लोकप्रशासन
Public Administration (S3)
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रशासनाच्या व्यापक क्षेत्रातील लोकप्रशासन हा एक भाग आहे. लोकप्रशासनाचा सरळ अर्थ म्हणजे सरकारद्वारे केले जाणारे उपक्रम राबविणे. त्यालाच प्रशासकीय उपक्रम असेही म्हणता येते. लोकप्रशासनात ‘विकास प्रशासन’ या संकल्पनेचा समावेश दुसऱ्या जागतिक महायुध्दानंतर तुलनात्मक लोकप्रशासनाबरोबर झाला. ही एक गतिशील आणि परिवर्तनशील संकल्पना आहे; जी विशेषत: विकसनशील समाजात आर्थिक, सामाजिक, राजकीय परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकप्रशासनाच्या अभ्यासात विविध दृष्टीकोनांचा समावेश होतो. या दृष्टीकोनांमुळे लोकप्रशासनाच्या कार्याची व्याप्ती व ओळख होण्यास एकप्रकारे मदतच होते. लोकप्रशासनात सु-शासन, नोकरशाही, सेवक प्रशासन, उत्तरदायित्व आणि नियंत्रण या महत्त्वपूर्ण संकल्पनांचाही समावेश होतो. लोकप्रशासनात आर्थिक प्रशासन (बजेट) हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. प्रशासकीय यंत्रणा संपूर्णपणे आर्थिक प्रशासनावर आधारित असते. सर्व वित्तीय प्रशासनाचे पूर्ण विचार अंदाजपत्रक हे केंद्रस्थानी असते. शासन कार्यात व त्या अनुषंगाने येणाऱ्या लोकप्रशासनाचे दिवसेंदिवस महत्त्व वाढते आहे. त्यामुळे यातील विविध प्रवाहाचा विस्तृत विचार करण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.
Lokprashasan
- लोकप्रशासनाचे स्वरुप व महत्त्व : 1.1 प्रशासनाचा अर्थ, 1.2 लोकप्रशासनाचा अर्थ, 1.3 लोकप्रशासनाचे स्वरूप, 1.4 लोकप्रशासनाची व्याप्ती, 1.5 लोकप्रशासनाचे महत्त्व, 1.6 लोकप्रशासन व खाजगी प्रशासन.
- लोकप्रशासनाचा विकास : 2.1 विकास प्रशासन, 2.1.1 विकास प्रशासनाचा अर्थ, 2.1.2 विकास प्रशासनाची वैशिष्ट्ये, 2.1.3 विकास प्रशासन विकासाची कारणे, 2.1.4 विकास प्रशासन व परंपरागत प्रशासन, 2.1.5 विकास प्रशासनाची महत्त्वपूर्ण कार्ये, 2.1.6 विकास प्रशासनातील विविध समस्या, 2.1.7 विकास प्रशासनाचे दृष्टीकोन, 2.2 नवीन लोकप्रशासन, 2.2.1 तात्विक पार्श्वभुमी आणि ठळक वैशिष्ट्ये, 2.2.2 नवीन लोकप्रशासनाचे लक्ष्य, 2.2.3 नवीन लोकप्रशासनाची उत्क्रांती.
- लोकप्रशासनाचे दृष्टीकोन : 3.1 पारंपारिक वा अभिजात दृष्टीकोन, 3.2 वर्तनवादी दृष्टीकोन, 3.3 व्यवस्था दृष्टीकोन, 3.4 लोकनिवड/लोकविकल्प दृष्टीकोन, 3.5 निर्णय-निर्धारण दृष्टीकोन.
