समग्र राज्यशास्त्र
Comprehensive Political Science
Authors:
ISBN:
₹550.00
- DESCRIPTION
- INDEX
कोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकांची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकांची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. राज्यशास्त्र विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.
प्रस्तुत पुस्तकात संविधान, संघराज्य प्रारूप व कार्यपद्धती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे, घटना दुरूस्ती, माहितीचा अधिकार व मानव अधिकार, कार्यकारी मंडळ, न्यायालय, संविधानिक संस्था आणि गैर-संविधानिक संस्था, राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणारे मुख्य समस्या, राजकीय पक्ष, चळवळी, स्थानिक प्रशासन, संवैधानिक व कायदेशीर विकास मंडळे, महनीय व्यक्ती व त्यांचे कार्य, चीन-अमेरिकेचे शासन आणि राजकारण, संशोधन पद्धती, विचारप्रणाली, राजकीय संस्कृती, सनदी सेवा, भरती, प्रशिक्षण आणि बढती, सुशासन, पत्रकारिता, माध्यमे, विचारवंत, आंतरराष्ट्रीय संबंध वा राजकारण, सत्तासंतुलन, सामूहिक सुरक्षा, नि:शस्त्रीकरण, राजनय – आंतरराष्ट्रीय कायदा व संघटना इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.
Samagra Rajayashastra
- भारतीय संविधान : ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधानाची निर्मितीची प्रक्रिया, राज्यघटना सरनामा
- भारतीय संघराज्य प्रारूप व कार्यपद्धती : स्वरूप, आवश्यकता, लक्षणे व वैशिष्टये, केंद्र-राज्यसंबंध, वित्त आयोग आणि केंद्र-राज्य समित्या
- मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे
- घटना दुरूस्ती : आवश्यकता, महत्त्व, प्रक्रिया, वैशिष्टये, मूल्यमापन आणि आजपर्यत झालेल्या दुरूस्त्या
- आणीबाणीच्या तरतूदी : प्रकार, परिणाम आणि गुण-दोष
- माहितीचा अधिकार व मानव अधिकार : माहिती अधिकार आणि मानवाधिकार केंद्रीय व राज्य आयोग
- केंद्रीय व राज्य कार्यकारी मंडळ (1) : राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळ
- केंद्रीय व राज्य कार्यकारी मंडळ (2) : लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, कायदे निर्मिती प्रक्रिया, संसदीय समित्या, संसदीय आयुध
- सर्वोच्च व उच्च न्यायालय : रचना, अधिकार व कार्य, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका, लोकपाल आणि लोकायुक्त
- संविधानिक संस्था आणि गैर-संविधानिक संस्था
- राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणारे मुख्य समस्या
- भारतातील राजकीय पक्ष
- सत्यशोधक चळवळ आणि मुस्लिम सत्यशोधक चळवळ : उद्देश, उदयाची कारणे, कार्य, तत्त्वे परिमाण, महत्त्व, सद्य:स्थिती, मूल्यमापन
- दलित चळवळ : ऐतिहासिक पार्श्वभूमी, अर्थ व स्वरूप, विकास आणि मूल्यमापन
- संयुक्त महाराष्ट्र चळवळ : ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्य पुनर्रचना आयोग, परिणाम
- आदिवासी चळवळ : अर्थ, स्वरूप, पार्श्वभूमी, वैशिष्टये, लक्षणे, समस्या, उपाययोजना, सद्य:स्थिती
- शेतकरी चळवळ : ऐतिहासिक पार्श्वभूमी, विकास, समस्या, उपाययोजना, वैचारिक भ्ूमिका, शेतकरी आंदोलने, शेतकरी संघटना
- महाराष्ट्राची ओळख : राज्यप्रशासन, महाराष्ट्र प्रशासन वैशिष्टये आणि प्रशासकीय संघटना
- राज्य सचिवालय आणि संचालनालय : रचना, आवश्यकता व कार्य
- जिल्हाप्रशासन : अर्थ, स्वरूप, महत्त्व, जिल्हाधिकारी, कायदा व सुव्यवस्था
- जिल्हा पोलिस व ग्रामीण प्रशासन : ऐतिहासिक पार्श्वभूमी, वैशिष्टये, संरचना, मुलकी व ग्रामप्रशासन
- ग्रामीण स्थानिक प्रशासन : जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत, 73 वी घटनादुरूस्ती
- नागरी स्थानिक प्रशासन : नगरपालिका, महानगरपालिका, छावणी बोर्ड, बंदर न्याय, 74 वी घटनादुरूस्ती
- महाराष्ट्रातील संवैधानिक व कायदेशीर विकास मंडळे
- कौटिल्य : राज्याचे स्वरूप, सप्तांग सिद्धांत, राजा, मंत्रिपरिषद, न्यायव्यवस्था, मंडळ सिद्धांत
- राजा राममोहन रॉय : सामाजिक-धार्मिक-राजकीय-आर्थिक-मानवतेचे विचार, प्रबोधनाचे शिल्पकार
- स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद : सामाजिक, राजकीय व धार्मिक विचार
- दादाभाई नवरोजी : राजकीय विचार, आर्थिक विचार, स्वराज्याबद्दलचे विचार, राष्ट्रवादाचे शिल्पकार
- महात्मा जोतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज : सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि समाजसुधारणाविषयक विचार
- न्या. महादेव गोंविद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, गोपाल कृष्ण गोखले : राजकीय, सामाजिक आणि ब्रिटिश राजवटीविषयी विचार