मोजणीशास्त्र (मोजणी/मापन शास्त्र)
Measurement Science
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
मोजणीशास्त्राची जीवनामध्ये पदोपदी आवश्यकता असते. भारतात सुरुवातीला बांबू, काठीने मोजणीला सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम असो किंवा भू-संरक्षण असो त्यासाठी मोजणी अत्यावश्यक आहे. प्रामुख्याने या शास्त्राचा उपयोग देश-गाव यांच्या मोजणीसाठी किंवा नकाशासाठी फक्त उपयोग होत नाही तर त्यापेक्षा जास्त त्याचा उपयोग आपल्या स्थापत्य शास्त्रामध्ये केला जातो आहे. देशामध्ये नागरी स्थापत्य शास्त्राचे कार्य या मोजणी मापनशास्त्रानेच सुरु आहे. घराची, इमारतीची बांधणी असो किंवा रेल्वे, रुळ, कालवा, बोगदे असो त्यासर्वांसाठी हे शास्त्र अत्यंत उपयुक्त झालेले आहे. गाव-गाव, गाव-शहर, शहर-शहर इत्यादी सर्व जोडणीचे रस्ते, घाट रस्ते, पूल, किंवा धरणे बांधणीच्या कार्यात मोजणीशास्त्र अत्यावश्यक झालेले आहे.
सर्वसामान्यांना आणि विद्यार्थी वर्गाला मापनशास्त्राची प्रारंभिक ओळख आणि माहितीची गरज असते. हे लक्षात घेऊनच मापनशास्त्रावर आपल्या मातृभाषेतून हे पुस्तक लिखाण झाले आहे. पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय सुजाण नागरिकासाठी या लेखनाचा निश्चितच उपयोग होईल या हेतूने पुस्तकाचे लिखाण केलेले आहे.
Mojanishastra (Mojani/Mapan Shastra)
1. मोजणी/मापन शास्त्र
2. मोजणी प्रमाण
3. मोजणीच्या दिशा
4. मोजणी पूर्व तयारी
5. साखळी मोजणी
6. समतल फलक मोजणी
7. लोलकीय होकायंत्र मोजणी किंवा प्रिझमी कंपास सर्वेक्षण
8. नकाशा-सांकेतिक खुणा व चिन्हे
9. प्रशासन आणि भूमापन