- शासन : 4.1 शासनाचा अर्थ, 4.1.1 सु-शासन संकल्पनेच्या उदयाची पार्श्वभूमी, 4.1.2 सुशासनाचा अर्थ, 4.1.3 सु-शासनाची आधारभूत तत्त्वे, 4.1.4 भारतीय परिप्रेक्ष्यातून सु-शासन, 4.1.5 सु-शासन यासाठी भारतातील प्रयत्न, 4.1.6 सु-शासन आणि नवीन लोक व्यवस्थापन, 4.1.7 भारतातील सु-शासनापुढील आव्हाने, 4.1.8 सु-शासन संकल्पना यशस्वी होण्यासाठी काही उपाय, 4.2 ई-शासन, 4.2.1 ई-शासनाचा अर्थ, 4.2.2 ई-शासनाचे क्षेत्र, 4.2.3 ई-शासनाची उद्दिष्टे, 4.2.4 भारतातील ई-शासन, 4.2.5 ई-लोकशाही, 4.2.6 माहिती आणि संसूचन तंत्रज्ञानाचा शासनावरील प्रभाव, 4.3 सार्वजनिक-खाजगी भागीदारी, 4.3.1 सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा अर्थ, 4.3.2 भारतात सार्वजनिक-खाजगी भागीदारी, 4.3.3 सार्वजनिक-खाजगी भागीदारी स्वरूपाबाबतचे गैरसमज, 4.3.4 खाजगीकरण आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी, 4.3.5 सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे प्रकार, 4.3.6 सार्वजनिक-खाजगी भागीदारीची सुरूवात.
- नोकरशाही : 5.1 नोकरशाही : अर्थ व व्याख्या, 5.1.1 मॅक्सवेबरची नोकरशाहीची संकल्पना (1864-1920), 5.1.2 रॉबर्ट मिचेल्सची नोकरशाहीची संकल्पना (1878-1936), 5.1.3 गेटॅनो मोस्काची नोकरशाहीची संकल्पना (1858-1941), 5.2 नोकरशाहीचे प्रकार, 5.3 नोकरशाहीचे गुण, 5.4 नोकरशाहीचे दोष, 5.5 प्रशासकीय सुधारणा.
- सेवक प्रशासन : 6.1 सनदी सेवांचा अर्थ, 6.1.1 सनदी प्रशासनाची कार्ये, 6.1.2 सनदी सेवांची विकसनशील समाजातील भूमिका, 6.2 सेवक प्रशासन भरती, 6.2.1 भरती पद्धती, 6.2.2 सेवक पात्रता, 6.2.3 पात्रता निश्चिती, 6.2.4 मध्यवर्ती सचिवालयीन सेवा, 6.2.5 केंद्रीय लोकसेवा आयोग, 6.3 प्रशिक्षण, 6.3.1 प्रशिक्षण : अर्थ, व्याख्या, 6.3.2 प्रशिक्षणाची गरज, 6.3.3 प्रशिक्षणाचे उद्देश, 6.3.4 प्रशिक्षणाचे प्रकार, 6.3.5 प्रशिक्षणाच्या पद्धती, 6.3.6 भारतातील प्रशिक्षण, 6.4 बढती/पदोन्नती, 6.4.1 बढती/पदोन्नतीचा अर्थ, 6.4.2 बढतीची तत्त्वे, 6.4.3 भारतातील बढती व्यवस्था, 6.4.4 भारतातील बढती पद्धतीतील दोष.
- अंदाजपत्रक : 7.1 अंदाजपत्रकीय संकल्पना, 7.2 अंदाजपत्रक संकल्पना : पारंपारिक आणि आधुनिक, 7.3 अंदाजपत्रक : प्रकार व स्वरूप, 7.4 भारतातील अंदाजपत्रकाची प्रक्रिया, 7.5 लिंगाधारित अर्थसंकल्पना.
- उत्तरदायित्व आणि नियंत्रण : 8.1 उत्तरदायित्वाचा अर्थ, 8.2 प्रशासकीय उत्तरदायीत्व, 8.3 प्रशासनावरील नियंत्रण, 8.3.1 नियंत्रणाचा अर्थ, 8.3.2 नियंत्रणाचे महत्व, 8.4 संसदीय किंवा विधीमंडळ – वैधानिक नियंत्रण, 8.5 न्यायालयीन नियंत्रण, 8.6 नागरिक आणि प्रशासन.