मूलभूत समाजशास्त्रीय विचार
Foundations of Sociological Thought
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो बुद्धिमान आहे. मानवाला प्रत्येक काळात मानवी जीवनाशी संबंधित समस्यांच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता वाटली. या आवश्यकतेतूनच विशिष्ट अशा सामाजिक विचारांचा उदय झाला. नेहमीच नव्या नव्या समस्यांच्या संदर्भात मानव विचार करीत राहिला म्हणून मानवी समाजाच्या अंतापर्यंत सामाजिक विचार अस्तित्वात राहतील. सामाजिक समस्या या कालसापेक्ष असतात; पण समस्या नाहीत असे कधीच घडत नाही. त्यामुळे सामाजिक विचारही मानवी समाजाइतकेच प्राचीन असून त्यांचा अंतही मानवी समाजाबरोबरच आहे. 19 व्या शतकापर्यंत सामाजिक विचारांचा विकास झाला. ग्रीक सामाजिक विचारवंत प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांच्या काळात सामाजिक विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव होता; पण प्रबोधन युग निर्माण झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल घडून आले आणि यातून सामाजिक विचारांमध्ये शास्त्रीयता येत गेली. सामाजिक विचारांमध्ये ऑगस्त कॉम्त, हर्बर्ट स्पेन्सर, एमिल डरखिम, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स या व्यक्तींचेही स्थान महत्त्वपूर्ण आहे.
Mulbhut Samajshashriy Vichar
- सामाजिक विचार : प्रस्तावना, सामाजिक विचार म्हणजे काय?, सामाजिक विचार व समाजशास्त्रीय विचार यांच्यातील परस्परसंबंध, सामाजिक विचार – स्वरूप, वैशिष्ट्ये, सामाजिक विचारांचे महत्व, सामाजिक विचारांच्या विकासाचा आढावा, विविध देशातील सामाजिक विचारांचा विकास, प्लेटोचे सामाजिक विचार, अॅरिस्टॉटलचे सामाजिक विचार.
- ऑगस्त कॉम्त : प्रस्तावना, ऑगस्त कॉम्तचा जीवन परिचय, ऑगस्त कॉम्तची ग्रंथसंपदा, कॉम्तचे समाजशास्त्रासंबंधीचे विचार, समाजशास्त्राची व्याख्या, समाजशास्त्राच्या शाखाविषयक दृष्टिकोन, विकासाच्या अवस्था किंवा तीन अवस्थांचा नियम, शास्त्रांची श्रेणीरचना, ऑगस्त कॉम्तचा प्रत्यक्षवाद – अर्थ, विभाजन, ध्येय/हेतू, वैशिष्ट्ये.
- हर्बर्ट स्पेन्सर : प्रस्तावना, हर्बर्ट स्पेन्सर यांचा जीवन परिचय, हर्बर्ट स्पेन्सर यांची ग्रंथसंपदा, सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत, भौतिक उत्क्रांतीचा सिद्धांत, उत्क्रांतीची तत्त्वे, उत्क्रांतीचे गौण नियम, हर्बर्ट स्पेन्सर यांची उत्क्रांतीची व्याख्या, हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतीवादी सिद्धांताचे जीववादी स्वरूप, हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतीवादी सिद्धांताचे सामाजिक स्वरूप, डार्विन आणि स्पेन्सर, हर्बर्ट स्पेन्सरचा समाजाचा सेंद्रिय सिद्धांत, मानवी समाज व मानवी शरीर यांच्यातील साम्य, मानवी समाज व मानवी शरीर यांच्यातील भेद, समाजाचे प्रकार, सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज यातील भेद/फरक.
