वातावरण
Atmosphere
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
पृथ्वीच्या पृष्ठभागावर, वातावरणात आणि पृथ्वीच्या अंतरंगात जे काही सामावलेले आहे त्या सगळ्यांचा समावेश पर्यावरणात होतो. यामध्ये जमीन, हवा, पाणी निरनिराळ्या वायूराशी, सर्व वनस्पती, सर्व सजीव, खनिजे, नैसर्गिक वायू, खनिजतेल इत्यादींचा समावेश होता. पर्यावरणातील सजीव घटकांपैकी मानव हा एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरणामध्ये प्राणवायुशिवाय अन्यही घटक आहेत. हवेमध्ये सुमारे 80 टक्के नत्रवायु असून बाकी उरलेल्या 20 टक्केमध्ये प्राणवायु सुद्धा आहे.परंतु पर्यावरणाच्या केंद्रस्थानी स्वत:ची स्थिती कायम ठेवून मानवाने नैसर्गिक संतुलन बिघडविण्यास सुरूवात केलेली स्पष्ट दिसून येते. पर्यावरणाचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत्या स्वरूपाचे आहे.
प्रस्तुत पुस्तकात वातावरण परिचय, हवा-हवामान, वातावरणाचे घटक, संघटन, सूर्यप्रकाश आणि तापमान, सौरऊर्जा, तापमान वितरण, वायुभार आणि वारे, ऋतुमानानुसार परिवर्तन, भारपट्टे, वर्गीकरण, आर्द्रता आणि हवामानशास्त्रांचा उपयोगाचा समावेश झालेला दिसून येतो.
Vatavaran
- वातावरण परिचय : वातावरणाची व्याख्या, हवामान व हवा – अर्थ आणि व्याख्या, वातावरण संघटना, वायू, पाण्याची वाफ, धुलीकण, वातावरणाची रचना, सायनिक आधारे संघटन, सममंडळ, विषममंडळ, स्वाभाविक गुणधर्मानुसार, तपांबर, स्थितांबर, दलांबर.
- सूर्यप्रकाश आणि तापमान : अर्थ आणि व्याख्या, सूर्यप्रकाश, सौरऊर्जा, सूर्यप्रकाश वितरण, सूर्यप्रकाशावर परिणाम करणारे घटक, तापमानाचे वर्गीकरण – उभे आणि आडवे.
- वायुभार आणि वारे : वायूभार, वारे, वायुदाब वितरण, वायूभार पट्टे, ऋतुमानानुसार परिवर्तन, भारपट्ट्यांच्या आंदोलनाचे परिणाम, वारे, घटक, वर्गीकरण
- आर्द्रता आणि हवामानशास्त्राचा उपयोग : आर्द्रता, व्याख्या व प्रकार – सांद्रीभवन, धुके, दव, दहिवर, मेघ, वृष्टी, वृष्टी रुपे, पर्जन्य, प्रकार, शेती, वसाहत, स्वास्थ, व्यापार आणि वाहतुकीवरील हवामानाचे वर्चस्व