संशोधन पद्धती आणि बौद्धिक संपदा
Research Methodology and Intellectual Property
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
नवीन अभ्यासक्रमावर आधारित संशोधन पद्धती व बौद्धिक संपदा हे पुस्तक विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय? संशोधन कसे व का करावे? संशोधनाच्या पद्धती कोणत्या? याचे सविस्तर ज्ञान देण्यास उपयुक्त असून संशोधन करताना संशोधकाने कोणत्या नियमाचे पालन करावे? कोणत्या बाबी लक्षपूर्वक हाताळाव्या याचे सविस्तर ज्ञान बौद्धिक संपदा या प्रकरणाद्वारे करून देण्यास पूरक आहे. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच पीएच.डी. करताना संशोधनाबद्दल जे ज्ञान संशोधकांना आवश्यक असते. शोध प्रबंध तयार करताना कशाप्रकारे तयार करावा. प्रबंध तयार करताना आवश्यक घटक याची पूर्तता कशी करावी याविषयीचे ज्ञान, या सर्वांच्या पायऱ्या, याचे पूर्वज्ञान व पूर्वतयारी या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून होणार असून सदर पुस्तिका विद्यार्थ्यांना, संशोधकांना तसेच प्राध्यापकांकरिता उपयुक्त ठरणार आहे.
प्रकरण 1 : संशोधनाचा परिचय आणि संशोधन समस्या
1.1 संशोधन- अर्थ, परिभाषा व्याप्ती आणि उद्देश
1.2 संशोधनाचे वर्गीकरण- सैद्धांतिक / मौलिक / शुद्ध, व्यावहारिक, क्रियाशील संशोधन
1.3 सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट संशोधकाचे गुण
1.4 संशोधन समस्या- अर्थ आणि संशोधन समस्या अर्थपूर्ण होण्यासाठी आवश्यक अटी
1.5 गृहअर्थशास्त्राची सामाजिक समस्या सोडवण्यात भूमिका
प्रकरण 2 : संशोधन समस्या आणि संशोधन आराखडा
2.1 संशोधन आराखड्याचा अर्थ व परिभाषा
2.2 संशोधन आराखड्याचे वर्गीकरण
2.3 गृहीतकृत्याचा अर्थ व परिभाषा
2.4 साहित्य समीक्षेची संकल्पना व स्रोत
2.5 तथ्य संकलन स्रोत- प्राथमिक आणि द्वितीय
प्रकरण 3 : तथ्य संकलन आणि गृहीतके
3.1 नमुना निवडीचा अर्थ व वैशिष्ट्ये
3.2 नमुना निवडीचे प्रकार- संभाव्यता नमुना निवड, गैरसंभाव्यता नमुना निवड
3.3 संशोधन प्रस्ताव- संकल्पना आणि प्रकार
3.4 तथ्य निर्वचन
3.5 सांख्यिकी तंत्र- मध्य, मध्यगा, बहुलक
प्रकरण 4 : नमुना निवड आणि साहित्य समीक्षा
4.1 संशोधन अहवाल- परिचय आणि उद्देश
4.2 सांख्यिकीय तथ्याचे आलेखाद्वारे प्रस्तुतीकरण
4.3 प्रबंधाचे घटक- प्रस्तावना, साहित्य समीक्षा, संशोधन पद्धती, परिणाम आणि चर्चा, सारांश, निष्कर्ष आणि शिफारशी
4.4 प्राथमिक विभाग
4.5 संदर्भ विभाग व परिशिष्ट
प्रकरण 5 : सांख्यिकीय विश्लेषण व बौद्धिक संपदेचा परिचय
5.1 बौद्धिक संपदा- परिचय आणि संकल्पना
5.2 बौद्धिक संपदा अधिकार- व्याप्ती आणि प्रकार
5.3 बौद्धिक संपदेचे अधिकार आणि भारत
5.4 कॉपीराईट आणि कॉपीराईट संबंधित अधिकार
5.5 पेटंट-पेटंट लिहिण्याचे तंत्र