समाजशास्त्र परिचय
Introduction of Sociology
Authors:
ISBN:
₹310.00
- DESCRIPTION
- INDEX
समाजशास्त्राचा अभ्यास ही आधुनिक काळाची गरज आहे. समाजशास्त्राचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजाचा जसाजसा विकास होत गेला तसतश्या सामाजिक घटना, घडामोडी व सामाजिक समस्या यातील जटीलता वाढली. त्यामुळे सामाजिक घटना व घडामोडीचा काल सुसंगत अर्थ लावून निरनिराळ्या सामाजिक समस्यांची कारणे शोधून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समाजशास्त्रात काळानुरुप नवनवीन दृष्टीकोन विकसित होत गेले व मानवी समाजजिवन सुखकर करण्यास समाजशास्त्राची मदत होत गेली. समाजशास्त्रात ‘समाज’ हा शब्द एक संकल्पना म्हणून उपयोगात आणली व संकल्पना म्हणूनच ‘समाज’ हा शब्द समाजशास्त्रात अभ्यासल्या जाते. मानवाच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास असे दिसून येते की, गरजापूर्तीसाठी माणुस स्वैर वर्तन करण्यास मागेपुढे पाहत नाही. अशा स्वैर वर्तनाने समाजात अराजकता निर्माण होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. व समाजजिवन विस्कळीत होईल असे होवू नये म्हणून सामाजिक नियंत्रणाच्या पद्धतीचे अध्ययन केले जाते.
प्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरुप व व्याप्ती तसेच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन देण्यात आली आहे. तसेच मानवाला जिवंत राहण्यासाठी विविध गरजांची परिपुर्ती करावी लागते. गरजांच्या परिपुर्तीसाठी मदत करणाचा विविध सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचलन, विचलन, सामाजिक नियंत्रण व्यक्तीमत्व विकास, सामाजिक चळवळी, सामाजिक स्पष्टीकरण व परिवर्तन, महिला सक्षमीकरण इत्यादी बाबींची समाजशास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे.
Samajshastra Parichay
1. समाजशास्त्र परिचय :
समाजशास्त्र: अर्थ व स्वरूप, उत्पत्ती व विकास, उदय व विकास; समाजशास्त्राची व्याख्या, समाजशास्त्राची व्याप्ती, समाजशास्त्राची व्याप्ती व आक्षेप – स्वरूपप्रधान विचार संप्रदाय, समन्वयात्मक विचार संप्रदाय; समाजशास्त्र: मानवतावादी उपयुक्ततावादी अभिमुखता विज्ञान – समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे; शास्त्राच्या कसोट्या किंवा निकष – स्वतंत्र अभ्यासविषय, समाजशास्त्र निरीक्षणाद्वारे तथ्यांचे संकलन करते, समाजशास्त्र काय आहे याचे वर्णन करते, समाजशास्त्र कार्यकारण संबंध स्पष्ट करते, प्रकट स्वरूपाची अध्ययन पद्धती, पूर्वकथन पद्धती; समाजशास्त्राच्या स्वरूपासंबंधीचे प्रमुख वैशिष्ट्ये – समाजशास्त्र सामाजिकशास्त्र, समाजशास्त्र अनुभव प्रामाण्यवादी शास्त्र आहे, समाजशास्त्र शुद्ध सैद्धांतिक शास्त्र आहे, संचयी स्वरूपाचे शास्त्र आहे, समाजशास्त्र अमूर्त शास्त्र आहे, समाजशास्त्र उपयोजीत शास्त्र आहे; समाजशास्त्राचा अन्य सामाजिकशास्त्राशी संबंध – 1) समाजशास्त्र आणि मानवशास्त्र 2) समाजशास्त्र आणि इतिहास 3) समाजशास्त्र व राज्यशास्त्र 4) समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र
