लेखनकौशल्य मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन
Authors:
ISBN:
₹120.00
- DESCRIPTION
- INDEX
‘लेखनकौशल्य – मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ हा ग्रंथ अनेकांगांनी महत्त्वपूर्ण आहे. मुद्रितशोधन हे लेखन कौशल्याचे महत्त्वाचे अंग आहे. किंबहुना ती भाषासंवर्धन व संरक्षण करणारी महत्त्वाची भाषिक संस्था आहे. प्रस्तुत ग्रंथ यशस्वी, उत्तम मुद्रितशोधक घडविण्यासाठीच्या प्रयत्नांचा महाप्रयत्न आहे. मुद्रितशोधन कौशल्यासाठी आवश्यक ज्ञानाच्या बाजू म्हणजे मुद्रितशोधनाचे स्वरूप, मुद्रितशोधनाचा सातत्यपूर्ण सराव यांचा समावेश या ग्रंथात असल्याने मुद्रितशोधन कौशल्याबाबतचे अ ते ज्ञ म्हणजे हा ग्रंथ होय. मुद्रितशोधनाची प्रक्रिया, विरामचिन्हांचे मुद्रितशोधनातील महत्त्व, अचूक शब्दलेखन, लेखनातल्या चुकांमुळे होणारे अर्थबदल, प्रात्यक्षिकांसाठी भरपूर उतारे ही या ग्रंथाची केवळ जमेचीच बाजू नसून मुद्रितशोधनासंदर्भातला ग्रंथ कसा कमाल स्तरावर पूर्णत्व पावलेला असावा, याची साक्ष देणाराही आहे.
सर्जनशील लेखनाचे स्वरूप, त्याची अंत: व पृष्ठ स्तरावरून सिद्ध होणारी वैशिष्ट्ये वाचक व अभ्यासकांस अवगत व्हावीत, कथालेखनाची, नाट्यलेखनाची निर्मितिप्रक्रिया नेमकी कशी घडून येते हे त्यांस आकलन व्हावे, या विशुद्ध सारस्वतीय भूमिकेतून या ग्रंथाचे लेखन झाले आहे. सर्जनशील लेखनामागील निर्मितिप्रक्रिया, प्रेरणा, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही, ही मोठी उणीव या ग्रंथाने भरून काढली आहे. सर्जनशील लेखनाची पृथगात्मता, सर्जनशीलतेसंदर्भातील संभावित पैलूंची मीमांसा, भाषेतील सर्जनशीलता, कलावंतांची सर्जनशीलता, विज्ञानातील सर्जनशीलता, साहित्यातील सर्जनशीलता, सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये, सर्जनशीलतेची अभिव्यक्ती, सर्जनशील लेखन करताना येणार्या अडचणी असा बहुआयामी सर्जनविचार हा ग्रंथ मांडतो.
भाषा पदवीधरांना रोजगार मिळणे ही बाब भाषा अध्यापनाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यासाठी भाषिक कौशल्ये अवगत असणारा विद्यार्थी घडविणे हे सांस्कृतिक कर्तव्य आहे. हे कर्तव्य तत्परतेने पार पाडण्यासाठी डॉ. संदीप माळी आणि प्रा. समाधान पाटील लिखित ‘लेखनकौशल्य : मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ या ग्रंथाचे स्वागत आहे.
– प्रा.डॉ. फुला बागूल
Lekhan Kaushalya Mudritshodhan V Sarjanshil Lekhan
- मुद्रितशोधन : स्वरूप आणि प्रक्रिया : प्रास्ताविक, मुद्रितशोधनाचे स्वरूप – मुद्रण, मुद्रितशोधन (प्रूफ करेक्शन), मुद्रितशोधनाची प्रक्रिया.
- मुद्रितशोधनाची उपयोजनाची क्षेत्रे आणि कौशल्याची आवश्यकता : मुद्रितशोधनाचे उपयोजन-ग्रंथ, नियतकालिके, वर्तमानपत्रे, पीएच.डी. व एम.फिल. प्रबंध, दुकानाच्या पाट्या, दूरचित्रवाहिन्यांवरील तळपट्ट्या
- मुद्रितशोधनाच्या खुणा व त्यांचे उपयोजन : मुद्रितशोधनाच्या सांकेतिक खुणा, उतार्याचे मुद्रितशोधन
- विरामचिन्हे व लेखनविषयक नियम यांचे मुद्रितशोधनातील महत्त्व : विरामचिन्हे, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, सीमासंधी, लेखनविषयक नियमांचे मुद्रितशोधनातील महत्त्व : प्रमाणलेखन (शुद्धलेखन) – मराठी साहित्य महामंडळ निर्मित व महाराष्ट्र शासन मान्य मराठी लेखन नियमावली, अचूक शब्दलेखन.
- सर्जनशील लेखन : स्वरूप आणि प्रक्रिया : सर्जनशील लेखन : स्वरूप आणि प्रक्रिया, सर्जनशील लेखन, सर्जनशीलता म्हणजे नावीन्य, सर्जनशीलतेला पैलू पाडता येतात का?, सर्जनशील लेखनाचे स्वरूप, भाषेची सर्जनशीलता, कलावंताची सर्जनशीलता, विज्ञानातील सर्जनशीलता, साहित्यातील सर्जनशीलता
- कथालेखन : स्वरूप आणि प्रक्रिया : कथालेखन, निर्मितीप्रक्रिया, कथाबीज, कथेचे प्रमुख प्रकार- स्फुट गोष्ट, लघुकथा, दीर्घकथा, कथानक, घटना व प्रसंगांची गुंफण, व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती, निवेदन
- नाट्यलेखन : स्वरूप आणि प्रक्रिया : नाट्यलेखन, नाटकाचे सादरीकरण, रंगमंच, नेपथ्य, नाटकातील संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, संविधानक, संवाद.