संशोधन पद्धती संख्यात्मक आणि गुणात्मक
Research Methodology Quantitative and Qualitative
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
एखादी समस्या वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पद्धतीने व सुव्यवस्थितपणे सोडवणे म्हणजे संशोधन होय. संशोधन ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया वस्तुनिष्ठ असते. या प्रक्रियेद्वारे प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. समस्येची उकल केली जाते. प्रश्नांची उत्तरे शोधतांना किंवा समस्येची उकल शोधतांना वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. प्रत्येक संशोधकाचा आपल्या संशोधनातून सत्य जगापुढे आणण्याचा प्रयत्न असतो. म्हणूनच योग्य, प्रमाणित मापन साधनाद्वारे माहिती संकलित केली जाते. माहिती संकलित करतानाही ती योग्य न्यादर्शाकडूनच व्हावी याची दक्षता ठेवली जाते. त्या माहितीच्या स्वरुपावरुन योग्य संख्याशास्त्रीय परिमाणांचा उपयोग केला जातो व त्यावरुन अचूक निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न असतो. यावरुन संशोधक सत्य शोधण्याचाच प्रयत्न करीत असतो. दैनंदिन जीवनातही आपण वैज्ञानिक पद्धतीच्या पायऱ्यांचा उपयोग करुन समस्या सोडवत असतो व त्या अनुषंगाने ज्ञान मिळवत असतो.
प्रस्तुत पुस्तकात संशोधनाची संकल्पना स्पष्ट करून संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींचा उहापोह करण्यात आलेला आहे. संशोधन करण्यासाठी, संशोधन हा विषय शिकवण्यासाठी, संशोधनातील विविध संकल्पना समजवून घेण्यासाठी या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.
Sanshodhan Paddhati Sankhyatmak Aani Gunatmak
- शैक्षणिक संशोधनाची ओळख : 1.1 संशोधनाची संकल्पना, 1.2 संशोधनाची वैशिष्ट्ये/स्वरूप, 1.3 वैज्ञानिक पध्दती : संकल्पना, 1.3.1 वैज्ञानिक पध्दतीच्या पायऱ्या, 1.3.2 वैज्ञानिक पध्दतीचे वैशिष्ट्ये, 1.4 शैक्षणिक संशोधन, 1.4.1 शैक्षणिक संशोधनाच्या व्याख्या, 1.4.2 शैक्षणिक संशोधनाची वैशिष्टे, 1.4.3 शैक्षणिक संशोधनाचा हेतू किंवा गरज, 1.5 संशोधनाचे प्रकार, 1.5.1 संशोधनाच्या हेतूनुसार प्रकार, 1.5.2 संशोधनाच्या पध्दतीनुसार प्रकार, 1.5.3 माहिती संकलित करण्याच्या पद्धतीवर संशोधनाचे वर्गीकरण.
- संशोधन आराखडा लेखन : 2.1 संशोधन आराखड्याची संकल्पना, 2.1.1 संशोधन आराखड्याच्या व्याख्या, 2.2 संशोधन आराखड्याची गरज, 2.3 चांगल्या संशोधन आराखड्याचे वैशिष्ट्ये, 2.4 संशोधन आराखडा लेखनाची पूर्वतयारी, 2.5 संशोधन आराखडा लेखनाच्या पायऱ्या, 2.6 संशोधन समस्येची ओळख आणि निवड, 2.6.1 संशोधन समस्या : अर्थ, 2.6.2 समस्येची ओळख व निवड, 2.6.3 संशोधन समस्या निवडतांना लक्षात ठेवण्यासाठी निकष, 2.6.4 चांगल्या संशोधन समस्येचे वैशिष्टे, 2.6.5 शैक्षणिक संशोधनाची क्षेत्रे, 2.7 समस्येचे शीर्षक/संशोधन समस्येचे शब्दांकन.