2. सामाजिक दृष्टीकोन :
अ) समाजशास्त्रीय दृष्टीकोन – 1) संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टीकोन – प्रकार्य, अप्रकार्य 2) संघर्षवादी किंवा द्वंद्वात्मक दृष्टीकोन ब) समाजशास्त्र हे उपयोगियवदी शास्त्र आहे – 1) समाजशास्त्र व सामाजिक समस्या 2) समाजशास्त्र व धोरण 3) समाजशास्त्र व विकास 4) समाजशास्त्र व व्यवसाय
3. मुलभूत संकल्पना :
अ) समाज – व्याख्या; समाजाची वैशिष्ट्ये – सामान्य भूभाग, लोकांचा समूह, प्रजोत्पादन, सर्वसमावेशक, आत्मनिर्भरता, भाषेची निर्मिती, समानता आणि विविधता, स्वतंत्रता ब) समुदाय – व्याख्या; समुदायाची तत्वे किंवा वैशिष्ट्ये – निश्चित भूप्रदेश, सामुदायिक भावना, सामान्य जीवन, विशिष्ट नाम, लोकसंख्या क) सामाजिक समूह किंवा गट – व्याख्या; सामाजिक समुहाची वैशिष्ट्ये – समान उद्दिष्टांची पूर्ती, दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा समूह, सहकार्य व ऐक्याची भावना, समुहाची रचना, सामाजिक गटाची/समुहाची मुल्ये व प्रमाणके, सामाजिक समुहाचे/गटाचे गतीशिल स्वरूप, समुहाची निश्चित सीमारेषा; सामाजिक समुहाचे/गटाचे प्रकार – 1) प्राथमिक समूह/गट – प्राथमिक समुहाच्या अटी; प्राथमिक समुहाची वैशिष्ट्ये – समान उद्देश, सर्वसमावेशक स्वरूपाचे संबंध, सभासदांमधील कर्तव्यभावना, अनौपचारिक स्वरूपाचे नियंत्रण, व्यक्तीगत स्वरूपाचे संबंध असतात, सभासदाचे समुहातील स्थान, प्राथमिक संबंध उत्स्फुर्त व साध्यस्वरूपाचे असतात; प्राथमिक समुहाचे महत्व – व्यक्तीचा सर्वांगीण विकास, मानसिक सुरक्षितता, सामाजिक भूमिकांचे ज्ञान, ‘स्व’चा विकास, सामाजिक नियंत्रण 2) दुय्यम समूह/गट – अर्थ व व्याख्या; दुय्यम समुहाची/गटाची वैशिष्ट्ये – मोठा आकार, हेतूपूर्वक निर्मिती, ऐच्छीक सदस्यत्व, उद्देशांमध्ये अनेकता, मर्यादित कर्तव्य भावना, अव्यक्तीगत स्वरूपाचे संबंध, अल्पकालावधी ड) सामाजिक संरचना – व्याख्या; सामाजिक संरचनेचे घटक तत्व – भूमिका, समूह-उपसमूह, प्रमाणके, मुल्ये
4. मुलभूत संकल्पना :
अ) दर्जा आणि भूमिका; सामाजिक दर्जाचे प्रकार – प्रदत्त किंवा अर्पित दर्जा – लिंगभेद, वय, नातेसंबंध, वंश, जातिभेद; अर्जित किंवा संपादीत दर्जा; अर्जित दर्जाचे आधार – संपत्ती, शिक्षण, राजकीय नेतृत्व, व्यावसायिक कुशलता, सामाजिक मुल्यांचे पालन; भूमिका क) सामाजिक प्रमाणके; प्रमाणकांचे प्रकार – निश्चयात्मक प्रमाणके, संमतीदर्शक प्रमाणके; सामाजिक प्रमाणकांची वैशिष्ट्ये – समाजाची स्विकृती, आचरणाशी संबंध, समाजोपयोगी, सामुहिक उद्देशपूर्तीला पूरक, समाजीकरणास साहाय्यक, सामाजिक नियंत्रणाचे साधन; सामाजिक प्रमाणकांचे महत्व – समाजव्यवस्थेचे महत्वाचे अंग, सामाजिक प्रमाणकाला अनुसरून वर्तन, प्रतिष्ठा प्राप्तीला मान्यता, व्यक्तीमत्वाचा भाग, सामाजिक अनुरूपतेची प्रवृत्ती