राजकीय समाजशास्त्र
Political Sociology
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
जगातील अनेक देशांमध्ये विज्ञान युग आणि त्यासोबत आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक बदल घडुन आले. आर्थिक, सामाजिक आणि परिणामतः राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची लाट आली. सामाजिक बदल हा प्रामुख्याने आर्थिक चळवळी आणि राजकीय जनजागृती या क्षेत्रातुन प्रगट होत गेला. राष्ट्रभावना प्रखर होत गेली. प्रस्थापित साम्राज्यवादी सत्ता त्यांची वसाहतवादी राज्ये, यांच्यात वाद निर्माण होऊन महायुद्धे उद्भवली. प्रथमतः पहिल्या महायुद्धानंतर युरोपचा राजकीय आणि आर्थिक नकाशाच बदलुन गेला. दुसर्या महायुद्धानंतर आफ्रिका व आशिया खंडातील नवोदीत राष्ट्रांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. प्रस्थापित किंवा परंपरागत राजकीय संकल्पना आणि व्यवस्था या क्षेत्रात संपुर्ण क्रांती झाली. नवोदीत, नवनिर्माण राज्यांनी जरी परंपरागत राजकीय संकल्पना किंवा व्यवस्था यातील काही बाबी कमी-जास्त प्रमाणात स्विकारल्या तरी त्यांच्या समाजातील सांस्कृतीकरणाची तसेच सामाजीकरणाची अवस्था, आर्थिक स्थिती आणि समस्या व त्यांच्या राजकीय समाजाच्या, राज्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा व ध्येये यानुसार त्यांच्या राजकीय आचारविचारांची जडणघडण होऊ लागली.
Rajkiya Samajshastra
- राजकीय समाजशास्त्र : राजकीय समाजशास्त्राची उत्पत्ती आणि विकास, राजकीय समाजशास्त्र निर्मितीस जबाबदार घटक, राजकीय समाजशास्त्राचा अर्थ, राजकीय समाजशास्त्राच्या व्याख्या, राजकीय समाजशास्त्राचे स्वरुप, राजकीय समाजशास्त्राची व्याप्ती, राजकीय समाजशास्त्राच्या मर्यादा, राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व
- बुध्दीवंताचे राजकीय समाजशास्त्रातील योगदान : कार्ल मार्क्स- द्वंद्वांत्मक भौतीकवाद, ऐतिहासिक भौतीकवाद, मार्क्सच्या ऐतिहासिक भौतीक वादावरील आक्षेप, मॅक्स वेबर- वेबरचा समाजशास्त्राचा अभ्यास, मॅक्स वेबरची शास्त्रशुध्द अभ्यास पध्दती
- राजकीय संस्कृती : राजकीय संस्कृती म्हणजे काय?, राजकीय संस्कृतीच्या व्याख्या, राजकीय संस्कृतीच्या व्याख्येसंबंधीचे दृष्टिकोन, राजकीय संस्कृतीचे स्वरुप, राजकीय संस्कृतीचे मुलाधार किंवा आधारभुत घटक, राजकीय संस्कृतीचे प्रकार, राजकीय संस्कृतीचे विविध प्रकार
- राजकीय सामाजीकरण : राजकीय सामाजीकरणाचा अर्थ, राजकीय सामाजीकरणाचे स्वरुप, राजकीय सामाजीकरणाच्या व्याख्या, राजकीय सामाजीकरणाची वैशिष्ट्ये, राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया, राजकीय सामाजीकरणाची माध्यमे किंवा साधने
- राजकीय विचारप्रणाली : अर्थ, विचारप्रणालीच्या व्याख्या, विचार प्रणाली संकल्पनेचा विकास, विचारप्रणालीची उगमस्थाने (उदय), विचारप्रणालीचे स्वरुप, विचारप्रणालीची भुमिका किंवा कार्ये, विचारप्रणालीची वैशिष्ट्ये
- राजकीय सहभाग : अर्थ, राजकीय सहभागाच्या व्याख्या, राजकीय सहभागाचे प्रकार, राजकीय सहभागाच्या पातळ्या, राजकीय सहभाग निर्माण करणारी माध्यमे किंवा घटक, राजकीय भरती किंवा समावेशन, राजकीय भरतीच्या विविध पध्दती, राजकीय भरतीची आणखी एक पध्दत
- अधिमान्यता आणि प्रभाव : अधिमान्यता- अधिमान्यतेचा अर्थ, अधिमान्यतेच्या व्याख्या, अधिमान्यतेचे स्वरुप, अधिमान्यता का असावी लागते, प्रभाव- प्रभावाचा अर्थ, प्रभावाचे स्वरुप, प्रभावाच्या व्याख्या, प्रभाव निर्माण करण्याच्या पध्दती, प्रभावाचे मोजमाप, प्रभावाचे प्रकार
- राजकीय बदल आणि राजकीय विकास : राजकीय बदल- राजकीय बदलाचा अर्थ आणि आशय, राजकीय बदलाचे स्वरुप, राजकीय बदलाची कारणे किंवा प्रकार , राजकीय विकास- राजकीय विकासाची संकल्पना, राजकीय विकासाचा अर्थ, राजकीय विकासाच्या व्याख्या, राजकीय विकास घडविणारे घटक