व्यावसायिक अर्थशास्त्र
Business Economics
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘व्यावसायिक अर्थशास्त्र’ ह्या पुस्तकाचा उपयोग बी.कॉम. भाग 1 च्या विद्यार्थ्यांसोबतच बी.ए.व एम.ए. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सुध्दा होणार आहे. सदर पुस्तकामध्ये व्यावसायिक आणि प्रबंधकीय अर्थशास्त्र, बाजार संरचना, विविध बाजारपेठांतील किंमत निश्चिती, उत्पादन घटकांच्या किंमतीचे निर्धारण ह्या अर्थशास्त्रातील विविध मूलभूत बाबींचा ऊहापोह केला आहे.
अर्थशास्त्राचा मूळ अभ्यासविषय हा अॅडम स्मिथने संपत्तीचा अभ्यास म्हटले आहे. पुढे त्याचा विस्तार झाला परंतु संपत्ती हा महत्वाचा विचार अर्थशास्त्राचा आहे. संपत्तीच्या निर्मितीकरिता जे प्रयत्न किंवा कार्य करण्यात येते त्यामध्ये व्यवसाय ही संज्ञा महत्त्वाची ठरते. प्रा.जोएल डीन यांचा ’चरपरसशीळरश्र एलेपेाळलीश’ हा ग्रंथ 1951 मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाने ‘व्यावसायिक अर्थशास्त्र’ ही अर्थशास्त्राची नवीन शाखा जन्मास घातली.
Vyavsayik Arthashastra
- व्यावसायिक आणि प्रबंधकीय अर्थशास्त्र : 1.1 व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, स्वरुप, व्याप्ती, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, 1.2 प्रबंधकीय अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये, 1.3 प्रबंधकीय अर्थशास्त्राचे स्वरुप व व्याप्ती, 1.4 प्रबंधकीय अर्थशास्त्राची उद्दिष्टेे आणि महत्व, 1.5 प्रबंधकीय अर्थशास्त्राचा व्यावसायिक अर्थशास्त्र व व्यवसाय व्यवस्थापनाशी परस्पर आंतरसंबंध.
- बाजार संरचना : 2.1 बाजाराचा अर्थ, वैशिष्ट्ये, बाजारपेठांचे वर्गीकरण – 1) वस्तु बाजार 2) व्यवहारानुसार बाजार 3) काळानुसार बाजाराचे प्रकार 4) स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार 5) विस्तारानुसार बाजाराचे प्रकार, 2.2 किंमत यंत्रेणेची कार्यपध्दती, मुक्त अर्थव्यवस्थेत किंमतयंत्रणेचे कार्य, समाजवादी अर्थव्यवस्थेत किंमत यंत्रणेचे कार्य, संमिश्र अर्थव्यवस्थेत किंमत यंत्रणेची भूमिका
- बाजार संरचना : 3.1 एकाधिकारयुक्त स्पर्धा: अर्थ, वैशिष्ट्ये, 3.1 एकाधिकारयुक्त स्पर्धेमध्ये किंमत निर्धारण -अ) वस्तूची किंमत व उत्पादन समायोजनाच्या स्थितीतील संतुलन ब) वस्तूविभेद किंवा उत्पादन वैचित्र्याच्या स्थितीतील संतुलन क) विक्री व्ययाच्या स्थितीतील संतुलन.
- घटक किंमत निर्धारण : 4.1 उत्पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्याचे स्वरुप, वितरणाच्या स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता, 4.2 वितरणाचा सिमांत उत्पादकता सिध्दांत- व्याख्या, गृहिते, टीका. वितरणाचा आधुनिक सिद्धांत-उत्पादन घटकाच्या मागणीला प्रभावित करणारे घटक, उत्पादन घटकांचा पुरवठा, मागणी व पुरवठ्याचे संतुलन. 4.3 मजुरी सिद्धांत: अर्थ, प्रकार- मौद्रीक मजुरी, वास्तविक मजुरी- वास्तविक मजुरी निर्धारित करणारे घटक
- घटक किंमत निर्धारण : 5.1 व्याज: संकल्पना, प्रकार, व्याजाचा समय अभिलाषा सिद्धांत – समय अभिलाषेचे निर्धारक घटक, समय अभिलाषेचे निर्धारण, समय अभिलाषा सिद्धांतावरील टीका, 5.2 व्याजाचा ॠणयोग्य सिद्धांत- ॠणयोग्य रक्कमांची मागणी व पुरवठा, ऋणयोग्य निधीच्या मागणी पुरवठ्याचे संतुलन व व्याजदर, व्याजाच्या ऋणयोग्य निधी सिद्धांतावरील टीका, सिद्धांताचे महत्त्व.
Related products
-
लोकसंख्याशास्त्र
₹180.00 -
आधुनिक बँकिंग प्रणाली
₹250.00