राजकीय विचारप्रणाली
Political Ideology
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
आधुनिक राजकीय चिंतनात विचारप्रणाली ही संकल्पना अत्यंत महत्वाची मानण्यात येते. विचारप्रणालीच्या आधारावर राजकीय व्यवस्थेला अधिमान्यता मिळत असते. मध्ययुगात व औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झालेल्या ज्या नवीन समस्या किंवा प्रश्नांची उत्तरे धर्म देऊ शकला नाही त्यांची उत्तरे विचारप्रणालींनी दिली. राजकीय सहभागाची व्यापकता जसजशी वाढत गेली तसे विचारप्रणालीचे महत्व वाढले. विचारप्रणालीच्या आधारे समाजात पसंतीच्या स्वरूपाची राजकीय व्यवस्था निर्माण केली जाऊ शकते. विचारप्रणालीमुळे राज्याचे स्वरूप निश्चित होत असते. भारताने समता, स्वातंत्र्य, यावर आधारीत असलेली आणि जातपातविरहीत लोकशाहीचा स्विकार केला असला तरी प्रत्यक्षात पूर्ण समता, पूर्ण स्वातंत्र्य कुठेच आढळून येत नाही. कोणतीही विचारप्रणाली ही एकात्म स्वरूपाची किंवा अंतरिक दृष्टीने सुसंगत नसते. कारण ती स्थिर स्वरूपाची नाही.
प्रस्तुत ग्रंथात वचारप्रणालीची भूमिका, वैशिष्ट्ये, राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीय वाद, विश्वराज्य, लोकशाही समाजवाद, भारतातील लोकशाही समाजवादाचा उदय व विकास, मार्क्स, म. ज्योतीबा फुले व डॉ. आंबेडकर यांचे विचार, संसदीय शासनपद्धती, स्त्री चळवळ, भारतातील स्वीवाद, जात आणि पितृसत्ताक इ. विविधांगी मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केले आहे.
Rajkiya Vicharpranali
- विचारप्रणाली : विचारप्रणाली – अर्थ व व्याख्या, विचारप्रणाली संकल्पनेचा विकास, विचारप्रणालीची उगमस्थाने (उदय), विचारप्रणालीचे स्वरूप, विचारप्रणालीची भूमिका किंवा कार्ये, विचारप्रणालीची वैशिष्ट्ये
- राष्ट्रवाद : राष्ट्रवादाचा अर्थ, राष्ट्र, व्याख्या, राष्ट्रक, राष्ट्रवाद, राष्ट्रवादाचा विकास, राष्ट्रवादाच्या विकासाची कारणे, राष्ट्रवादाचे घटक, शिक्षण, राष्ट्र आणि राज्य यातील फरक, राष्ट्रक आणि राष्ट्रवाद, राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये, राष्ट्रवादाचे प्रकार, प्रागतिक राष्ट्रवाद, प्रतिक्रियावादी राष्ट्रवाद, राष्ट्रवादाचे गुण, राष्ट्रवादीचे दोष, राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीय वाद, आंतरराष्ट्रीयवादाची मुख्य तत्वे, आंतरराष्ट्रवादाच्या विकासाचे घटक किंवा कारणे, वैज्ञानिक व तांत्रिक क्षेत्रात झालेली प्रगती, संयुक्त राष्ट्र संघटना, आंतरराष्ट्रीय कायद्याचा झालेला विकास, आंतरराष्ट्रीयत्वाच्या विकासातील अडचणी, विश्वराज्याची कल्पना, विश्वराज्य किंवा जागतिक शासनाची वैशिष्ट्ये, विश्व संघराज्य स्थापन करण्यातील अडचणी
- लोकशाही समाजवाद : लोकशाही समाजवादाचा अर्थ, समाजवादाचा अर्थ, समाजवादाची व्याख्या, समाजवादाची महत्वाची तत्वे, लोकशाही समाजवादाचा उदय व विकास, लोकशाही समाजवादाची मुलभूत तत्वे किंवा वैशिष्ट्ये, लोकशाही समाजवादाचे मूल्यमापन किंवा गुण-दोष, लोकशाही समाजवादाची कामगिरी व मर्यादा, भारतातील लोकशाही समाजवादाचा उदय व विकास, लोकशाही समाजवादाचे प्रकार – श्रमिक संघवाद/सिंडिकॅलिझम, फेबियन समाजवाद, व्यवसाय संघवाद
- फॅसिझम : फॅसिझमचा अर्थ व व्याख्या, फॅसिझमचा उदय आणि विकास, इटालीत फॅसिझमच्या उदयाची कारणे, फॅसिझमची मुलतत्त्वे किंवा वैशिष्ट्ये, महामंडळात्मक राज्याचे संघटन – गुण-दोष, फॅसिझमचे मुल्यांकन
- मार्क्सवाद : परिचय, 1) द्वंद्वात्मक भौतिकवाद 2) ऐतिहासिक भौतिकवाद – समाजाचा विकास, मार्क्सच्या ऐतिहासीक भौतिक वादावरील आक्षेप, अतिरिक्त मूल्यांच्या सिध्दांत, अतिरिक्त मुल्यांच्या सिध्दांताचे परिक्षण, मार्क्सचा राज्यविषयक सिध्दांत, मार्क्सच्या राज्यविषयक सिध्दांताची वैशिष्ट्ये, मार्क्सच्या राज्यविषयक सिध्दांतावरील आक्षेप, नव मार्क्सवाद, नव-मार्क्सवाद म्हणजे काय?
