सकारात्मक मानसशास्त्र
Positive Psychology
Authors:
ISBN:
₹235.00
- DESCRIPTION
- INDEX
मानवी जीवनात व्यक्तीला ‘विकास’ हवा आहे. ‘सुख, समाधान, आनंद, यश’ या गोष्टी व्यक्तीला आवडतात. परंतु यासाठी काय करणे आवश्यक आहे? आपले वर्तन कसे असावे? याचे उत्तर मात्र आपल्याकडे नाही. याचा खुलासा सकारात्मक मानसशास्त्रातून होतो.
सद्यस्थितीत तर व्यक्ती फारच ‘ताणतणाव, दुःख, भिती, चिंता, नैराश्य, उदासीनता या जखड्यात सापडलेला आहे. स्वस्थता विरहित जीवन अशीच रचना सध्याच्या व्यक्तिगत व सामूहिक जीवनाची झालेली आहे. आत्मविश्वास निच्चतम पातळीला पोहोचलेला आहे त्यातून इच्छीत क्षेत्रात मोठ्या अडचणी येऊन व्यक्तीला ‘अपयश’ येत असलेले दिसते. यातून सुखी जीवनाचा ‘आनंद’ कोसो दूर निघून गेलेला दिसतो. कोणतेही कार्य करताना मी यशस्वी होणार का? मला ते जमणार का? माझं कसं होणार? असेच नकारात्मक प्रश्न व्यक्तीच्या डोळ्यासमोर उभे राहतात.
अशा स्थितीला व नकारात्मक विचारांना सकारात्मक कसे करायचे? ध्येय प्राप्त करण्यासाठी सकारात्मकता किती महत्त्वाची आहे? या प्रश्नाची उत्तरे या पुस्तकातून मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने परिपूर्ण ज्ञानाचा स्त्रोत हे पुस्तक ठरणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला सकारात्मक जीवन जगणे शिकविण्यासाठी हे पुस्तक ‘मार्गपथ’ ठरेल हे निश्चित.
प्रकरण 1
सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे काय?
पारंपरिक मानसशास्त्र – नकारात्मक बाजूवरच लक्ष का?, नकारात्मकता ही जास्त महत्त्वाची, विकृत प्रारूप. सकारात्मक मानसशास्त्र – स्वरूप, पूर्वइतिहास, गृहीतके, ध्येये, व्याख्या, शून्यावरचे जीवन, संस्कृती आणि चांगल्या जीवनाचा अर्थ. सकारात्मक मानसशास्त्राची संबंधित क्षेत्रे – आरोग्य मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र, विकासात्मक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, व्यक्तिमत्त्व मानसशास्त्र, धर्म मानसशास्त्र.
प्रकरण 2
सुखाचा अर्थ आणि मापन
खुशालीचे मानसशास्त्र का? – वस्तुनिष्ठ विरुद्ध व्यक्तिनिष्ठ मापन, नकारात्मक विरुद्ध सकारात्मक क्रियात्मकता. सुख म्हणजे काय? दोन परंपरा-विलासी सुख, आत्मिक सुख. व्यक्तिनिष्ठ खुशाली – सुखाचा विलासी मुळआधार-व्यक्तिनिष्ठ खुशाली मापन, जीवन समाधान, सकारात्मक भावविकार-नकारात्मक भावविकार आणि सुख, सुखाचे सर्वंकष मापन. आत्मवास्तविकीकरण – सुखाच्या आत्मसुखाचा मुळआधार-मानसिक खुशाली आणि सकारात्मक क्रियात्मकता, गरज परिपूर्ती आणि स्व निर्धारण सिद्धांत, सुखाच्या विलासी आणि आत्मनिष्ठ दृष्टिकोनाची तुलना.
प्रकरण 3
सकारात्मक भावना आणि खुशाली
सकारात्मक भावना काय आहेत? – सकारात्मक भावनेची विस्तीर्ण आणि बांधणी सिद्धांत. सकारात्मक भावना आणि आरोग्याची संसाधने – शारीरिक संसाधने, मानसिक संसाधने, सामाजिक संसाधने, सकारात्मक भावनेच्या मर्यादा. सकारात्मक भावना आणि खुशाली – सुख आणि सकारात्मक वर्तन, सकारात्मक भावना आणि यश, सकारात्मकतेचा सामान्य सिद्धांत, सकारात्मक भावना आणि भरभराट. सकारात्मक भावनेची जोपासना – प्रवाह अनुभव, आस्वाद.
प्रकरण 4
स्थितिस्थापकत्व
स्थितिस्थापकत्व म्हणजे काय? – विकासात्मक दृष्टिकोन, चिकित्सात्मक दृष्टिकोन. स्थितिस्थापकत्व संशोधन – स्थितिस्थापकत्वाची साधने, बळी दोषारोपाचे धोके, बालकांमधील स्थितिस्थापकत्वाची उगमस्थाने, प्रौढवय व उत्तर जीवनातील स्थितिस्थापकत्वाची उगमस्थाने, यशस्वी वार्धक्य. आघातातून विकास – आघाताचा नकारात्मक परिणाम, आघाताचा सकारात्मक परिणाम, आघातातून विकासाबाबतचे स्पष्टीकरण. सांख्यिकी – केंद्रीय प्रवृत्तीचे मापन – मध्यमान, मध्यांक, बहुलक.
