- DESCRIPTION
- INDEX
सदर पुस्तकात सात लेखकांच्या ललित गद्य लेखनाचा समावेश केला आहे. ‘स्त्रीविषयक ललित गद्य’ असे सदर पुस्तकातील ललित गद्याचे विशिष्ट असे सूत्र आहे. स्त्री आणि पुरुष दोहोंचा म्हणजे ‘मी’चा लेखनातून व्यक्त होणारा स्त्रीविषयक दृष्टिकोन, त्या अंगाने घटना-प्रसंग, व्यक्ती याबाबत ‘मी’चे व्यक्त होणे, भावनात्मकता आणि चिंतनशीलता यातून स्त्रीविषयक अनुभवाचा अन्वयार्थ लावू पाहणे या सगळ्या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून स्त्रीविषयक ललित गद्याचे सूत्र केंद्रस्थानी ठेवून सदर पुस्तक आकारास आले आहे. लेखक स्त्री असो वा पुरुष, दोहोंच्या निवडक ललित गद्य लेखनाचा अंतर्भाव येथे केला आहे. महत्त्वाचे म्हणजे समकाळातील, म्हणजे साधारणपणे 1990 नंतरच्या कालखंडातील लेखकांचे हे ललित गद्य लेखन आहे. साहित्य, सामाजिक चळवळ, चित्रपट, पत्रकारिता अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपला स्वयंपूर्ण ठसा उमटविणार्या व्यक्तित्वांची-त्यांच्या संवेदना आणि विचारांची ही ललित गद्यात्मक अभिव्यक्ती आहे.
Lalitrang
- बाईमाणूस? राजन गवस
- संवादसाधना विद्या बाळ
- ग्राफिटी वॉल कविता महाजन
- पहाटपाळणा श्रीकांत देशमुख
- समतेचा खांदा जयदेव डोळे
- सो कुल… सोनाली कुलकर्णी
- कवडसे कल्पना दुधाळ