संरक्षण पत्रकारिता
Defence Journalism
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
संरक्षण पत्रकारिता या पुस्तकात संरक्षण शास्त्र आणि पत्रकारिता हे दोन्ही विषय संतुलीतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विषयाचे आकलन चटकन व्हावे म्हणून या ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या भाषेत, मुद्देसूद केलेली आहे.
सदरील पुस्तकात संरक्षण पत्रकारितेचा आढावा घेतला आहे. संरक्षण मंत्रालयापासून संरक्षण संघटना, संरक्षणावरील संसदीय नियंत्रण व विविध सेनाविभागांची माहिती देण्यात आली आहे. सुरक्षा व परराष्ट्रीय धोरण तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा स्थितीचे अवलोकन केले आहे. संरक्षण परिभाषा व विविध समारंभ, सेनादलातील अलंकरणे व पदके याविषयी माहिती दिली आहे. संरक्षणविषयक बातम्यांचे प्रकार, स्त्रोत आणि संरक्षण पत्रकाराचे कार्य व स्वरुप याचे विवेचन केलेले आहे. वृत्त, वृत्तांत व लेखाचे लेखन करण्याची पद्धती व स्वरुप स्पष्ट करतांना संरक्षण पत्रकाराने लेखन करतांना घेण्याच्या दक्षतेबद्दल मार्गदर्शन केले आहे. संरक्षण लेखनातील अडथळे, नैतिकता, कायदे व संरक्षण पत्रकारितेतील समस्यांचा उहापोह केलेला आहे. संरक्षण पत्रकाराची साधने व पत्रकारिता करतांना साह्यभूत ठरणार्या बाबींवर प्रकाश टाकलेला आहे. संरक्षण पत्रकारितेचे कार्य स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेत माध्यमांच्या भूमिकेचे विश्लेषण केले आहे. परिशिष्टात संरक्षण पत्रकारांना कामात येतील अशा बाबी समाविष्ट केल्या आहेत. हे पुस्तक पत्रकार, पत्रकारितेचे व संरक्षणशास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
Sanrkshan Patrakarita
- संरक्षण पत्रकारिता : अ) संरक्षण पत्रकारितेचे स्वरुप आणि परिचय, ब) संरक्षण पत्रकारितेचा इतिहास, क) भारतातील संरक्षण पत्रकारिता, ड) नागरी आणि संरक्षण पत्रकारितेतील फरक, इ) संरक्षण पत्रकारिता – एक व्यवसाय
- संरक्षण संघटना, रचना आणि यंत्रणा : अ) संरक्षण मंत्रालय, ब) संरक्षणावरील संसदीय नियंत्रण, क) भारताच्या संरक्षण दलांचा परिचय : स्थलसेना, वायुसेना, नौसेना, तटरक्षक दल, प्रादेशिक सेना, राष्ट्रीय छात्रसेना, ड) संरक्षण उत्पादन विभाग, इ) संरक्षण संशोधन आणि विकास संघटना
- सुरक्षा व परराष्ट्र धोरण : अ) भारत व इतर देशांचे परराष्ट्रीय आणि सुरक्षा धोरण, ब) जागतिक राजकारणाचे परिदृष्य, क) जागतिक संघटना, ड) संरक्षण अर्थ संकल्प, ड) संयुक्त लष्करी सराव
- संरक्षण परिभाषा आणि समारंभ : अ) संरक्षण क्षेत्राविषयीच्या परिभाषा आणि संक्षिप्त रुपे, ब) शस्त्र व शस्त्र प्रणालीविषयीच्या परिभाषा, क) सन्मान आणि पदके, ड) संरक्षणविषयक समारंभ
- संरक्षण वृत्तसंकलन : अ) संरक्षण विषयक बातम्यांचे प्रकार, ब) संरक्षण बातम्यांचे स्रोत, क) संरक्षण पत्रकार : कार्य आणि स्वरुप, ड) आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
- संरक्षण वृत्त लेखन : अ) संरक्षण वृत्तलेखन, ब) वृत्तलेखनाचे स्वरुप, क) संरक्षण – वृत्तांतलेख, लेख आणि मुलाखती, ड) संरक्षण पत्रकारिता करतांना घ्यावयाची सावधगिरी
- संरक्षण लेखनातील अडथळे : अ) माध्यम नैतिकता, ब) माध्यमविषयक कायदे, i. वृत्तपत्र आणि ग्रंथ नोंदणी कायदा 1867, iii. गोपनियता अधिनियम 1923, क) संरक्षण पत्रकारितेसमोरील समस्या – राजकीय दबाव, शासकीय गुप्तता
- संरक्षण पत्रकारितेची साधने : अ) संरक्षण क्षेत्राचा जनसंपर्क विभाग, ब) संरक्षण क्षेत्रातील विविध संस्थांच्या अधिकारीक वेबसाईटस्, क) जनसंवाद प्रकाशने, अहवाल आणि वार्षिक पुस्तके, ड) संरक्षण तज्ज्ञ आणि सेवानिवृत्त लष्करी अधिकारी
- संरक्षण पत्रकारितेचे कार्य : अ) जनतेला संरक्षण समस्यांची माहिती देणे, ब) राष्ट्रहिताचे संरक्षण, क) सुरक्षा दल आणि जनता यात दुव्याचे कार्य करणे, ड) राष्ट्रीय सुरक्षेविषयी जागरुकता वाढविणे
- राष्ट्रीय सुरक्षेत माध्यमांची भूमिका : अ) युद्धकाळातील वृत्तलेखन, ब) शांतताकालीन वृत्तलेखन, क) संघर्ष, दहशतवाद आणि हिंसाचाराचे वृत्तलेखन, ड) मानवी हक्काचे आव्हान
परिशिष्ट :
- परिशिष्ट 1 : संरक्षण खर्चातील भरीव वाढीअभावी सेनादलांचे आधुनिकीकरण प्रभावित!
- परिशिष्ट 2 : भारताचा आजवरचा संरक्षण खर्च
- परिशिष्ट 3 : भारताचे स्वातंत्र्यापासून आजवरचे संरक्षण मंत्री
- परिशिष्ट 4 : सेनादल फार्म विभाग बंद करण्याचा निर्णय
- परिशिष्ट 5 : पूर्व परवानगीशिवाय अमेरिकेची युद्धनौका भारतीय जलक्षेत्रात
- परिशिष्ट 6 : सशक्त माध्यमांची बेताल वर्तणूक
- परिशिष्ट 7 : International Press Institute: Recommoendations to News Organisations for Improving Journalst Safety
- परिशिष्ट 8 : सीमा आणि सागरी सीमा