राजकारणातील आधुनिक संकल्पना आणि विचार
Modern Concepts and Thoughts in Politics
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
राज्यशास्त्रातील आणि राजकारणातील नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद आणि दहशतवाद या आधुनिक संकल्पनांची मांडणी तसेच राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या संकल्पनाविषयी पाश्चात्य तसेच भारतीय राजकिय विचारवंताचे विचार यांची सुसंगत आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडणी करण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केला आहे. यासोबतच नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद, दहशतवाद, राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या आधुनिक संकल्पनांच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, अर्थ, स्वरूप, विविध घटक, गुणवैशिष्ट्ये, प्रकार, फायदे व तोटे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि यथायोग्य ठिकाणी विविध उदाहरणांसह स्पष्टीकरण केलेले असून पुस्तकाची भाषा अत्यंत साधी व सोपी असून सर्वांना सहज समजेल अशी असल्याने प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक यासोबतच सर्वांना लाभदायक ठरेल यात शंका नाही.
Rajkaranatil Aadhunik Sankalpna Aani Vichar
- नेतृत्व : अ) नेतृत्वाचा अर्थ, ब) नेतृत्वाचे घटक, क) नेतृत्वाची भूमिका
- आरक्षण : अ) आरक्षण : अर्थ आणि स्वरूप, ब) भारतीय संसदेतील आरक्षण, क) भारतातील आरक्षण आणि राजकारण
- राष्ट्रवाद : अ) राष्ट्रवाद : अर्थ आणि स्वरूप, ब) राष्ट्रवादाचे घटक, क) भारतीय राष्ट्रवादाचे वर्तमान स्थान
- जमातवाद : अ) जमातवादाचा अर्थ, ब) भारतीय राजकारणात जमातवादाची भूमिका, क) भारतातील जमातवादाचे वर्तमान स्थान
- दहशतवाद : अ) दहशतवाद : अर्थ आणि व्याख्या, ब) दहशतवादाचे प्रकार, क) भारतातील दहशतवाद प्रतिबंधक कायदे
- राज्याची संकल्पना : अ) अॅरिस्टॉटल – राज्यांचे वर्गीकरण, ब) महात्मा गांधी – रामराज्याची संकल्पना
- लोकशाहीची संकल्पना : अ) वाल्टर बेजहॉट – लोकशाही संकल्पना, ब) आब्राहाम लिंकन – लोकशाही संकल्पना, क) डॉ.बी.आर. आंबेडकर – संसदीय लोकशाही
- राष्ट्रवादाची संकल्पना : अ) निकोलो मॅकियाव्हेली, ब) स्वामी विवेकानंद, क) स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर
- समाजवाद : अ) कार्ल मार्क्स, ब) पं. जवाहरलाल नेहरू, क) राम मनोहर लोहिया
- वर्तनवाद आणि सार्वभौमत्व : अ) डेव्हिड इस्टन – वर्तनवादाची संकल्पना, ब) उत्तरवर्तनवादाची संकल्पना, क) जॉन ऑस्टिन – सार्वभौमत्वाची संकल्पना