राजकीय भूगोल
Political Geography
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
‘राजकीय भूगोल’ हा विषय थोडासा क्लीष्ट असल्याने पुस्तकात बर्याच ठिकाणी संदर्भ व उदाहरणे देऊन संकल्पना अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या पुस्तकातून राजकिय भूगोलाचा परिचय, राज्य व राष्ट्र उत्क्रांती व विकास, भूराजनिती सिद्धांत आणि दोन राष्ट्रादरम्यान असलेला सिमा यावर सविस्तर लिखाण या पुस्तकातून आम्ही केला असल्याने ‘राजकिय भूगोलाची व्याप्ती’ आपल्या लक्षात येईलच.
राजकिय भूगोल म्हणजे राजनैतिक दृष्टिकोनातून संगठित क्षेत्र किंवा राज्यांच्या भौगोलिक रचनेच्या संदर्भात केलेला अभ्यास होय. कोणत्याही राज्याशी संबंधित भौगोलिक क्षेत्र त्या राज्यांची भौगोलिक वास्तविकता असते. राज्य हे राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इ. संदर्भात गुणसंपन्न विभागासोबतच एक जिवंत विभागसुद्धा असतो. त्यावरूनच राजकिय भूगोलाची सार्थकता यावरूनच निश्चित होते.
Rajkiya Bhugol
- राजकीय भूगोलाचा परिचय : 1.1 राजकिय भूगोलाच्या व्याख्या, स्वरुप आणि व्याप्ती, 1.2 राजकिय भूगोलाची तत्वे
- राज्य आणि राष्ट्राची उत्क्रांती : 2.1 राज्य संकल्पना, 2.2 राज्यांच्या उत्क्रांती आणि विकासातील केंद्रोत्सारी व केंद्रगामी शक्ती, 2.3 राज्याचे मुलभूत घटक, 2.4 राष्ट्र संकल्पना, 2.5 राज्य व राष्ट्र यातील फरक
- भूराजनिती : 3.1 (अ) भूराजनितीच्या व्याख्या, (ब) भूराजनितीच्या संकल्पना, 3.2 मॅकिंडरचा मर्मभूमी सिद्धांत, 3.3 स्पायकमनचा कडाभूमी किंवा काठभूमी सिद्धांत, 3.4 हिंदी महासागराचे भूसामरिक महत्व
- सरहद्द व सीमा : 4.1 सरहद्द व सीमांच्या व्याख्या, 4.2 सरहद्द किंवा सीमाप्रदेश व सीमा यातील फरक, 4.3 आंतरराष्ट्रीय सीमांचे वर्गीकरण, 4.4 भारताच्या सीमारेषा