- फुले-आंबेडकरवाद : म. ज्योतीबा फुले – म. फुल्यांची तत्त्वप्रणाली, म. जोतीराव फुले यांचे समताविषयी विचार, म. जोतीरावफुले यांचे धर्मविषयक विचार, एकेश्वरवाद, इहवादी दृष्टीकोन, ईश्वराला मध्यस्थी नको, सत्य आणि नीती, मानवतावाद आणि विश्वबंधुत्व, सत्यशोधक समाज, सत्यशोधक समाजाची कार्ये, सत्यशोधक समाजाच्या कार्याचे महत्व, म. जोतीराव फुले यांचे लोकशाही विषयी विचार, लोकशाहीच्या गुणांची चर्चा; डॉ. आंबेडकरवाद – डॉ. आंबेडकर वाद, आंबेडकरवादाची संघटनतत्वे, डॉ. आंबेडकरांचे समाजवादाबद्दल विचार, डॉ.आंबेडकरांचे समतासंबंधी विचार, डॉ. आंबेडकरांचे धर्मासंबंधीचे विचार, हिंदू धर्म आणि धर्मग्रंथावर टीका, शुद्र पूर्वी कोण होते?, बौद्ध धर्माचा स्वीकार (14 ऑक्टोबर 1956), डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला?, बौद्ध धर्मच का?, डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुचविलेल्या सुधारणा, डॉ. आंबेडकरांनी सुचविलेल्या सुधारणा, डॉ. आंबेडकरांचे जात आणि धर्मासंबंधीचे विचार, डॉ. आंबेडकरांचे लोकशाही संबंधी विचार, सांसदीय लोकशाहीच का?, सांसदीय शासनपद्धतीचे दोष, सांसदीय लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक घटक
- गांधीवाद : म. गांधीची ग्रंथ संपदा, म. गांधीजीवर पडलेला प्रभाव, गांधीवाद, गांधीवादाचे आधार, महात्मा गांधीजींचे सत्य व अहिंसेचे विचार, अहिंसेचा अर्थ, अहिंसेचे प्रकार, महात्मा गांधीचा सत्याग्रहासंबंधी सिध्दांत, सत्याग्रहाचा अर्थ, सत्याग्रहाचे नियम किंवा मुलतत्वे, सत्याग्रहाचे आधार, सत्याग्रहाचे तंत्रे/साधणे किंवा मार्ग, म. गांधीची ग्रामस्वराज्याची संकल्पना, ग्रामस्वराज्याची संकल्पना, भारत, हिंदुस्थान खेड्यांचा देश आहे, हिंदुस्थानी खेड्यांचे गांधीजींनी केलेले निरिक्षण, गांधीनी ग्रामविकासासाठी सुचविलेल्या योजना, हिंद स्वराज्य सिध्दांत
- स्त्रीवाद : स्त्री चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्त्रीवादी चळवळीचा विकास, स्त्रीवादी वाटचाल, स्त्रीवादाचा अर्थ, स्त्रीवादाची व्याख्या, स्त्रीवादाची उद्दिष्टे, स्त्रीवादाचे स्वरूप, स्त्रीवादाची वैशिष्ट्ये, स्त्रीवादी दृष्टीकोन, उदारमतवादी स्त्रीवाद, उदारमतवादी स्त्रीवादाचे स्वरूप, उदारमतवादी स्त्रीवादाच्या काही मर्यादा, भारतातील स्वीवाद : जात आणि पितृसत्ताक (पुरूषप्रधानता), भारतातील स्वीवाद, जात आणि पितृसत्ताक (पुरूषप्रधानता), पितृसत्ताक (पुरूष प्रधानता), मार्क्सवादी स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवादाची वैशिष्ट्ये, जहाल स्त्रीवाद, जहाल स्त्रीवादाची मुलभूत तत्त्वे, जहाल स्त्रीवाद्यांनी हाती घेतलेले महत्त्वाचे विषय, काळा स्त्रीवाद, काळ्या स्त्रीवाद्यांचे राजकारण, स्त्रीवाद आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग मूल्यमापन, स्त्रीवादापुढील आव्हाने, उपाययोजना, स्त्रीवादावरील टिका