक समीक्षेपेक्षा सपकाळेंची कविता वेगळी ठरते.
बहिणाबाईंच्या कवितेचे समग्र आकलन होण्यासाठी ‘माही माय बहिनाई’ या संग्रहातील कविता उपयुक्त ठरतील यात शंका नाही.
– प्रा.ह.भ.प. चत्रभूज पाटील
1. गारूड, 2. बहिनाई, 3. वावर मंदिर, 4. सावली, 5. तत्त्वज्ञानी, 6. लोकवानी संतवानी, 7. बहिणाई विद्यापीठ, 8. वावरात देव, 9. जोतिष, 10. मानसं वाचली, 11. संवेदना, 12. गान्यांचं गारूड, 13. भाषा, 14. गान्यामधी गानं, 15. माहेर सासर, 16. विनोदबुद्धी, 17. व्यक्तिचित्रं, 18. देव कुढी, 19. गावोगावी बहिनाई, 20. माही माय बहिनाई, 21. सन उत्सव, 22. मिथककथा, 23. झाड, 24. झरा, 25. बहिनाईचं बोलनं, 26. लोकतत्त्व-लोकसाहित्य, 27. सोपानदेव चौधरी, 28. तावडपट्टीतली बोली, 29. वारकरी संसकार, 30. जगनं तोलाचं, 31. तावडपट्टी गाने, 32. या चौधरीवाड्यामधी, 33. सरसोतीची बोली, 34. जीव, 35. घट्या आनं गानं, 36. पुत्र सोपानदेवला, 37. तावडीचा झेंडा, 38. माहेर-सासर, 39. बहिणाबाई चौधरी, 40. शिक्का, 41. मौखिक परंपरेची, 42. माही माय बहिनाई, 43. संस्कार, 44. मंदिराचा संस्कार, 45. गुणवान गाणी, 46. देवावर विसवास, 47. शेतीची साधनं, 48. बहिनाईची गाणी, 49. काव्यगुणी खाण देशी, 50. भुईसारखं जीवन, 51. बहिणाबाईची गाणी