संक्षिप्त मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
मध्ययुगीन कालखंडात मराठी वाङ्मय हे वेगवेगळ्या रूपांत अवतरलेले दिसते. या काळात मराठी वाङ्मयनिर्मितीला सुरुवात झाली. मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ व पहिला पद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ यांची याच काळात रचना झाली. महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय या दोन महत्त्वाच्या संप्रदायांचा उगमही याच काळात झाला. महाराष्ट्राचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन या संप्रदायांनी समृद्ध केले आहे. त्यातून समाजात मानवी जीवनमूल्ये रुजली. शाहिरी वाङ्मय हा संत-पंत वाङ्मय प्रवाहांपेक्षा एक वेगळाच वाङ्मयप्रवाह मध्ययुगात जन्माला आला. बखर वाङ्मयाने इतिहास आणि वाङ्मय यांचे अनोखे नाते निर्माण केले. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे वाङ्मय, पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय अशी विविध प्रकारची वाङ्मयनिर्मिती या कालखंडात विपुल प्रमाणात झाली.प्रस्तुत पुस्तकात महानुभाव संप्रदायाचे गद्य-पद्य वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे पद्य वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय यासोबतच या वाङ्मय प्रवाहांमधील काही निवडक ग्रंथकार व काही निवडक साहित्यकृती तसेच महत्त्वाचे ग्रंथकार व त्यांच्या साहित्यकृती, ग्रंथकाराचे लौकिक जीवन व वाङ्मयीन कर्तृत्व यांचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. प्रस्तुत पुस्तक हे वाचकांना व अभ्यासकांना वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासासाठी निश्चितच लाभदायक ठरेल यात शंका नाही.
Madhyayugin Marathi Vangmayacha Itihas
- महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय : 1.1 महानुभाव संप्रदाय : तत्त्वज्ञान व आचारधर्म, 1.2 महानुभाव संप्रदायाचे पद्य व गद्य वाङ्मय, 1.3 महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मयाची वैशिष्ट्ये
- शाहिरी वाङ्मय : 2.1 शाहिरी काव्य : प्रेरणा व भूमिका, 2.2 शाहिरांचे पोवाडा व लावणी वाङ्मय, 2.3 शाहिरी काव्याची वैशिष्ट्ये
- वारकरी संप्रदायाचे वाङ्मय : 3.1 वारकरी संप्रदाय : तत्त्वज्ञान व आचारधर्म, 3.2 वारकरी संप्रदायातील प्रमुख संतकवींच्या रचना, 3.3 वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाची वैशिष्ट्ये
- बखर वाङ्मय : 4.1 बखरलेखन : प्रेरणा व भूमिका, 4.2 बखर वाङ्मय, 4.3 बखरलेखनाची वैशिष्ट्ये
- निवडक ग्रंथकार : 5.1 म्हाइंभट, 5.2 ज्ञानेश्वर, 5.3 अनंत फंदी, 5.4 मल्हार रामराव चिटणीस
- निवडक साहित्यकृती : 6.1 दृष्टांतपाठ, 6.2 तुकारामगाथा, 6.3 सुंदरा मनामध्ये भरली, 6.4 भाऊसाहेबांची बखर