योग शिक्षण
Yoga Education
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
योग हा विषय कल्पवृक्षाप्रमाणे आहे. इच्छित फळ हा कल्पवृक्ष देतो. आज सामाजिक व आर्थिक परिस्थितीत गोंधळलेल्या माणसांना नैतिक ध्यैर्य, कष्ट सोसण्याची ताकद व स्वास्थ, शांती, संतुलनासाठी योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही.
त्यासाठी योगविद्येचा प्रचार व प्रसार शाळा व महाविद्यालयातून होणे आवश्यक आहे. विद्यार्थी वर्ग प्रेरित होण्यासाठी योगविद्येकडे आकर्षित होण्यासाठी योगशिक्षण प्रथम शिक्षकांनी घेऊन योगशिक्षक बनले पाहिजे. तरच विद्यार्थी मनःपूर्वक ते शिकतील कारण ‘As is the teacher, so is the student’ म्हणून ‘अष्टांगयोगाच्या’ माध्यमातून, नियमित अभ्यासातून, प्रशिक्षणार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंघटीत व्हावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रस्तुत पुस्तक लेखन करण्यात आले आहे.
प्रस्तुत पुस्तकात एकूण चार प्रकरणे असून त्यात योगाभ्यासाचे सविस्तर वर्णन, योगाविषयी सैध्दांतिक व प्रात्यक्षिक स्वरूपाचे विवेचन आहे.
Yog Shikshan
- योगा आणि योगाभ्यास परिचय : 1.1 योग-अर्थ आणि प्रारंभ 1.2 योगविकासाचा इतिहास 1.3 योगाचे प्रवाह 1.4 आरोग्यदायी जीवनासाठी योगाभ्यास
- योगसिद्धांत – परिचय : 2.1 योग – एक शिस्त/अनुशासन 2.2 योग आणि योगसिद्धांताचे वर्गीकरण 2.3 पतंजलीच्या अष्टांगयोगाचे आकलन 2.4 हठयोगाभ्यास/हठयोगातील यौगिक क्रिया
- योग आणि आरोग्य : 3.1 आरोग्य आणि रोग 3.2 आरोग्यदायी जीवनाची यौगिक तत्वे 3.3 समग्र आरोग्याची यौगिक संकल्पना – एकात्मिक उपागम 3.4 आरोग्य आणि योगाभ्यास
- व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोजित योग : 4.1 व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिमत्त्व विकास 4.2 एकाग्रतेसाठी योगाभ्यास 4.3 स्मृती विकसनासाठी योगाभ्यास 4.4 दृष्टी विकास आणि स्वर संस्कृतीसाठी योगाभ्यास
- प्रात्यक्षिक कार्य
- योगाभ्यास सराव कार्यक्रम