Prashant Publications

My Account

वैकासिक मानसशास्त्र

Developmental Psychology

Authors: 

ISBN:

SKU: 9789390483433
Marathi Title: Vaikasik Manasshashtra
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 120
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vaikasik-Manas-Shatra-by-Dr-B-U-Pawar-Dr-Narendra-Deshmukh

145.00

  • DESCRIPTION
  • INDEX

वैकासिक मानसशास्त्राची सुरवात ही पहिल्या महायुद्धाच्या काळात झाली. या काळातच बालकांचा आणि किशोरांचा मानसशास्त्रीय मनोव्यापारांचा अभ्यास केला गेला. उत्क्रांतीवादाचे जनक चार्लस डार्विन यांनी अर्भकांच्या वर्तनाचे वैकासिक स्वरूप मांडले. डार्विन यांच्या संशोधनातूनच बालकांच्या वृत्ताला शास्त्रीय स्थान प्राप्त झाले. समायोजनाच्या दृष्टीने सुरवातीला वैकासिक मानसशास्त्रज्ञांनी वयाचा आणि विकासावस्थांचा अभ्यास केला. 19 व्या शतकाच्या शेवटी पाश्चात्य देशांमध्ये विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरवात झाली. मानसशास्त्रामध्ये हालिंगवर्थ, जीन पीयाजे, स्टॅन्ले हॉल, डार्विन, बुहलर, प्रेसी, कार्ल रॉजर्स, अब्राहम मॅस्लो, कोन्राड लॉरेन्झा, ब्रॉनफेन ब्रेनर, अलबर्ट बांडूरा, बी. एफ. स्किनर, जे.बी. वॉटसन, एरिक एरिक्सन, डॉ. सिग्मंड फ्रॉईड यासारख्या अनेकांनी दीर्घ परिश्रम करून आपापले महत्त्वपूर्ण संशोधन प्रसिद्ध केले. 1970 च्या दशकानंतर मानव विकासासंबंधी विचारप्रवाह अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञांमध्ये दृढ झाला.
प्रस्तुत पुस्तकात जीवनकक्षा दृष्टीकोन, विकासाचे स्वरुप, विकासाचे सिद्धांत, जीवनकक्षा विकास, अनुवंश आणि परिस्थितीजन्य आंतरक्रिया, जन्मपूर्व विकासावस्थेचे घातक घटक आणि धोके, पुनरुत्पादनाची आव्हाने आणि निवड, जन्मपूर्व अवस्थेची गती आणि जन्मप्रक्रिया, नवजात अवस्थेचे मूल्यांकन, शैशावस्थेतील शारीरीक वाढ आणि विकास, कारक, वेदनिक, सांवेदनिक आणि बोधनिक विकास, अध्ययन, स्मृति आणि संकल्पना, भाषा विकास, शारीरिक बदल आणि बोधात्मक बदल, ‘स्व’, भावना आणि नैतिक विकास इ. विविध मुद्द्यांचे सर्वांगिण विवेचन केले आहे.

Vaikasik Manasshashtra

  1. जीवनकक्षा विकासाची ओळख : 1.1 जीवनकक्षा दृष्टीकोन, 1.1.1 जीवनकक्षा विकासात्मक अभ्यासाचे महत्व, 1.1.2 जीवनकक्षा दृष्टीकोनाची वैशिष्ट्ये, 1.1.3 काही समकालीन विवाद, 1.2 विकासाचे स्वरुप, 1.2.1 शारीरिक बोधात्मक आणि मनोसामाजिक विकास प्रक्रीया, 1.2.2 वैकासिक कालखंड, 1.2.3 वयानुसार विकासाचे महत्व, 1.3 विकासाचे सिद्धांत, 1.3.1 मनोविश्लेषण सिद्धांत, 1.3.2 मनोसामाजिक सिद्धांत, 1.3.3 वर्तनवादी सिद्धांत, 1.3.4 सामाजिक बोधनिक सिद्धांत, 1.3.5 जैवपर्यावरणवादी सिद्धांत, 1.3.6 नैतिक अवस्था आचार विज्ञान सिद्धांत, 1.3.7 निवडक सैद्धांतिक ओळख, 1.4 जीवनकक्षा विकासातील संशोधन, 1.4.1 प्रदत्त संकल्पनांच्या पद्धती, 1.4.2 संशोधन आराखडा
    1.4.3 जीवनकक्षा संशोधन
  2. जैविक सुरुवात आणि जन्मपुर्व अवस्था : 2.1 विकासाचा अनुवंशिक पाया, 2.1.1 रंगसुत्रे आणि रंगमणी, 2.1.2 आनुवांशिक तत्वे, 2.1.3 अनुवांशिक देणगी, 2.1.4 गुणसुत्रे आणि जनुकेसंबंधित मनोविकृती, 2.2 अनुवंश आणि परिस्थितीजन्य आंतरक्रिया, 2.2.1 उपजत आणि अनुभवसिद्ध वादविवाद, 2.3 अ) जन्मपूर्व विकासावस्थेचे घातक घटक आणि धोके, ब) पुनरुत्पादनाची आव्हाने आणि निवड, 2.4 जन्मपूर्व अवस्थेची गती आणि जन्मप्रक्रिया, 2.5 नवजात अवस्थेचे मूल्यांकन
  3. शैशावस्था : 3.1 शैशावस्थेतील शारीरीक वाढ आणि विकास, 3.2 कारक, वेदनिक, सांवेदनिक आणि बोधनिक विकास, 3.2.1 कारक विकास, 3.2.2 वेदनिक विकास, 3.2.3 संवेदनिय विकास, 3.2.4 बोधनिक विकास, 3.3 अ) जीन पिपाजे अर्भक विकास उपपत्ती, ब) अध्ययन, स्मृति आणि संकल्पना, 3.4 भाषा विकास
  4. पूर्व बाल्यावस्था : 4.1 शारीरिक बदल आणि बोधात्मक बदल, 4.1.1 शारीरिक बदल, 4.1.2 बोधात्मक बदल, 4.2 अ) पियाजे यांचा पूर्वक्रियात्मक अवस्था, ब) आगोट्स्की सिद्धांत, 4.3 ‘स्व’, भावना आणि नैतिक विकास, 4.3.1 ‘स्व’, 4.3.2 भावनिक विकास, 4.3.3 नैतिक विकास, 4.4 कुटुंब, समवयस्क संबंध आणि खेळ, 4.4.1 कुटुंब, 4.4.2 समवयस्क़ संबंध/समभाव संबंध, 4.4.3 खेळ
RELATED PRODUCTS
You're viewing: वैकासिक मानसशास्त्र 145.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close