समकालीन भारताची निर्मिती (1950-2019)
Making of Contemporary India (1950-2019)
Authors:
ISBN:
₹475.00
- DESCRIPTION
- INDEX
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला राजकिय स्वातंत्र्य मिळाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या युक्तीवादाने अनेक लहान मोठ्या संस्थानिकांचे मन वळवून भारतीय संघराज्यात समाविष्ट करून घेतले. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू झाली. शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, आण्विक व अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती कौतुकास्पद आहेच; पण दुसरीकडे स्वातंत्र्योत्तर भारतातही आदिवासी-दलित आणि स्त्रियांच्या विविध चळवळी व संघर्ष झाले. जमातवाद, प्रादेशिकवाद व नक्षलवाद या गंभीर समस्यांनी आज अक्राळविक्राळ रूप धारण केलेले आपणास दिसते.
सदर पुस्तकात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, राज्यघटना निर्मितीपासून तर देशातील या काळात घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय व आर्थिक घडामोडींचा, भारतीयांचे मन अस्वस्थ करणार्या घटनांचा, समाजातील बदललेल्या विविध घटकांचा, इ.स. 1991 नंतरच्या आर्थिक धोरणाच्या परिणामांचा, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीचा तसेच देशासमोर उभ्या ठाकलेल्या विविध मुख्य आव्हानांचा आढावा घेतलेला आहे. ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या केलेली आहे. प्राध्यापक, विद्यार्थी व विविध स्पर्धा परिक्षार्थी मित्रांना, अशा सर्वांनाच उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.
Samkalin Bharatachi Nirmiti (1950-2019)
- भारताची निर्मिती : अ) भारतीय राज्यघटनेची निर्मिती व वैशिष्ट्ये, ब) भारताचे एकीकरण – सरदार पटेल यांचे योगदान
- राजकीय विकास : अ) पंडीत नेहरूंचे योगदान (1952-1964), ब) लाल बहादूर शास्त्रींचे योगदान (1964-1966), क) इंदिरा गांधींचे योगदान (1966-1977, 1980-1984), ड) मोरारजी देसाईंचे योगदान (1977-1979), इ) राजीव गांधींचे योगदान (1984-1989), इ) व्ही.पी. सिंगांचे योगदान (1989-1990), ई) चंद्रशेखरांचे योगदान (1990-1991), फ) पी. व्ही. नरसिंहरावांचे योगदान (1991-1996), म) इंद्रकुमार गुजरालांचे योगदान (1997-1998), न) अटल बिहारी वाजपेयींचे योगदान (1996, 1998-2004), प) डॉ. मनमोहन सिंगांचे योगदान (2004-2014), च) नरेंद्र मोदींचे योगदान (2014 ते आजतागायत)
- भारताचा आर्थिक विकास : अ) मिश्र अर्थव्यवस्था, ब) राष्ट्रीय नियोजन मंडळ व पंचवार्षिक योजना, क) भारतातील नवीन आर्थिक सुधारणा व खाऊजा
- सामाजिक न्याय : अ) आदिवासी चळवळ, ब) दलित चळवळ, क) स्त्रियांच्या चळवळी
- भारतापुढील मुख्य आव्हाने : अ) जमातवाद, ब) प्रादेशिक समस्या, क) नक्षलवाद
- शिक्षण व विज्ञान : अ) शिक्षण क्षेत्रातील विकास, ब) विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास, क) भारताचे आण्विक धोरण, ड) अंतराळ क्षेत्रातील प्रगती