राजकीय समाजशास्त्र
Political Sociology
Authors:
ISBN:
₹595.00
- DESCRIPTION
- INDEX
वैज्ञानिक शोध, तंत्रक्रांती, वेगवेगळ्या विचारवंतांनी दिलेले वैचारिक योगदान यातून सामाजिक प्रबोधन घडून आले व त्यासोबत समाजातील विविध स्वरूपाच्या धार्मिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेत व त्याअनुषंगाने विशेषीकरणाच्या आणि सुक्ष्म अध्ययन पद्धतीद्वारे अध्ययनाच्या नवीन पद्धती विकसित होऊन नवीन ज्ञानशाखा, उपशाखा विकसित झाल्यात. समाजाच्या नवीन गरजा, नवीन प्रश्न, नवे पेच सोडविण्यासाठी नवीन आकलन स्विकारून नवीन ज्ञानशाखा विकसित होतात त्यातून मानवाशी निगडीत भिन्न भिन्न विषय अभ्यासासाठी विशेषीकरणाच्या पद्धतीने नवीन ज्ञानशाखा, राजकीय मानववंशशास्त्र, राजकीय समाजशास्त्र, राजकीय भूगोल, राजकीय अर्थशास्त्र इत्यादीचा उगम प्रामुख्याने 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात झाल्याचे दिसून येते.
प्रस्तुत ग्रंथात राजकीय समाजशास्त्राचा परीचय, राजकीय समाजशास्त्राचे दृष्टीकोन, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय अभिजन, राजकीय आधुनिकीकरण, राजकीय विकास, राजकीय संसूचन, राजकीय भरती, राजकीय नेतृत्व, लोकमत, राजकीय विचारसरणी, सत्ता, शक्ती, प्रभाव, अधिमान्यता इत्यादी विविधांगी मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केले आहे.
Rajkiya Samajshastra
- राजकीय समाजशास्त्राचा परीचय : 1. राजकीय समाजशास्त्र अर्थ व व्याख्या, 2. राजकीय समाजशास्त्राची वैशिष्ट्ये, 3. राजकीय समाजशास्त्राचा उदय व विकासाची कारणे, 4. राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप, 5. राजकीय समाजशास्त्राची व्याप्ती, 6. राजकीय समाजशास्त्राचे महत्व.
- राजकीय समाजशास्त्राचे दृष्टीकोन : 1. राजकीय समाजशास्त्राच्या दृष्टीकोनाचे स्वरूप व वैशिष्ट्ये, मूल्यमापन, 2. वर्तनवादी दृष्टीकोन अर्थ, उदय व विकासाची कारणे, वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, स्वरूप व मुलभूत तत्वे, वर्तनवादाची टीका, वर्तनवादाचे महत्व, वर्तनवादाच्या मर्यादा. 20 उत्तरवर्तनवाद : अर्थ, उत्तरवर्तनवादी क्रांतीच्या उदयाची कारणे, उत्तर वर्तनवादाची वैशिष्ट्ये किंवा मुलभुत तत्वे. 4. व्यवस्था विश्लेषणवादी दृष्टीकोन अर्थ-वैशिष्टे, टिका व मर्यादा, 5. संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टीकोन अर्थ व वैशिष्टे, आल्मंडचा संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टीकोन, दोष टीका, उपयुक्तता व महत्व, मर्यादा.
- राजकीय व्यवस्था : 1. राजकीय व्यवस्था अर्थ व स्वरूप, वैशिष्टे, 2. राजकीय व्यवस्थेची कार्ये, 3. राजकीय व्यवस्थेचे, गॅबियल आल्मंडचे वर्गीकरण, 4. राजकीय व्यवस्था संकल्पनेचे महत्व.
- राजकीय संस्कृती : 1. राजकीय संस्कृती अर्थ व व्याख्या, 2. राजकीय संस्कृतीचे स्वरूप निर्धारीत करणारे घटक, 3. राजकीय संस्कृतीचे मुलभूत तत्वे किंवा घटक, 4. राजकीय संस्कृतीचे स्वरूप किंवा वैशिष्ट्ये, 5. राजकीय संस्कृतीचे प्रकार, 6. राजकीय संस्कृतीचे नियामक तत्वे, 7. राजकीय संस्कृतीचे आयाम, 8. राजकीय संस्कृतीचे महत्व.
