वर्णनात्मक भाषाविज्ञान
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर ज. जोशी हे भाषाविज्ञानाचे अभ्यासक आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी विषयांच्या अभ्यासक्रम पुर्नरचनेत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ‘भाषाविज्ञान’ हे त्यांचे अभ्यासक्षेत्र! प्रस्तूत ग्रंथात पदवी व पदव्युत्तर स्तरावर सर्वच विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले भाषेचे स्वरुप व लक्षणे, स्वनविन्यास, रुपिमविन्यास, वाक्यविन्यास, अर्थविन्यास इत्यादी वर्णनात्मक भाषाविज्ञानाशी संबंधित विविध घटकांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे. डॉ. जोशी यांच्या प्रदीर्घ अध्यापनातील अनुभवांवर आधारित अशी भाषाविज्ञानाची ही नाविन्यपूर्ण मांडणी अभ्यासकांना मार्गदर्शन ठरणारी आहे. एवढेच नव्हे तर स्पर्धा परीक्षा, नेट-सेट परीक्षा यासाठीही प्रस्तूत ग्रंथाची उपयुक्तता आहे. मराठी विषयातील अभ्यासकांना ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’ हा अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथ प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांनी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! भाषाविज्ञानाचे अभ्यासक त्यांच्या वा ग्रंथाचे स्वागत करतीलच!
-डॉ. शिरीष पाटील
Varnanatmak Bhashavidnyan