व्यवसाय व्यवस्थापन (भाग 2)
Business Management (Part 2)
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
या पुस्तकात व्यवसाय नियंत्रण, नेतृत्व, समन्वय, व्यवसाय पूर्वानूमान व क्रियात्मक संशोधन, उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन आणि संचालन या घटकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या घटकासंबंधीची सविस्तर माहिती अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत मांडण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. आवश्यक त्याठिकाणी उदाहरणे व तक्ते यांचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय दिला आहे. त्यामुळे हा ग्रंथ आपल्यासारख्या चोखंदळ शिक्षक, अभ्यासक व विद्यार्थी वर्गाच्या अपेक्षा व इच्छा पूर्ण करेल असा, आत्मविश्वास आम्ही मनाशी बाळगून आहोत. या विषयाच्या अध्ययनामुळे व्यवस्थापनशास्त्राच्या उच्चस्तरीय अभ्यासक्रमाशी सांगड साधली जाणार आहे. या पुस्तकाचे लिखाण यु.जी.सी.च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात आले आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि अन्य जिज्ञासु अभ्यासक या ग्रंथाचे सर्वातोपरी स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.
Vyavasay Vyavasthapan (Bhag 2)
- व्यवसायीक नियंत्रण : नियंत्रण म्हणजे काय? नियंत्रण प्रक्रिया किंवा नियंत्रण प्रक्रियेचे टप्पे, परिणामकारक नियंत्रणाचे महत्त्व, नियंत्रणाचे प्रकार, नियंत्रण तंत्रे, अंदाज पत्रकीय नियंत्रण, व्यावसायिक नियोजन आणि व्यवसायिक नियंत्रण यातील सहसंबध.
- व्यवसायीक नेतृत्व : व्यावसायिक नेतृत्वाची व्याख्या, अर्थ, नेतृत्वाचे सिद्धांत किंवा दृष्टीकोन, व्यावसायिक नेतृत्वाची कार्ये, नेतृत्वाच्या शैली/पध्दती
- समन्वय किंवा सुसूत्रीकरण : समन्वय किंवा सुसूत्रीकरण म्हणजे काय? समन्वय आणि सहकार, सुसूत्रीकरणाची ठळक वैशिष्ट्ये, समन्वयाची किंवा सुसूत्रीकरणाची तत्वे/मूलतत्त्वे, समन्वयाचे महत्व
- व्यवसाय पूर्वानुमान आणि क्रियात्मक संशोधन : व्यवसाय पुर्वानुमान व्याख्या आणि अर्थ, व्यवयासपूर्वनुमानाची ठळक वैशिष्ट्ये, व्यवसाय पूर्वनुमानाचे महत्त्व, पूर्वानुमानाची प्रक्रिया, व्यवसाय पूर्वानुमानांची तंत्र, व्यवसाय पूर्वानुमानांची आवश्यकता, व्यवसाय पूर्वानुमानांची पद्धती/प्रकार, व्यवसाय पूर्वानुमानांचे फायदे, व्यवसाय पूर्वानुमानांचा मर्यादा, पूर्वानुमान आणि नियोजन यातील फरक, क्रियात्मक संशोधन, क्रियात्मक संशोधन म्हणजे काय? क्रियात्मक संशोधनाची ठळक वैशिष्ट्ये, क्रियात्मक संशोधनाचे फायदे, क्रियात्मक संशोधनाचा मर्यादा, उद्दिष्टानिष्ठीत व्यवस्थापन.
- उद्दिष्टाधिष्ठीत व्यवस्थापन : उद्दिष्टाधिष्ठीत व्यवस्थापनाची व्याख्या, उद्दिष्टाधिष्ठीत व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टाधिष्ठीत व्यवस्थापनाचे फायदे, उद्दिष्टाधिष्ठीत व्यवस्थापनाच्या मर्यादा आणि समस्या, परिणामकारक उद्दिष्टनिश्चितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे, उद्दिष्टाधिष्ठीत व्यवस्थापनाची प्रक्रिया किंवा तंत्र, उद्दिष्टाधिष्ठीत व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यासाठी आवश्यक शिफारसी किंवा सूचना.
- निर्देशन किंवा संचालन : निर्देशनाचा अथवा संचालनाचा अर्थ आणि व्याख्या, निर्देशनाची वैशिष्ट्ये, निर्देशन किंवा संचालनाचे महत्त्व, लेखी आदेशाचे फायदे, आदर्श किंवा चांगल्या आदेशाची गुण वैशिष्ट्ये, निर्देशनतंत्रे, विचारविनिमय तंत्राचे तोटे, हुकूमशाही किवां एकाधिकारवादी तंत्राचे फायदे, मुक्त संचालन तंत्राचे फायदे, मुक्तसंचालन तंत्राच्या मर्यादा.