शाहिरी मानवंदना
(पोवाडा लेखन)
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
महाराष्ट्रातील एकूण लोककला प्रकारातील ‘पोवाडा’ हा कला प्रकार अत्यंत प्रभावी, लोकप्रिय व उर्जेची अखंड ज्योत प्रज्वलित करणारा असा कला प्रकार आहे. गद्य व पद्य मिश्रित या काव्य प्रकारात सूर, ताल, छंद, अलंकारिकता, प्रतीकात्मकता, बिंबात्मकता व गेयता यांचे सुंदर व अद्भूत असे मिश्रण आपल्याला बघायला व अनुभवयाला मिळते. अगदी बाराव्या शतकात ज्ञानदेवांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीपासून ते एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकापर्यंत या काव्य प्रकाराने जन मानसाला भूरळ घातली आहे. त्यामुळे पोवाडा या काव्यप्रकाराची प्रत्येक कालखंडात भरभराट झालेली आपणास दिसून येते. एखाद्या राजा महाराजाचे, संत व समाजसुधारकाचे, क्रांतिकारक तथा थोर सेनानी किंवा साहित्यिक कलावंताचे ओजस्वी व ओघवत्या शैलीत चरित्र प्रतिपादीत करण्यासाठी सातत्याने या काव्य प्रकाराचा सहारा घेतला जातो. या काव्य प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे हा लिहितांना पद्य शैलीमध्ये लिहिला जातो परंतु प्रतिपादीत करतांना गद्य व गेय संगीत शैलीमध्ये प्रतिपादीत केल्या जातो. त्यामुळे दृक व श्राव्य अशा दोन्ही माध्यमांमध्ये पोवाडा या काव्यप्रकाराचे अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लिहिलेले हे पुस्तक त्यातील एक महत्त्वपूर्ण व संग्रही ठेवावे असे पुस्तक आहे. ज्यामध्ये त्यांनी खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी पासून ते दिनबंधू राजीव दिक्षित पर्यंत 74 पोवाडे लिहिले असून शेवटी 75व्या पोवाड्याच्या माध्यमातून संपूर्ण शहिदांना वंदन केले आहे.
– प्रा. सुनील कुलकर्णी
संचालक, विद्यार्थी विकास विभाग,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
Shahiri Manvandana (Powada Lekhan)
1. कवयित्री बहिणाबाई चौधरी, 2. महाराणा प्रताप, 3. राजमाता जिजाऊ माँसाहेब, 4. छत्रपती शिवाजी महाराज, 5. छत्रपती संभाजी महाराज, 6. गुरू गोविंद सिंह, 7. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, 8. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, 9. वस्ताद लहुजी साळवे, 10. तात्या टोपे, 11. श्रीमंत नानासाहेब पेशवे, 12. महात्मा ज्योतिबा फुले, 13. झाशीची राणी लक्ष्मीबाई, 14. हुतात्मा मंगल पांडे, 15. झलकारीबाई, 16. सावित्रीबाई फुले, 17. बंकिमचंद्र चटर्जी, 18. तंट्या मामा भिल, 19. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, 20. आ. वासुदेव बळवंत फडके, 21. गोपाळ गणेश आगरकर, 22. मा. लोकमान्य टिळक, 23. महर्षी धोंडो केशव कर्वे, 24. देशभक्त गोविंद गुरू, 25. रविंद्रनाथ टागोर, 26. मादाम भिकाजी कामा मॅडम, 27. स्वामी विवेकानंद, 28. लाला लजपतराय, 29. भारतसेवक गोपाळकृष्ण गोखले, 30. चाफेकर बंधु, 31. महात्मा गांधी, 32. महाराज सयाजीराव गायकवाड, 33. महर्षी अरविंद घोष, 34. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, 35. राजर्षी शाहू महाराज, 36. लोहपुरुष वल्लभभाई पटेल, 37. क्रांतीकारी बिरसा मुंडा, 38. चक्रवर्ती राजगोपालचारी, 39. सरोजिनी नायडू, 40. स्वातंत्र्यवीर सावरकर, 41. क्रांतीवीर खाज्या नाईक, 42. डॉ.राजेंद्र प्रसाद, 43. हुतात्मा मदनलाल धिंग्रा, 44. कर्मवीर भाऊराव पाटील, 45. क्रांतीवीर खुदिराम बोस, 46. भारतरत्न मौलाना आझाद, 47. डॉ. केशवराव हेडगेवार, 48. पंडित जवाहरलाल नेहरू, 49. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 50. आचार्य विनोबाजी भावे