- संशोधन आराखडा पायऱ्यांचे लेखन : 3.1 संशोधनाची प्रस्तावना, 3.2 संशोधनाची गरज, 3.3 संशोधन विषयाचे महत्व, 3.4 समस्या विधान, 3.5 उद्दिष्टे, 3.6 गृहीतके, 3.7 परिकल्पना, 3.7.1 परिकल्पनेचे प्रकार, 3.8 संज्ञाच्या कार्यात्मक व्याख्या, 3.9 व्याप्ती, मर्यादा आणि परिमर्यादा, 3.10 संदर्भीत संदर्भाचा अभ्यास, 3.10.1 संबंधित संदर्भाच्या अभ्यासाची व आढाव्याची गरज, 3.10.2 संबंधित साहित्याचे व संशोधनाचे स्त्रोत, 3.11 संशोधनाची कार्यपद्धती, 3.12 संशोधन कार्यवाहीचे टप्पे, 3.13 संशोधनाचे वेळापत्रक, 3.14 खर्चाचे अंदाजपत्रक.
- शैक्षणिक संशोधनाची उपागमे : 4.1 शैक्षणिक संशोधनाची उपागमे, 4.1.1 संख्यात्मक संशोधन पद्धती, 4.1.2 गुणात्मक संशोधन पद्धती, 4.1.3 संमिश्र संशोधन पध्दती.
- मानववंशशास्त्र/प्रकृतिवादी अन्वेषण : 5.1 मानववंशशास्त्र वर्णन पध्दतीचे वैशिष्टे, 5.2 मानववंशशास्त्राच्या संशोधनाची गृहीतके, 5.3 मानववंशशास्त्र संशोधनात माहिती जमा करण्याची साधने, 5.4 मानववंशशास्त्र संशोधन पध्दतीच्या पायऱ्या, 5.5 मानववंशशास्त्र संशोधन पध्दतीचे फायदे, 5.6 मानववंशशास्त्र संशोधन पध्दतीचे तोटे.
- प्रवृत्ती सिध्दान्त निर्मिती : 6.1 प्रवृत्ती सिध्दान्त निर्मितीचे प्रकार, 6.2 प्रवृत्ती सिध्दान्त निर्मितीच्या व्याख्या, 6.3 प्रवृत्ती सिद्धान्ताचा हेतू, 6.4 प्रवृत्ती सिध्दान्ताच्या पायऱ्या, 6.5 प्रवृत्ती सिध्दांताचे फायदे, 6.6 प्रवृत्ती सिध्दांताचे तोटे, 6.7 प्रवृत्ती सिद्धान्ताच्या अभ्यासात माहिती संकलित करण्याची साधने.
- घटनाशास्त्र/इंद्रियगोचर शास्त्र : 7.1 घटनाशास्त्र संशोधन पध्दतीचे वैशिष्टे, 7.2 घटनाशास्त्रातील माहिती संकलित करण्याची साधने, 7.3 घटनाशास्त्र संशोधन पध्दतीच्या पायऱ्या, 7.4 घटनाशास्त्र संशोधन पध्दतीचे प्रकार.
- व्यष्टी अध्ययन पद्धती : 8.1 व्यष्टी अध्ययन पद्धतीच्या व्याख्या, 8.2 व्यष्टी अभ्यास पद्धतीची वैशिष्टे, 8.3 व्यक्ती अभ्यासात माहिती संकलनाची साधने, 8.4 व्यक्ती अभ्यास पध्दतीच्या पायऱ्या.
- ऐतिहासिक संशोधन : 9.1 ऐतिहासिक संशोधनाच्या व्याख्या, 9.2 ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप, 9.3 ऐतिहासिक संशोधनाचा हेतू, 9.4 ऐतिहासिक संशोधनातील माहितीचे स्त्रोत, 9.5 ऐतिहासिक संशोधनातील संकलित माहितीची विश्वसनीयता, 9.6 ऐतिहासिक संशोधनाच्या पायऱ्या, 9.7 ऐतिहासिक संशोधन पध्दतीचे फायदे, 9.8 ऐतिहासिक संशोधन पध्दतीचे तोटे.