- एमिल डरखिम : प्रस्तावना, एमिल डरखिम यांचा जीवन परिचय, एमिल डरखिमची ग्रंथसंपदा, एमिल डरखिमचे पद्धतीशास्त्र, पद्धतीशास्त्राचे आधार, पद्धतीशास्त्राची वैशिष्ट्ये, सामाजिक तथ्यांची संकल्पना, सामाजिक तथ्याचा अर्थ, वस्तूचे विभिन्न अर्थ, सामाजिक तथ्यांची वैशिष्ट्ये, सामाजिक तथ्यांचे प्रकार, श्रमविभाजनाचा सिद्धांत, श्रमविभाजनाचा अर्थ, श्रमविभाजन आणि सामाजिक विकास, श्रमविभाजनाचे आवश्यक तत्त्व, श्रमविभाजनाची कारणे/घटक, श्रमविभाजनाचा परिणाम/प्रभाव, सामाजिक एकता, सामाजिक एकतेची वैशिष्ट्ये, सामाजिक एकतेचे प्रकार, आत्महत्येचा सिद्धांत, आत्महत्येचे प्रकार, धर्माचा समाजशास्त्रीय सिद्धांत, धर्माचा अर्थ आणि व्याख्या, पवित्र आणि अपवित्रतेची संकल्पना, धर्माची उत्पत्ती, ऑस्ट्रेलियातील अरूण्टा आदिवासींचे अध्ययन, टोटम, धर्माची कार्य.
- मॅक्स वेबर : प्रस्तावना, मॅक्स वेबरचा यांचा जीवनपरिचय, वेबरची ग्रंथसंपदा, मॅक्स वेबरचे समाजशास्त्र, धर्माचे समाजशास्त्र, अध्ययनाची प्रमुख समस्या, पद्धतीशास्त्रीय दृष्टिकोन, धर्म चलाच्या रूपात, धर्माचे आर्थिक नितीशास्त्र आणि सामाजिक व आर्थिक व्यवस्थेशी संबंध, आधुनिक भांडवलवाद आणि प्रोटेस्टंटवाद, आधुनिक भांडवलशाहीच्या प्रेरणेची वैशिष्ट्ये, प्रोटेस्टंट धर्माचे आधुनिक भांडवलशाहीमध्ये योगदान, भारतातील हिंदू धर्म व आर्थिक विकास, चीन, सामाजिक क्रियेचा सिद्धांत, सामाजिक क्रियेचा अर्थ, सामाजिक क्रियेची वैशिष्ट्ये, सामाजिक क्रियेचे प्रकार, क्रियेच्या उत्पत्तीच्या अवस्था, सत्तेची संकल्पना, प्रभुत्व, सत्तेचा अर्थ, सत्तेचे प्रकार, नोकरशाहीची संकल्पना, नोकरशाहीची वैशिष्ट्ये, नोकरशाहीमध्ये अधिकार्यांची स्थिती, आदर्श प्रारूपाची संकल्पना, आदर्श प्रारूपाचा अर्थ, आदर्श प्रारूपाची वैशिष्ट्ये.
- कार्ल मार्क्स : प्रस्तावना, कार्ल मार्क्सचा जीवन परिचय, कार्ल मार्क्सची ग्रंथसंपदा, कार्ल मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवाद, द्वंद्वात्मक भौतिकवादाची आधारभूत वैशिष्ट्ये, ऐतिहासिक भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवादाचा अर्थ, मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादाची आधारभूत वैशिष्ट्ये, ऐतिहासिक भौतिकवादाची मुलभूत तत्त्वे, बदलती उत्पादनपद्धती किंवा बदलती ऐतिहासिक युगे, मानवी इतिहासाचे पाच काळ, कार्ल मार्क्सचा वर्ग आणि वर्गसंघर्षाचा सिद्धांत, वर्गसंघर्ष सिद्धांताची आधारभूत गृहीततत्त्वे, वर्गसंघर्षाची स्वरूपे, वर्ग आणि वर्गसंघर्ष सिद्धांतावरील टिका, समाजवादाची संकल्पना, साम्यवादी समाज, समाजवादी व्यवस्थेच्या पुनर्निर्माणाची योजना, साम्यवादी समाजाची वैशिष्ट्ये, परात्मतेचा सिद्धांत.