व्यावसायिक संदेशवहन
Business Communication
Authors:
ISBN:
₹175.00 Original price was: ₹175.00.₹160.00Current price is: ₹160.00.
- DESCRIPTION
- INDEX
संदेशवहन ही व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत अव्याहतपणे चालणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. सदरील पुस्तकात विविध गोष्टीचे विवेचन सविस्तरपणे सर्वांना सहज समजेल अशाप्रकारे केलेले आहे. या पुस्तकात संदेशवहन, व्यावसायिक संदेशवहन, संघटनात्मक संदेशवहन, संदेशवहनाचा अर्थ, व्याख्या, प्रभावी संदेशवहनाचा अर्थ, प्रभावी संदेशवहनाची आवश्यकता, व्यावसायिक संदेशवहनाचे महत्व, संदेशवहनाचे घटक, संदेशवहनाची वैशिष्ट्ये, संदेशवहन प्रक्रिया, संदेशवहनाची उद्दिष्टे, संदेशवहनातील अडथळे, अडथळामुक्त संदेशवहनाचा मार्ग, प्रभावी संदेशवहनाचे लाभ, संदेशवहनात विकास-सुधारणा मार्ग, संदेशवहनाची तत्वे, संदेशवहनाचे प्रकार, संदेशवहनाच्या पद्धती, संदेशवहनाची माध्यमे, संघटनात्मक संदेशवहन, जनसंपर्क, सार्वजनिक संवाद इ. मुद्द्यांचे विवेचन केले आहे.
सदरील पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी, सरळ व समजण्यायोग्य आहे. पुस्तक लिहिताना विविध विद्यापीठांचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून लिखाण केल्यामुळे अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना ते निश्चितच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
Vyavsayik Sandeshvahan
- संदेशवहन : व्यावसायिक, संघटनात्मक; अर्थ, व्याख्या, प्रभावी संदेशवहनाचा अर्थ; प्रभावी संदेशवहनाची आवश्यकता, संदेशवहन आणि व्यवसाय विकास, संदेशवहन आणि संघटना विकास
- संदेशवहनाचे महत्त्व : बदलत्या काळानुरुप व्यवसायाची गरज, गुंतागुंतीची व्यवसाय प्रणाली, मोठी बाजारपेठ आणि स्पर्धा, समन्वय साधण्यासाठी, व्यवसायाचा दर्जा/पत/प्रभाव उंचावण्यासाठी (कार्यक्षमता)
- संदेशवहनाचे घटक व वैशिष्ट्ये : संदेशवहनाचे घटक- संदेशदाता, संदेशगृहीता, संदेश, माध्यम, प्रतिसाद; संदेशवहनाची वैशिष्ट्ये- संदेशवहन एक प्रक्रिया आहे, संदेशवहन प्रक्रियेत विविध घटक असतात
- संदेशवहन प्रक्रिया व उद्दिष्ट्ये : संदेशवहन प्रक्रिया; दुहेरी संदेशवहन प्रक्रिया, संदेशवहनाच्या दुहेरी प्रक्रियेतील टप्पे- संदेशवहन, संकल्पना, संदेशाचे संकेतीकरण, संदेशाची निर्मीती, संदेशाचे माध्यम
- संदेशवहनातील अडथळे व मार्ग : अडथळ्याचा अर्थ/अडथळा म्हणजे काय?; संदेशवहनातील अडथळे – संदेशवहन कौशल्याचा अभाव, संदेशदात्याची संदेश मांडणी, संदेशदात्याचा विसराळुपणा/विस्मृती
- प्रभावी संदेशवहन व सुधारणा मार्ग : प्रभावी संदेशवहनाचे ठळक मुद्दे – संदेशवहन कौशल्य विकसीत करा, संदेशवहन माध्यमांचा प्रभावशाली पद्धतीने वापर, संदेशवहनाचा उद्देश निश्चीत करा
- प्रभावी संदेशवहनाची तत्वे : सुस्पष्टतेचे तत्व, परिपुर्णतेचे तत्व, संक्षिप्ततेचे तत्व, अचुकतेचे तत्व, सुसभ्यतेचे तत्व, सातत्याचे तत्व, भरीवपणाचे तत्व, रचनात्मकतेचे तत्व, जागृततेचे तत्व
- संदेशवहनाचे प्रकार : संदेशवहनाचे प्रकार, औपचारीक व अनौपचारीक संदेशवहनातील महत्वाचा फरक; जनप्रवाद संदेशवहन; जनप्रवाद संदशवहनाचे गुण, जनप्रवाद संदेशवहनातील दोष
- संदेशवहनाच्या पद्धती : संदेशवहनाच्या पद्धती; तोंडी/मौखिक संदेशवहनाचे फायदे/गुण – वेळेची बचत, श्रम व पैशाची बचत, मागोवा घेणे सहजशक्य, संदेशाचे सुलभीकरण शक्य
- संदेशवहनाची माध्यमे : संदेशवहनाची माध्यमे, संदेशवहनात माध्यमांची निवड; संदेशवहन माध्यमांचे नियोजन – संदेशाचे उद्देश, संदेशगृहीत्याचा अभ्यास, संदेश निश्चिती, संदेशवहनाकरीता उपलब्ध माध्यम
- संदेशवहन माध्यमांचे प्रकार : संदेशवहन माध्यमांचे प्रकार; छापील माध्यम, व्यवसायाकरीता वर्तमानपत्राची निवड; वर्तमानपत्राची निवड करतांनाच्या बाबी – वर्तमानपत्राचा स्तर/दर्जा,
- जनसंपर्क : व्याख्या, जनसंपर्काची वैशिष्ठ्ये, जनसंपर्काची उद्दिष्टे; जनसंपर्काची तत्वे – सामाजिक प्रतिमेचे तत्व, नावलौकीकाचे तत्व, समतेचे/समानतेचे तत्व, समजून घेण्याचे तत्व
- सार्वजनिक संवाद : कला आणि शास्त्र; व्यावसायिक संवाददात्या प्रबंधकांची भूमिका – सर्वमान्य हितसंवर्धक उद्दिष्ट प्राप्त करणे, व्यवसायात सुसूत्रता निर्माण करणे, परस्परावलंबित्वाची भावना निर्माण करणे