- राजकीय सामाजीकरण : 1. राजकीय सामाजीककरण अर्थ व व्याख्या, 2. राजकीय सामाजीकरणाचे स्वरूप व उद्दिष्ट्ये, 3. राजकीय सामाजीकरणाचे परीवर्त्य, 4. राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया व इतर, 5. राजकीय सामाजीकरणाचे प्रकार, 6. राजकीय सामाजीकरणाची साधने किंवा अभीकरणे, 7. राजकीय सामाजीकरणाची निर्धारक तत्वे, 8. राजकीय सामाजीकरणाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी, 9. राजकीय सामाजीकरणाचे महत्व.
- राजकीय सहभाग : 1. राजकीय सहभाग अर्थ व व्याख्या, 2. राजकीय सहभाग स्वरूप व वैशिष्टे, 3. राजकीय सहभागाचे प्रकार, 4. राजकीय सहभागाचे पैलू, क्रिया किंवा स्तर, 5. राजकीय सहभागाची शैली, 6. राजकीय सहभागाचे मुलभूत घटक किंवा तत्वे, 7. राजकीय सहभागाचे महत्व.
- राजकीय अभिजन : 1. राजकीय अभिजन – अर्थ व व्याख्या, 2. राजकीय अभिजनाची वैशिष्टे, 3. अभिजनाचे प्रकार, 4. अभिजन वर्गाचे सिद्धांत, 5. अभिजन संकल्पना व लोकतंत्र, 6. राजकीय अभिजनाचे स्वरूप, 7. राजकीय अभिजनाचे उद्दिष्ट्ये व कार्ये, 8. राजकीय अभिजनाचे महत्व.
- राजकीय आधुनिकीकरण : 1. राजकीय आधुनिकीकरण अर्थ व व्याख्या, 2. राजकीय आधुनिकीकरणाची वैशिष्टे, 3. राजकीय आधुनिकीकरणाला प्रभावित करणारे घटक, 4. राजकीय आधुनिकीकरणाचे अभिकरणे किंवा माध्यमे, 5. राजकीय आधुनिकीकरणासाठी आवश्यक अटी, 6. राजकीयदृष्ट्या आधुनिक व्यवस्थेची वैशिष्टे, 7. विकसनशील देशात राजकीय आधुनिकीकरणाच्या समस्या, 8. राजकीय आधुनिकीकरणाचे प्रतिमान, 9. राजकीय आधुनिकीकरण व राजकीय विकास यांच्यातील फरक, 10. राजकीय आधुनिकीकरणाचे महत्त्व.
- राजकीय विकास : 1. राजकीय विकास अर्थ व व्याख्या, 2. राजकीय विकासाचे स्वरूप, 3. राजकीय विकासाची वैशिष्टे, 4. ल्युसीयन पाईची राजकीय विकासाची संकल्पना, 5. आल्मंड व पॉवेल यांची राजकीय विकासाची संकल्पना, 6. हेलीयो जैग्वाराईब यांची राजकीय विकासाची संकल्पना, 7. सी. एच. डोड यांची राजकीय विकासाची संकल्पना, 8. ऑर्गेन्सीकी ची राजकीय विकासाची संकल्पना, 9. राजकीय विकासाचे प्रतिमान, 10. राजकीय विकासाची साधने, 11. राजकीय विकासाच्या समस्या, 12. राजकीय विकासाच्या मर्यादा, 13. एडवर्ड शिल्सचे राजकीय निवासाचे वर्गीकरण, 14. ऍप्टरचे राजकीय विकासाचे वर्गीकरण, 15. राजकीय विकासाचे महत्व.
- राजकीय संसूचन : 1. राजकीय संसूचन – अर्थ व व्याख्या, 2. राजकीय संसूचनाचे स्वरूप व वैशिष्ट्ये, 3. राजकीय संसूचनाचा उद्देश्य, 4. कार्ल डायशचा राजकीय संसूचन सिद्धांत, 5. राजकीय संसूचनाची साधने, 6. संसूचन व्यवस्थेचे प्रतिमान, 7. राजकीय संसूचनाची प्रभावशिलता, 8. राजकीय संसूचनाचे महत्व.
