व्यक्तिसह- कार्य
Working with Individual
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
मुल्ये मानवतावादावर, मानवधिकाराच्या संकल्पनेवर आधारीत आहेत. लोकशाही तत्वज्ञानातून समाजकार्याची मूल्ये उदयास आली आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने सुस्थितीत जगले पाहिजे. शोषित, वंचित, पिडीत, अभावग्रस्त कोणीही राहू नये ही त्यामागची भावना आहे. सामाजिक न्यायाची भावना, मानव कल्याणाची भावना यामागे आहे. व्यक्तीसहाय्य कार्याच्या मुल्यांना मानवी संस्कृतीचा व मानव सभ्यतेच्या संकल्पनेचा आधार आहे. व्यक्तीनुसार समाज बनत असल्याने आणि समाजानुसार व्यक्ती वर्तन करीत असल्याने व्यक्तीच्या वर्तनाला, विचारांना, आचारांना, दृष्टीकोनाला सामाजिक वातावरणातील, समाजातील घटना आणि घटक प्रभावित करतात.
समाजकार्याचे अभ्यासक्रमाचे विषय हे सामाजिक जाणीव व सामाजिक उपयुक्ततेवर आधारलेले असतात. ते सामाजिक गतीशिलतेची व विकासाची आधारशिला असतात. परंतु यातील बहुतांशी पुस्तकं इंग्रजी भाषेत असून मराठी भाषेतील पुस्तकांची संख्या तशी कमीच आहे. ती अडचण दूर करण्याच्या दृष्टीकोनातून एका महत्वाच्या विषयावर अभ्यासपुर्ण लिखाण मांडण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केला आहे.
Vyaktisah-Karya
- व्यक्तीसहाय्य कार्याची ओळख : व्यक्ती सहाय्य कार्य, व्यावसायिक समाजकार्य, व्यावसायिक समाजकार्याचे महत्व, समाजकार्याच्या पद्धती, सामाजिक व्यक्तीसहाय्य कार्य, व्यक्तीसहाय्य कार्य व्याख्या, सामाजिक व्यक्तीसहाय्य कार्याचा अर्थ, सामाजीक व्यक्तीसहाय्य कार्याचे उद्देश, व्यक्तीसहाय्य कार्याची व्याप्ती
- व्यक्तीसहाय्य कार्याची तत्त्वे/सिद्धांत : व्यक्तीसहाय्य कार्याची तत्वे/सिद्धांत- 1) स्विकार सिद्धांत, 2) अनिर्णयात्मक दृष्टीकोनाचा सिद्धांत, 3) स्वयंनिर्णयाचा सिद्धांत, 4) वैयक्तीकीकरणाचा सिद्धांत, 5) भावनांच्या मर्यादीत गुंतवणूकीचा सिद्धांत, 6) भावनांच्या अर्थपूर्ण अभिव्यक्तीचा सिद्धांत
- व्यक्तीसहाय्य कार्याचे घटक : 1) समस्याग्रस्त व्यक्ती – समस्याग्रस्त व्यक्तीची वैशिष्टे; समस्या, स्थान/संस्था, भौगोलिक कार्यक्षेत्राच्या मर्यादा, कल्याणकारी सेवा/मदत देणार्या संस्था; प्रक्रिया, सामाजिक व्यक्तीसहाय्य कार्य प्रक्रियेचे मुख्य टप्पे; सामाजिक व्यक्तीसहाय्य कार्यकर्ता
- व्यक्तीसहाय्य कार्य प्रक्रियेच्या पायर्या/टप्पे : व्यक्तीसहाय्य कार्य प्रक्रिया; पायर्या/टप्पे- अध्ययन/अभ्यास; अशिलाच्या समस्येचा व्यापक दृष्टीकोनातून अभ्यास, अशिलाच्या जीवनातील विविध बाजूंचा
- व्यक्तीसहाय्य कार्यातील (मदतीकरिता) साधने : मुलाखत – मुलाखतीची व्याख्या, मुलाखतीचे उद्देश, मुलाखतीच्या बाबतीत घ्यावयाची काळजी, मुलाखतीचे फायदे
- व्यक्तीसहाय्य कार्यकर्ता व अशिलाचे सहसंबध : सहसंबधाचे स्वरुप, सहसंबधाचे फायदे/महत्व, व्यक्तीसहाय्य कार्यात अहवाल लेखन, व्यक्तीसहाय्य कार्यातील अहवालाची उद्दिष्ट्ये
- व्यक्ती सहयोग कार्यकर्ता : भूमिका : व्यक्तीसहाय्य कार्यकर्त्याच्या विविध भूमिका – सक्षमीकरण कर्त्याची/सामर्थ्यदात्याची/शक्तीदात्याची भूमिका – सुविधाकरण कर्ता/सुलभीकरणकर्ता, समाज कार्यकर्ता
- व्यक्तीसहयोग कार्यकर्ता : गुणवत्ता : व्यक्तीसहयोग कार्यकर्त्याचे गुण, व्यक्तीसहाय्य कार्यकर्त्याच्या अंगी असलेले कौशल्ये आणि तंत्रे, व्यक्तीसहयोग कार्यकर्त्याच्या विविध भूमिका
- व्यक्ती सहयोग कार्याचा इतिहास आणि विकास : भारतातील व्यक्तीसहयोग कार्याचा इतिहास आणि विकास, भारतातीत व्यावसायिक समाजकार्याची सुरुवात, समाजकार्याचे शिक्षण देणारे विविध अभ्यासक्रम
- व्यक्तीसहयोग कार्याचे विविध मार्ग/दृष्टीकोन (भाग – 1) : व्यक्तीसहयोग कार्याचे (काही निवडक) मार्ग – दृष्टीकोन; व्यक्तीसहयोग कार्याच्या दृष्टीकोन – मार्गविषयक – समस्या समाधानाचा मार्ग
- व्यक्तीसहयोग कार्याचे विविध मार्ग/दृष्टीकोन (भाग – 2) : कौटुंबिक उपचार पद्धत/कुटूंब केंद्रीत उपचार पद्धत – कौटुंबिक उपचार पद्धतीची मान्यता, कौटूंबिक उपचार पद्धतीतील काही महत्वपूर्ण संकल्पना/बाबी