सकारात्मक मानसशास्त्र
Positive Psychology
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
सकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.
Sakaratmak Manasashatra
- सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे काय? : 1.1 पारंपारिक मानसशास्त्र, 1.2 सकारात्मक मानसशास्त्र स्वरूप, 1.3 सकारात्मक मानसशास्त्र – पूर्वइतिहास, व्याख्या, गृहितक आणि ध्येये, 1.4 सकारात्मक मानसशास्त्र पारंपारिक मानसशास्त्र विरोधी नाही
- आनंदीवृत्ती – अर्थ व मापन : 2.1 अ) खुशालीचे मानसशास्त्र का? कशासाठी?, ब) आनंदीवृत्ती म्हणजे काय? दोन पंरपरा, 2.2 व्यक्तिनिष्ठ खुशाली – इंद्रियजन्य/सुखवादी अनुभव आनंदीवृत्तीचा पाया, 2.3 आत्मवास्तविकरणः आत्मिक आनंद आनंदीवृत्तीचा पाया
- सकारात्मक भावना आणि खुशाली : 3.1 सकारात्मक भावना म्हणजे काय?, 3.2 सकारात्मक भावना आणि आरोग्य स्त्रोत/बदल, 3.3 सकारात्मक भावना आणि खुशाली, 3.4 सकारात्मक भावनांची जोपासना
- स्थितीस्थापकत्त्व : 4.1 अ) स्थितीस्थापकत्व म्हणजे काय?, ब)स्थितीस्थापकत्व दृष्टीकोन, 4.2 स्थितीस्थापकत्व संशोधन, 4.3 आघातातून किंवा आघातजन्य घटना प्रसंगांमधून विकास
- आनंदीवृत्ती आणि जीवनातील वास्तवता : 5.1 जीवनातील विविध टप्पे आणि आनंदीवृत्ती, 5.2 लिंगभेद आणि आनंदीवृत्ती, 5.3 विवाह आणि आनंदीवृत्ती, 5.4 जीवनातील इतर वास्तवता
- व्यक्तिगत ध्येये : खुशालीवे एक गवाक्ष, 6.1 व्यक्तिगत ध्येय कोणती?, 6.2 वैश्विक मानवी प्रेरणांचा शोध, 6.3 आनंदीवृत्तीस पोषक ठरणारी ध्येये, 6.4 भौतिकवाद आणि त्यातील असंतुष्टता
- सकारात्मक गुणवैशिष्ट्ये : 7.1 सकारात्मक गुणवैशिष्ट्ये, 7.2 व्यक्तिमत्त्व, भावना आणि जैविकता, 7.3 सकारात्मक समजूती, 7.4 मानवी सद्गुण आणि प्रबल गुण
- शुन्याच्या वरचे जीवन : 8.1 सकारात्मक मानसशास्त्र पुर्नओळख, 8.2 चांगल्या वाईटातील आंतरसंबंध, 8.3 सकारात्मक जीवनविषयक रूपरेषा/आकारचित्र : अर्थ आणि साधने, 8.4 मन सजगता आणि खुशालीभाव/आनंदीवृत्ती