वाताहत
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रा.डॉ. अनंता सूर हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, हे त्यांच्या परिचयातून स्पष्ट होते. काव्य, कादंबरी, समीक्षा, संपादन या वाड्मय प्रकारात त्यांचा वावर आहे. आता ते ग्रामीण कथेच्या प्रांतात मुशाफिरी करू इच्छितात. मीही त्याच वाटेवरचा एक पथिक असल्याने मला आनंद होणे स्वाभाविकच आहे. म्हणून मी याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करतो.
त्यांची कथा झरी जामनी, वणी जिल्हा यवतमाळ या परिसराचं प्रतिनिधित्व करते. दर बारा कोसावर बोलीभाषा बदलते. तिच्याबरोबर काही संस्कारही बदलतात. हे बदल सूक्ष्म वा ठळक असू शकतात. लेखक आपल्या दृष्टी-कॅमेर्याने ते कसे टिपतो आणि आपल्या लिखाणातून मुरवतो हे फार महत्त्वाचे असते. त्यावर ती कथा सकस, दर्जेदार, लक्षणीय ठरू शकते.
सूर यांची कथा अशा बदलांना धीटपणे सामोरी जाते. ती गावाकडच्या माणसांच्या अंतरंगातून फिरत तेथील सर्व प्रकारचे स्वीकार, विकार त्यांच्या सुष्ट, दुष्ट परिणामांसह पचवून समृद्ध पावते. या माणसांचे प्रश्न अनंत आहेत. त्यातल्या काहींना उत्तरेच नाहीत. कथा वाचल्यावर ‘असे का?’ असा प्रश्न वाचकास पडला तर ‘तसेच असते’ एवढेच त्याचे उत्तर असू शकते. अशा प्रश्नांतून सोडवणूक करण्यासाठी आत्महत्या हा ठेवणीतला यवतमाळी खाक्या इथे क्वचितच वापरला जातो असे दिसते. त्याऐवजी जिवंतपणी मरणाची जोड देणार्या दारूला जवळ करणार्यांचे प्रमाण जास्त आहे. अवैध गोष्टींचे दुष्परिणामही ही माणसं मुकाटपणे भोगतात. खाजगी सावकारी पाशासोबत खाऊजाही आपला दांडका येथील कास्तकाराच्या टाळक्यात मारण्यास सदैव टपून बसलेला असतो. शिवाय गृहकलह तर त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहेत.
अनंता सूर यांच्या कथेला छान ‘सूर’ गवसला आहे. ही कथा दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहे. एवढेच.
– बाबाराव मुसळे, ज्येष्ठ कादंबरीकार, कथाकार
Vatahat
- ग्रहण
- जीवनयुद्ध
- कर्जफेडी
- खून
- घाव
- वाताहत
- झड
- आकांत
- उद्ध्वस्त
- रक्ताचं नातं