श्री एकनाथ महाराजांची निवडक भारुडे
Authors:
ISBN:
₹70.00
- DESCRIPTION
- INDEX
संतसाहित्याची चिकित्सा स्वातंत्र्यपूर्ण काळापासून आजतागायत चालू आहे. समाजशास्त्रीय दृष्टीने संतसाहित्याचे अवलोकन करताना नाथवाड्ःमयातील भारुड रचनेचा आवर्जून उल्लेख केला जातो. नाथांसारख्या व्युत्पन्न कवीची ही रचना सर्वसामान्यांना आकलन होण्याच्या दृष्टीने लिहिलेली आहे. समाजाच्या विविध स्तरातील सामान्य माणसे नाथांनी आपल्या कवितेत उभी केली. त्यांची दुःखे, त्यांची वेदना, त्यांचे मन भारुडामधून व्यक्त झाले. दुसर्या बाजूने विचार केला तर समकालीन सामान्य जनांचा एक पट नाथांनी भारुडांमधून चित्रित केला. नाथकालीन समाजचित्रण या दिशेनेही भारुडांचा विचार करता येईल. भारुड या वाड्ःमय प्रकाराचे एक अंग लिखित संहितेचे असले तरी दुसरे अंग सादरीकरणाचे आहे. नृत्यनाट्याच्या माध्यमातून भारुडे सादर करणारी परंपरा महाराष्ट्राने सांभाळली. लोकसूहाचे प्रबोधन करणे, लोकसमूहाला दिशा देणे, सामान्य जनांना विचार प्रवृत्त करणे असाही विचार नाथांच्या भारुडांमध्ये बघता येतो. नाथांनी जेवढे विविध रचनाबंध काव्य लेखनासाठी हाताळले, तेवढे क्वचितच दुसर्या कवीने हाताळलेले आढळतील. महाराष्ट्रात बहुरुढ झालेल्या भारुडाने महाराष्ट्राची बहुजिनसी संस्कृती आपल्या डोळ्यासमोर उभी केली. अध्यात्म आणि समाजदर्शन या दोन्ही अंगानी महाराष्ट्राची सत्त्वशील परंपरा जनत करण्याचे काम भारुड वाड्ःमयाने केले आहे. केवळ मनोरंजन हे नाथांच्या भारुडाचे प्रयोजन कधीच नव्हते. नाथकालीन प्रबोधनाच्या कल्पना समजावून घेण्याच्या दृष्टीने ही भारुडांचा अभ्यास महत्वाचा ठरावा.
Shri Ekanath Maharajanchi Nivadak Bharude