शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन (बी.एड.द्वितीय वर्ष)
Assesement and Evaluation in School Education
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
अनेक संशोधकांच्या मते वारंवार दिल्या जाणाऱ्या चाचण्या ह्या यशस्वी अध्यापनासाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थी कितपत योग्य कृती करत आहेत यांसाठी उपयोगी पडतात. मानसशास्त्रातील चाचण्या आणि मापन यांच्या चळवळीमुळे ‘शैक्षणिक मापन आणि मूल्यमापन’ याला महत्त्व प्राप्त झाले. ‘शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन’ या विषयाचा बी.एड्. अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. या नवीन अभ्यासक्रमावर आधारित प्रस्तुत पुस्तकात मूल्यमापनाची संकल्पना आणि हेतू, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन संबंध दृष्टिकोन, अध्ययनाचे मूल्यनिर्धारण, मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने, शाळांमधील मूल्यनिर्धारणासाठी चाचण्या, शिक्षक निर्मित संपादन चाचणी, मूल्यनिर्धारणाचे नियोजन, संरचना, अंमलबजावणी आणि अहवाल, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापनातील सुधारणा या घटकांची सखोलपणे मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बी.एड्.चे प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक यांना योग्य दिशा मिळावी या हेतूने सदर पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
Shaleya Shikshanatil Mulynirdharan Ani Mulyamapan
1. मूल्यमापनाची संकल्पना आणि हेतू :
1.1 मूलभूत संकल्पना – मापन, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन
1.2 मापन, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन यातील संबंध
1.3 शाळेतील अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि मूल्यमापन
1.4 मूल्यांकन, चाचण्या आणि परीक्षा
2. मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन संबंध दृष्टिकोन :
2.1 मूल्यनिर्धारण, मूल्यांकन आणि मूल्यमापनाचा अर्थ आणि त्यांतील आंतरसंबंध
2.2 मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापनाची तत्त्वे
2.3 वर्तनवादी, बोधात्मक आणि रचनावादी दृष्टिकोन
2.4 मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापनाचे हेतू
2.5 मूल्यनिर्धारणाचे वर्गीकरण
2.6 निरंतर आणि सर्वंकष मूल्यनिर्धारणाची गरज
2.7 शाळाधारित मूल्यनिर्धारण, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन
3. अध्ययनाचे मूल्यनिर्धारण :
3.1 अध्ययनाच्या परिमिती – बोधात्मक, भावात्मक आणि कार्यमान
3.2 बोधात्मक अध्ययनाचे मूल्यनिर्धारण-संकल्पना
3.3 भावात्मक अध्ययनाचे मूल्यनिर्धारण – संकल्पना
3.4 कार्यमानाचे मूल्यनिर्धारण – संकल्पना
3.5 श्रेणी- संकल्पना, प्रकार आणि उपयोजन, श्रेणीची दर्शके, सी.बी.एस.ई. आणि राज्य विकसित दर्शके
3.6 अधिबोधन आणि विकास – निरंतर, आकारात्मक आणि निदानात्मक मूल्यनिर्धारणाची गरज
3.7 कार्यमान कृतींसाठी विषयानुसार स्वाध्याय
3.8 गट कार्याचे मूल्यनिर्धारण – सहयोगात्मक/सहकार्यात्मक अध्ययन आणि सामाजिक कौशल्ये
3.9 स्वयं, सहाध्यायी आणि शिक्षकाचे मूल्यनिर्धारण
4. मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने :
4.1 चाचणीची संकल्पना, स्वयंअहवाल तंत्र, स्वाध्याय, निरीक्षण तंत्र, सहाध्यायी मूल्यनिर्धारण, प्रकल्प कार्य, वादविवाद, शालेयमंडळ उपक्रम.
4.2 गट मूल्यनिर्धारण 1) सहकार्यात्मक अध्ययन आणि सामाजिक कौशल्ये, 2) मूल्यनिर्धारणाची तंत्रे म्हणून सेमिनार आणि अहवाल.
5. शाळांमधील मूल्यनिर्धारणासाठी चाचण्या :
5.1 सामान्य उपयोगात येणाऱ्या चाचण्या – अ) संपादन चाचणी, ब) अभिक्षमता चाचणी, क) संपादन चाचणी विरुद्ध अभिक्षमता चाचणी, ड) कार्यमानाधारित संपादन चाचणी
5.2 निदानात्मक चाचणी आणि उपचारात्मक कृती – अ) निदानात्मक चाचणी, ब) उपचारात्मक कृती
5.3 प्रश्नपेढी आणि तोंडी चाचणी – अ) प्रश्नपेढीचे स्वरुप, गरज आणि महत्व, ब) तोंडी चाचणीचे स्वरुप, गरज आणि महत्व
6. शिक्षक निर्मित संपादन चाचणी :
6.1 शिक्षक निर्मित संपादन चाचणी – संकल्पना आणि हेतू
6.2 शिक्षक निर्मित मूल्यनिर्धारण चाचणी – वस्तुनिष्ठ प्रश्न आणि निबंध वजा प्रश्न
6.3 शिक्षक निर्मित मूल्यनिर्धारण चाचणीची रचना – अनुदेशनात्मक उद्दिष्टे ओळख, आराखडा तयार करणे, संविधान तक्ता तयार करणे, चाचणीतील पदांचे लेखन, योजना तयार करणे.
6.4 शिक्षक निर्मित चाचणीचे प्रशासन
6.5 वर्गखोली मूल्यनिर्धारण
7. मूल्यनिर्धारणाचे नियोजन, संरचना, अंमलबजावणी आणि अहवाल :
7.1 अनुदेशन, अध्ययन आणि मूल्यनिर्धारणातील फरक
7.2 मूल्यनिर्धारणाचे स्वरूप व मार्ग – तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा
7.3 खुले पुस्तक परीक्षा
7.4 चाचणीची रचना व प्रशासनासाठी मार्गदर्शक सूचना
7.5 विद्यार्थ्यांच्या कार्यमानाचे विश्लेषण आणि अन्वयीकरण
7.6 चाचणीतील संपादनावर प्रक्रिया – शेकडेवारीचे गणन, केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे, आलेखात्मक सादरीकरण आणि कार्यमान अन्वयार्थ
7.7 अध्ययन अध्यापनात सुधारणेसाठी प्रत्याभरण
8. मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापनातील सुधारणा :
8.1 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2010 मध्ये प्रतिबिंबित परीक्षा व मूल्यमापनावरील धोरणात्मक दृष्टिकोन
8.2 सर्वंकष निरंतर मूल्यमापन
8.3 प्रश्नपेढीची तयारी आणि उपयोग
8.4 श्रेणी मूल्यनिर्धारणाचे आणि मूल्यमापनाचे उपयोग
8.5 गुणवत्ता यादीसाठी शततमकाचे उपयोजन
8.6 ऑनलाईन परीक्षा