- सर्वेक्षण पध्दती : 10.1 सर्वेक्षण पध्दतीचा अर्थ, 10.2 सर्वेक्षण पद्धतीचा हेतू, 10.3 सर्वेक्षण पध्दतीची वैशिष्टे, 10.4 सर्वेक्षण संशोधन पध्दतीचे प्रकार, 10.5 सर्वेक्षण पद्धतीच्या प्रमुख पायऱ्या.
- प्रायोगिक संशोधन पध्दती : 11.1 प्रायोगिक संशोधन पध्दतीची संकल्पना, 11.2 प्रायोगिक संशोधन पद्धतीची मूलभूत वैशिष्टे, 11.3 प्रायोगिक संशोधन पद्धतीच्या पायऱ्या, 11.4 प्रायोगिक संशोधन पद्धतीचे फायदे.
- तौलनिक कार्यकारण पद्धती : 12.1 तौलनिक कार्यकारण पद्धतीची संकल्पना, 12.2 तौलनिक कार्यकारण पद्धतीच्या पायऱ्या, 12.3 तौलनिक कार्यकारण पद्धतीचे उपयोग, 12.4 तौलनिक कार्यकारण पद्धतीच्या मर्यादा.
- सहसंबंधात्मक संशोधन पद्धती : 13.1 सहसंबंध संशोधनाची संकल्पना, 13.2 सहसंबंधाचे प्रकार, 13.3 सहसंबंध संशोधन पद्धतीचे उपयोग, 13.4 सहसंबंध संशोधन पद्धतीच्या पायऱ्या.
- संमिश्र संशोधन पद्धती : 14.1 अभिसारी समांतर मिश्र संशोधनाची संकल्पना, 14.2 अभिसारी समांतर मिश्र पद्धतीत माहितीचे विश्लेषण, 14.3 स्पष्टीकरणात्मक अनुक्रमिक संरचना, 14.4 शोधात्मक अन्वेषणात्मक/अनुक्रमिक संरचना.
- चले : 15.1 चलांची संकल्पना, 15.2 चलांचे प्रकार.
- प्रायोगिक अभिकल्प : 16.1 प्रायोगिक अभिकल्पाचा अर्थ, 16.2 प्रायोगिक अभिकल्पाचे प्रकार, 16.3 प्रयोगाची आंतरिक सप्रमाणता, 16.4 संशोधनाच्या आंतरिक सप्रमाणतेला धोका निर्माण करणारे घटक, 16.5 प्रयोगाची बाह्य सप्रमाणता, 16.6 संशोधनाच्या बाह्य सप्रमाणतेला धोका निर्माण करणारे घटक.
- नमुना आणि नमुना निवडीच्या पद्धती : 17.1 जनसंख्या : संकल्पना, 17.2 नमूना/न्यादर्श : संकल्पना, 17.3 नमूना निवडीचे प्रकार, 15.3.1 संभाव्यता नमूना निवड, 15.3.2 असंभाव्यता न्यादर्शन पध्दती.
- माहिती संकलनाची साधने : 18.1 प्रमाणित साधने, 18.2 अप्रमाणित साधने, 18.2.1 प्रश्नावली, 18.2.2 मुलाखती, 18.2.3 निरीक्षणे.
- मानसशास्त्रीय चाचण्या : 19.1 मानसशास्त्रीय चाचण्यांचे प्रकार, 19.2 मानसशास्त्रीय चाचण्यांची वैशिष्टे, 19.3 प्रक्षेपण तंत्रे, 19.4 प्रक्षेपण तंत्राचे फायदे, 19.5 मापन साधनांची वैशिष्ट्ये, 19.6 मापन आणि मूल्यांकन यातील फरक.