प्रकरण 5
सुख आणि जीवनातील वास्तवता
जीवन कक्षेपलीकडील सुख; जीवन बदलांना जुमानता आलेली खुशालीतील स्थिरता – 1. स्वभावधर्म आणि व्यक्तिनिष्ठ खुशाली 2. सकारात्मक आणि नकारात्मक भावनेची वारंवारीता, तीव्रता आणि समतोल 3. मापन आणि व्याख्यात्मक घटक 4. जीवन समाधानाचा बदलता मूळ आधार; लिंगभेद आणि सुख – 1. भावनिक अनुभवातील लिंगभेद 2. लिंगभेदाच्या विरोधाभासाचे स्पष्टीकरण; विवाह आणि सुख – 1. विवाहाचे फायदे 2. निवड परिणाम 3. विवाहाच्या फायद्यामधील लिंगभेद; जीवनाचे इतर वास्तव – 1. शारीरिक आणि मानसिक आरोग्य 2. काम आणि बेरोजगारी 3. बुद्धिमत्ता आणि शिक्षण 4. धर्म 5. वंश, मानववंशता आणि कलंक.
प्रकरण 6
व्यक्तिगत ध्येय : एक खुशालीचे गवाक्ष
व्यक्तिगत ध्येय काय आहेत?, ध्येय आणि संबंधित प्रेरणात्मक संकल्पना; व्यक्तिगत ध्येयाचे मापन – 1. स्व ध्येय मापन सारणी 2. व्यक्तिगत जीवन संघर्ष सारणी 3. जीवन कार्य मापन सारणी; ध्येय संघटन; वैश्विक मानवी प्रेरणासाठी शोध – 1. ध्येय आणि मुलभूत मानवी गरजांची परिपूर्ती; वैश्विक गरजांबाबत एक अन्य संशोधन 2. ध्येयातून मुलभूत मूल्याची अभिव्यक्ती; संस्कृती पलीकडील व्यक्तिगत ध्येय; खुशालीसाठी अधिकाधिक कोणती ध्येय योगदान देतात? – 1. ध्येय प्रगती, संपादन आणि महत्त्व; अनुरूप सिद्धांत कल्पना; अनुरूप सिद्धांत कल्पना काय स्पष्ट करते? – 1. व्यक्तिगत ध्येय आणि स्वआत्मवास्तवीकीकरण 2. आंतरिक विरुद्ध बाह्य उद्दिष्ट्ये 3. स्वायत्त विरुद्ध नियंत्रित प्रेरणा; जडवाद आणि असंतुष्टता – 1. जडवादी दुःखी का असतात? 2. लोक जडवादी मूल्यांचा स्वीकार का करतात?
प्रकरण 7
सकारात्मक गुणविशेष
गुणविशेष सकारात्मक बनविण्यासाठी काय करावे? – 1. आत्मनिष्ठ खुशाली 2. खुशालीचा आत्मसुख दृष्टिकोन 3. मानसिक गुण व शारीरिक आरोग्य; व्यक्तिमत्त्व, भावना आणि जीवशास्त्र – 1. सकारात्मक आणि नकारात्मक भावनात्मकता 2. अनुवंशशास्त्र आणि सुख 3. व्यक्तिमत्त्व आणि सुख ः पंचघटक; सकारात्मक विश्वास – 1. सुखी आणि दुःखी नजरेतील विश्व 2. स्व-आदर 3. व्यक्तिगत नियंत्रण 4. आशावाद; वृत्तीत्मक आशावाद आणि शैली; सद्गुण आणि चारित्र्याचे सामर्थ्य – 1. मानवी सदगुणांच्या वर्गीकरणाचा विकास 2. चारित्र्याच्या सामर्थ्याचे मापन.
प्रकरण 8
स्व नियमन आणि स्व नियंत्रण
स्व-नियंत्रणाचे मूल्य; वैयक्तिक ध्येय आणि स्व नियमन – 1. नियंत्रण सिद्धांत 2. स्व-भेद सिद्धांत; स्व नियमन यशासाठी नियोजन-1. नियोजनाची मदत का? 2. बांधिलकी आणि आत्मविश्वास; स्व नियमन समस्या निर्मित करणारी ध्येय – 1. उपगम-विरुद्ध अपगम ध्येय 2. ध्येय संघर्ष 3. ध्येय कठीणता; स्व नियंत्रण अपयशासाठी दरदिवसाचे स्पष्टीकरण – 1. माफ करता येणारे 2. आकर्षक प्रबळ इच्छा; विचलनाचे मापन – संकल्पना, विचलनशीलतेला ज्ञात करण्याची पद्धती – विस्तार.