समाजशास्त्र परिचय
Introduction of Sociology
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
आधुनिक युगात समाजशास्त्रामध्ये नवीन परिवर्तनाचा अभ्यास होत असल्यामुळे समाजशास्त्राशिवाय सामाजिक घटनांचा अभ्यास करणे शक्य नाही. समाज, सामाजिक जीवन, सामाजिक घटना, व्यक्ती-व्यक्तींमधील परस्परसंबंधाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्र हे पायाभूत सामाजिकशास्त्र असल्यामुळे त्याचे महत्त्व सर्वत्र मान्य करण्यात आले आहे. भारतीय सामाजिक समस्यांचे अध्ययन करण्यामध्ये समाजशास्त्र विषयाचे विशेष योगदान आहे. समाजशास्त्र सामाजिक घटना व प्रक्रियांचे अध्ययन करते. समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे सामाजिक घटना व सामाजिक प्रक्रियांचा परिपूर्ण अभ्यास होतो. समाजशास्त्र नवनवीन परिस्थितीचे आयोजन करण्यास शिकविते. भारतात सर्वप्रथम 1919 मध्ये मुंबई विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर पॅट्रीक गिडीस व 1924 मध्ये डॉ. गोविंद घुर्ये यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली.
सदरील पुस्तकात अर्थ, स्वरुप, व्याप्ती, मूलभूत संकल्पना, समाजाचा सभासद असणार्या मानवी प्राण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योगदान देत असलेल्या निरनिराळ्या सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचन, विचलन तसेच सामाजिक नियंत्रण, सामाजिक चळवळी, सामाजिक स्तरीकरण व परिवर्तन इ. घटकांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
Samajshastra Parichay
- समाजशास्त्र परिचय : अर्थ व स्वरूप, उत्पत्ती व विकास, उदय व विकास, व्याख्या, व्याप्ती, स्वरूपप्रधान विचार संप्रदायानुसार व्याप्ती व आक्षेप, समन्वयात्मक विचार संप्रदायानुसार व्याप्ती व आक्षेप; मानवतावादी उपयुक्ततावादी अभिमुखता विज्ञान, शास्त्राच्या कसोट्या, प्रमुख वैशिष्ट्ये, अन्य सामाजिकशास्त्राशी संबंध
- सामाजिक दृष्टीकोन : अ) समाजशास्त्रीय दृष्टीकोन, ब) समाजशास्त्र हे उपयोगियवदी शास्त्र आहे
- मुलभूत संकल्पना : अ) समाज – व्याख्या, समाजाची वैशिष्ट्ये ब) समुदाय – व्याख्या, समुदायाची तत्वे किंवा वैशिष्ट्ये क) सामाजिक समूह किंवा गट- व्याख्या, सामाजिक समुहाची वैशिष्ट्ये
- मुलभूत संकल्पना : अ) दर्जा आणि भूमिका; सामाजिक दर्जाचे प्रकार – अ) प्रदत्त किंवा अर्पित दर्जा ब) अर्जित किंवा संपादीत दर्जा; अर्जित दर्जाचे आधार क) सामाजिक प्रमाणके; प्रमाणकांचे प्रकार, ड) सामाजिक संस्था; सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये इ) सामाजिक मुल्ये; सामाजिक मुल्यांचे महत्व
- सामाजिक नियंत्रण आणि अनुरूपता : अ) सामाजिक नियंत्रण – अर्थ; सामाजिक नियंत्रणाची कार्ये किंवा उद्दिष्टे, सामाजिक नियंत्रणाचे प्रकार – सकारात्मक व नकारात्मक नियंत्रण अ) औपचारिक नियंत्रण ब) अनौपचारिक नियंत्रण; अनौपचारिक नियंत्रणाची वैशिष्ट्ये, सामाजिक अनुचलन
- संस्कृती आणि सामाजिकरण : अ) संस्कृती – भौतिक आणि अभौतिक संस्कृती; संस्कृतीची वैशिष्ट्ये, संस्कृतीचे घटक, ब) सामाजिकरण, आवश्यक मुलतत्वे, उद्दिष्ट्ये, सामाजीकरणाच्या अवस्था/पायर्या
- सामाजिक संस्था : सामाजिक संस्था- व्याख्या, वैशिष्ट्ये, महत्व/कार्य अ) कुटुंबसंस्था, कुटुंबाची प्रकार्ये; उत्पत्ती सिद्धांत
- सामाजिक संस्था : अ) राज्यसंस्था- व्याख्या; राज्यसंस्थेचे घटक, राज्यसंस्थेची उत्पत्ती, प्रभुत्वाची संकल्पना, ब) धर्मसंस्था- धर्माची वैशिष्ट्ये, धर्माची प्रकार्ये, धर्माची उत्पत्ती
- सामाजिक चळवळी : सामाजिक चळवळ – अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, सामाजिक चळवळीचे दृष्टीकोन; सामाजिक चळवळीचे उत्पत्तीचे सिद्धांत
- सामाजिक स्तरीकरण आणि परिवर्तन : अ) सामाजिक स्तरीकरण- व्याख्या, आधारभूत घटक, सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार, स्तरीकरणाची प्रकार्ये, सामाजिक स्तरीकरणाची अप्रकार्ये, सामाजिक स्तरीकरणाचे महत्व, सामाजिक परिवर्तन – व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रकार