Prashant Publications

My Account

संशोधन पद्धती

Research Methodology

Authors: 

ISBN:

SKU: 9789380638300
Marathi Title: Sanshodhan Paddhati
Book Language: Marathi
Published Years: 2017
Edition: Fourth
Ebook Link: https://www.kopykitab.com/Sanshodhan-Paddhati-by-DR-Va-Bha-Patil

675.00

  • DESCRIPTION
  • INDEX

संशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्‍या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.
सदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.

Sanshodhan Paddhati

सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर, एम.फिल., पीएच.डी.
नेट-सेट परीक्षा तसेच संशोधकांना उपयुक्त व माहितीपूर्ण संदर्भ ग्रंथ

1. संशोधनाचे प्रकार, 2. शास्त्रीय संशोधन पद्धती, 3. सामाजिक संशोधन आणि संशोधक, 4. प्रायोगिक संशोधन पद्धती, 5. सर्वेक्षण पद्धती, 6. नमुना पद्धती, 7. तुलनात्मक पद्धती, 8. ऐतिहासिक पद्धती, 9. अनुसूची पद्धती, 10. परीक्षणात्मक पद्धती, 11. निरीक्षण पद्धती, 12. राज्यशास्त्राची संशोधन पद्धती, 13. राज्यशास्त्राची शास्त्रीय अभ्यास पद्धत, 14. राज्यशास्त्रातील क्रियान्वित पद्धती, 15. सांख्यिकी पद्धती – उपयोग आणि मर्यादा, 16. सांख्यिकीय पद्धत/तंत्रे, 17. शैक्षणिक संशोधन, 18. साहित्यातील संशोधन, 19. अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती, 20. मानसशास्त्रीय संशोधन, 21. व्यष्टी अध्ययन/विशिष्टाभ्यास/घटकाभ्यास पद्धती, 22. भाषाशास्त्रीय संशोधन, 23. संशोधन तंत्रे, 24. सिद्धांत आणि संशोधन, 25. गृहितकृत्ये, 26. संशोधन आराखडा, 27. आशय विश्लेषण, 28. प्रश्नावली, 29. मुलाखत, 30. तथ्य संकलन, 31. तथ्यांचे/सामुग्रीचे विश्लेषण व निर्वचन/अर्थशोधन, 32. संशोधनातील समस्या सूत्रण, 33. चर किंवा परिवर्त्य/चल, 34. संशोधन अहवाल, 35. संगणकाचे संशोधनात योगदान, 36. शोधकार्यात इंटरनेट

RELATED PRODUCTS
You're viewing: संशोधन पद्धती 675.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close