संशोधन पद्धती वाणिज्य व व्यवस्थापन
Research Methodology in Commerce and Management
Authors:
ISBN:
₹160.00
- DESCRIPTION
- INDEX
ज्ञान प्राप्त करण्याच्या हेतूने संशोधन कार्य केले जातात. त्याचे प्रमाण्य पुन्हा पुन्हा परिक्षण पाहण्याचे कार्य संशोधनात केले जाते. नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित स्वीकृत निष्कर्ष व सिद्धांताचे पूर्ण प्रशिक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी किंवा प्रयोग करणे म्हणजे संशोधन होय. सुक्ष्म विचार, मीमांसा, शुद्धीकरण, नेमकेपणा, दुरुस्ती शोध, संशोधन म्हणजे तथ्यांचा शोध घेणे, एखादी वस्तू निर्माण करणे, नव्याने निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक करणे, एखाद्या सिद्धांताचे समर्थन करणे किंवा खंडण करणे, जुन्या तथ्यांचा जुन्या तत्वांचा पुर्नशोध घेणे. नवी तत्वे, नवी तथ्ये शोधून काढणे इ. प्रत्येक अध्ययन विषयात ज्या संकल्पना, सिद्धांत निष्कर्ष स्वीकृत झालेले आहेत त्यांचे प्रामाण्य पुन्हा पुन्हा तपासून पाहणे हे अध्ययन विषयाच्या अभ्यासकांचे कार्य आहे. जे सिद्धांत विभिन्न शास्त्रात प्रस्थापित झालेले आहेत त्याची विश्वासार्हता तपासून पाहणे हे संशोधकाचे आहे. तथ्यांवर वारंवार तपासणी केली जाते आणि त्याची चाचणी केली जाते तेव्हा सत्य स्थापन केले जाते त्यास संशोधन असे म्हणतात.
प्रस्तुत पुस्तकात संशोधन पद्धती, संशोधन प्रक्रिया, संशोधनातील वाङ्मयचौर्य, संशोधन आराखडा, संशोधन आराखड्याचे प्रकार, नमुना आराखडा, माहिती व्यवस्थापन, तथ्य संकलन, अनुमापन तंत्र, गृहितकृत्ये परिक्षण, निर्वचन व अहवाल लेखन इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे.
Sanshodhan Paddhati Vanijya V Vyavasthapan
- संशोधनाची ओळख : 1.1 संशोधन अर्थ व व्याख्या 1.2 चांगल्या संशोधनाचे गुण वैशिष्ट्ये 1.3 व्यवसाय संशोधनाचे महत्व आणि गरज 1.4 संशोधनातील आव्हाने आणि समस्या 1.5 संशोधनासाठी सायबर मार्ग
- संशोधनाची पद्धती : 2.1 अर्थ व व्याख्या 2.2 संशोधन प्रक्रियेतील टप्पे 2.3 व्यष्टी अध्ययन – अर्थ व व्याख्या 2.4 व्यष्टी अध्ययनाची वैशिष्ट्ये 2.5 व्यष्टी अध्ययनात समाविष्ट पायर्या 2.6 साहित्यीक अध्ययन
- नमुना निवड आणि नमुना आराखडा : 3.1 नमूना निवड अर्थ व व्याख्या 3.2 नमुना निवडीची गरज 3.3 नमूना निवडीतील पायर्या 3.4 चांगल्या नमुना निवडीचे घटक 3.5 नमुना निवडीच्या पध्दती 3.6 नमुनाकरणत्रुटी 3.7 गैर-नमुनाकरणत्रुटी
- तथ्य संकलन आणि सांख्यिकीय साधने : 4.1 अर्थ व व्याख्या 4.2 तथ्याचे प्रकार 4.3 तथ्य संकलनाची तंत्रे किंवा पध्दती माध्यम 4.4 प्रश्नावली तयार करतांना महत्त्वाच्या बाबी 4.5 अनुसूची निर्मिती करतांना महत्त्वाच्या बाबी 4.6 प्रश्न निवडणे 4.7 मापनाच्या शलाका 4.8 सुयोग्य मापनाच्या कसोट्या 4.9 सांख्यिकीय विश्लेषण
- गृहितकृत्यांचे परिक्षण : 5.1 गृहीत कृत्याचा अर्थ 5.2 गृहीतकृत्याची उगमस्थाने 5.3 गृहीतकृत्याचे महत्त्व 5.4 गृहीताची चाचणी 5.5 श्रेष्ठ गृहितकृत्याचे गुण 5.6 गृहितकृत्ये परिक्षणाच्या पायर्या 5.7 गृहितकृत्ये परिक्षणाचा आकृतीबंध 5.8 गृहितकृत्ये परिक्षणाचे प्रकार
- निरवचन आणि अहवाल लेखन : 6.1 निरवचन अर्थ 6.2 निरवचनाची तंत्रे 6.3 निरवचन करतांना घ्यावयाची दक्षता/सावधानी 6.4 अहवाल लेखन – अर्थ 6.5 अहवाल लेखनाचे महत्त्व 6.6 चांगल्या संशोधन अहवालचे घटक 6.7 हवालातील पायर्या 6.8 संशोधन अहवालाचा आकृतिबंध 6.9 संशोधन अहवालाचे प्रकार 6.10 अहवाल लेखनातील घ्यावयाच्या दक्षता 6.11 एपीए शैली 6.12 अमेरिकेतील आधुनिक भाषा संघटना (आमदार)