मूलभूत अर्थशास्त्र
Fundamentals of Economics
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
अर्थशास्त्र हे एक गतिमान शास्त्र आहे. काळाबरोबर त्याचे स्वरूप आणि व्याप्ती बदलत गेली. अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत अशा आर्थिक व्यवहारांचे अध्ययन करणारे एक सामाजिक शास्त्र आहे. मानवी जीवनात धन किंवा संपत्तीला अनन्य साधारण महत्त्व अहे. विकासाबरोबर मानवाच्या गरजांचे स्वरुप बदलत गेले आणि व्याप्ती विस्तारत गेली. गरजांची अमर्यादितता आणि साधनांची मर्यादितता व पर्यायी वापराची शक्यता यामुळे मानवासमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांची मानवाला आपल्या पातळीवर सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रश्नांची सोडवणूक करताना वर्तमान काळाबरोबर भविष्यकालीन विकासाचाही त्याला विचार करावा लागतो. आर्थिक क्रियातून धन किंवा संपत्तीची प्राप्ती, त्यातून स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणात वाढ, दुर्मिळ अशा साधनसामग्रीचा वापर करून जास्तीत जास्त वस्तू व सेवांचे उत्पादन आणि जास्तीत जास्त गरजांची पुर्तता, अर्थव्यवस्थेचा विकास आणि वृद्धी इत्यादींशी संबंधीत बाबींचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. सदर पुस्तकात सतत विकास, समावेशक विकास, मानव विकास निर्देशांक, दशलक्ष विकास लक्ष्य, विकास व्यूहरचनेसाठी औद्योगिकीकरण की कृषी, बाजार की सरकार, चलन निचलनीकरण, रोख विरहित व्यवहार, देणी देण्याच्या आणि त्यांचा निपटारा करण्याच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक पद्धती या मुद्द्यांचा समावेश केला आहे.
Mulbhut Arthashastra
- अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 अर्थशास्त्र म्हणजे काय?, 1.2 अर्थशास्त्राचे स्वरूप, 1.3 अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.4 अर्थशास्त्राचे महत्त्व, 1.5 अर्थशास्त्राच्या मर्यादा, 1.6 आर्थिक नियम : अर्थ, स्वरूप व वैशिष्ट्ये, 1.7 आर्थिक क्रियांचा चक्राकार प्रवाह
- वस्तू बाजार आणि उपभोक्त्याची वर्तणूक : 2.1 मानवी गरजा – अर्थ, 2.2 उपभोग आणि उपभोक्त्याचे सार्वभौमत्त्व, 2.3 उपयोगिता विश्लेषण, 2.4 मागणी, 2.5 मागणीची लवचिकता
- उत्पादन आणि पुरवठा : 3.1 मुलभूत संकल्पना, 3.2 उत्पादन, 3.3 उत्पादन घटक – अर्थ व वैशिष्ट्ये, 3.4 उत्पादन खर्च- अर्थ, 3.5 उत्पादन खर्च विषयक संकल्पना, 3.6 उत्पादनाची प्राप्ती, 3.7 पुरवठा
- वस्तू बाजार आणि वस्तू किंमत निश्चिती : 4.1 बाजार – व्याख्या आणि अर्थ, 4.2 बाजाराचे वर्गीकरण, 4.3 बाजाराचा आकार ठरविणारे घटक, 4.4 बाजाराचे प्रकार किंवा बाजाराची रचना, 4.5 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील किंमत निश्चिती, 4.6 उपभोक्ता आणि उत्पादकाचे संतोषाधिक्य/बचत संकल्पना
- आर्थिक विकास : 5.1 आर्थिक विकास आणि त्याच्या व्याख्यांमधील बदल, 5.2 आर्थिक विकासाचे निदर्शक, 5.3 आर्थिक विकासाला प्रभावित करणारे घटक, 5.4 आर्थिक विकासाची व्यूहरचना
- देणी देण्याच्या (भुगदान) आणि हिशेबपूर्ती (निपटारा) करण्याच्या पद्धती : 6.1 विनिमय पद्धती, 6.2 पैशाची उत्क्रांती, 6.3 बँकींग, 6.4 मध्यवर्ती बँक आणि तिची कार्ये, 6.5 भारतातील देणी देण्याच्या (भुगतान) आणि हिशेब पूर्ती (निपटारा) करण्याच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीची उत्क्रांती, 6.6 निचलनीकरण/विमुद्रीकरण/नोटबंदी, 6.7 रोख विरहित समाज
- आंतरराष्ट्रीय व्यापार : 7.1 आंतरराष्ट्रीय व्यापार- 1) अंतर्गत व्यापार, 2) आंतरराष्ट्रीय व्यापार, 7.2 व्यापारतोल आणि व्यवहारतोल, 7.3 विदेश चलन विनिमय बाजार
- सरकारी/सार्वजनिक आय-व्यय : 8.1 सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ, 8.2 सार्वजनिक व खासगी आयव्ययातील साम्य आणि भेद, 8.3 सार्वजनिक आयव्ययाचे महत्त्व, 8.4 सार्वजनिक खच, 8.5 सार्वजनिक महसूल, 8.6 सार्वजनिक कर्ज, 8.7 अंदाजपत्रक/अर्थसंकल्प