- राजकीय भरती : 1. राजकीय भरती अर्थ व्याख्या, 2. राजकीय भरतीचे स्वरूप, उद्देश्य, 3. राजकीय भरतीची वैशिष्टे, 4. राजकीय भरतीच्या पद्धती, 5. राजकीय भरतीचे सिद्धांत, 6. राजकीय भरतीचे साधने किंवा माध्यमे, 7. राजकीय भरतीला प्रभावित करणारे घटक, 8. राजकीय भरतीसाठी आवश्यक अटी, 9. राजकीय भरतीचे महत्व.
- राजकीय नेतृत्व : 1. राजकीय नेतृत्व अर्थ व व्याख्या, 2. नेतृत्वाची वैशिष्टे, 3. नेतृत्वाचे प्रकार, 4. नेतृत्वो घटक, 5. नेतृत्वाचे कार्य, 6. नेतृत्वाची तंत्रे, 7. नेतृत्वाचे सिद्धांत किंवा दृष्टीकोन, 8. नेतृत्वासंबंधी गुण, 9. नेतृत्वाचे महत्व.
- लोकमत : 1. लोकमत अर्थ व व्याख्या, 2. लोकमताचे स्वरूप व वैशिष्ट्ये, 3. लोकमताचे महत्व, 4. लोकमत निर्मितीची व अभिव्यक्तीची साधने, 5. लोकमत निर्मितीच्या समस्या किंवा अडचणी, 6. सशक्त लोकमत निर्मितीसाठी आवश्यक परिस्थती.
- राजकीय विचारसरणी : 1. विचारसरणीचा अर्थ व व्याख्या, 2. विचारसरणीचे स्वरूप, 3. विचारसरणीचे वैशिष्ट्ये, 4. विचारसरणीचे उगमस्थान, 5. विचारसरणीच्या उदयाची कारणे, 6. विचारसरणीची भूमिका, 7. विचारसरणीचे महत्व.
- सत्ता : 1. सत्ता अर्थ व व्याख्या, 2. सत्तेचे स्वरूप किंवा वैशिष्टे, 3. सत्तेचे स्त्रोत, 4. सत्तेचे घटक किंवा तत्वे, 5. सत्तेचे आधार किंवा स्विकृती, 6. सत्तेचे प्रकार, 7. सत्तेविषयी दृष्टीकोन, 8. सत्तेचे पालन करण्याची कारणे, 9. सत्तेचे महत्व, 10. प्रभाव व सत्ता यांच्यातील फरक.
- शक्ती : 1. शक्ती अर्थ व व्याख्या, 2. शक्तीची वैशिष्टे, 3. शक्तीचे स्त्रोत, 4. शक्तीचे प्रकार, 5. शक्तीचे स्वरूप, 6. शक्ती वापरण्याच्या पद्धती किंवा साधने, 7. शक्तीसंबंधी विद्वानांची मते, 8. शक्ती प्राप्तीचा उद्देश्य, 9. शक्ती व प्रभाव, 10. शक्ती व सत्ता, 11. शक्तीच्या वापरावरील मर्यादा, 12. शक्ती संपकल्पनेवरील टीका, 13. शक्तीचे महत्व, 14. प्रभाव व शक्ती यांच्यातील फरक.
- प्रभाव : 1. प्रभाव – अर्थ व व्याख्या, 2. प्रभावाची वैशिष्टे, 3. प्रभावाचे स्वरूप, 4. प्रभावाचा उद्देश्य, 5. प्रभावाचे प्रकार, 6. प्रभावाचे दृष्टीकोन, 7. प्रभावाचे मापन, 8. प्रभावाचे स्त्रोत, 9. प्रभावाच्या विश्लेषणाची समस्या, 10. प्रभावाचे महत्व.
- अधिमान्यता : 1. अधिमान्यता – अर्थ व व्याख्या, 2. अधिमान्यतेची वैशिष्टे, 3. अधिमान्यतेचे प्रकार, 4. अधिमान्यतेचे आधार, 5. अधिमान्यता प्राप्तीची साधने, 6. अधिमान्यतेचे स्त्रोत, 7. अधिमान्यतेचे संकट, 8. अधिमान्यतेचे महत्व.