ड) सामाजिक संस्था; सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये – सार्वत्रिकता, निश्चित उद्देश, प्रतिकात्मक व भौतिक लक्षणे किंवा चिन्हे, सामाजिक नियंत्रण, सापेक्ष स्थिरता, लिखीत व अलिखीत परंपरा, मार्गदर्शन इ) सामाजिक मुल्ये; सामाजिक मुल्यांचे महत्व – व्यक्ती जीवनात महत्व, मुल्ये मानसिक आधार देतात, ध्यैयपूर्तीला पूरक, सामाजिक एकतेचे साधन, व्यक्तीमत्व विकासाला प्रेरक, संस्कृतीचे घटकतत्व
5. सामाजिक नियंत्रण आणि अनुरूपता :
अ) सामाजिक नियंत्रण – अर्थ; सामाजिक नियंत्रणाची कार्ये किंवा उद्दिष्टे – सामाजिक जाणिव निर्माण करणे, समाजात ऐक्य निर्माण करणे, सामाजिक स्थैर्य प्रस्थापित करणे; सामाजिक नियंत्रणाचे प्रकार – 1) सकारात्मक व नकारात्मक नियंत्रण अ) औपचारिक नियंत्रण; औपचारिक नियंत्रणाची वैशिष्ट्ये – हेतूपूर्वक नियंत्रण, अंमलबजावणीची यंत्रणा, तात्पुरते नियंत्रण, विविध व्यवस्थेद्वारे नियंत्रण, व्यक्तीनिरपेक्षता ब) अनौपचारिक नियंत्रण; अनौपचारिक नियंत्रणाची वैशिष्ट्ये – हेतूपूर्वक नसलेले नियंत्रण, अंमलबजावणीची वेगळी व्यवस्था नाही, प्रत्यक्ष नियंत्रण, व्यक्तीसापेक्षता, नियंत्रणाचे वेगळे अस्तित्व नाही; सामाजिक अनुचलन; अनुचलनात्मक वर्तनास प्रोत्साहन देणारे घटक – सामाजीकरण, विचारप्रणाली, पृथ:करण, प्रमाणकांचे निर्धारण, सामाजिक नियंत्रण पद्धती, गुंतलेले हितसंबंध; सामाजिक विचलन; सामाजिक विचलनाची कारणे – दोषपूर्ण सामाजीकरण, निष्प्रभावी मान्यता, कमकुवत अंमलबजावणी, सोईचे संयुक्तीकरण, प्रमाणकांची अनिश्चित मर्यादा, प्रमाणक भंगाबाबत गुप्तता, गुन्हापिडितांचे सहकार्य, सामाजिक नियंत्रणकर्त्याची द्विधा मनस्थिती
6. व्यक्तिमत्व विकास :
प्रस्तावना, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या, व्यक्तिमत्व आणि समाज, व्यक्तिमत्वाला प्रभावित करणारे सामाजिक घटक – 1. कुटुंब 2. कुटुंब संस्थेत मिळणारे प्रशिक्षण 3. शाळा 4. आर्थिक स्थिती 5. सामाजिक संस्था 6. सामाजिक दर्जा व भूमिका
7. संस्कृती आणि सामाजिकरण :
अ) संस्कृती – भौतिक आणि अभौतिक संस्कृती; संस्कृतीची वैशिष्ट्ये – अमुर्तता, मानवनिर्मितता, शिक्षीत व्यवहार, हस्तांतरणशिलता, परिवर्तनशिलता, संचयशिलता, अनुकूलनक्षमता, संस्कृती आदर्शात्मक असते, मानवी गरजापूर्तीची क्षमता, प्रत्येक समाजाची संस्कृती वेगळी असते, संस्कृती अधिवैयक्तीक असते, संस्कृती ही प्रतिकात्मक असते; संस्कृतीचे घटक – 1) ज्ञान 2) विश्वास 3) मुल्ये व प्रमाणके 4) चिन्हे किंवा संकेत; सांस्कृतिक स्वयंकेंद्रितता ब) सामाजिकरण – अर्थ, व्याख्या; सामाजीकरणातील आवश्यक मुलतत्वे किंवा जैविक पुर्वावश्यकता – परावलंबित्व, सहजप्रवृत्तीचा अभाव, अर्भकाची स्विकारशिलता, भाषाक्षमता; सामाजीकरणाची उद्दिष्ट्ये – शिस्त, आकांक्षा रुजविणे, सामाजिक भूमिका शिक्षण, कौशल्य प्राप्ती; सामाजीकरणाच्या अवस्था/पायऱ्या – 1) मौखिकावस्था 2) गुदावस्था 3) इडिपलावस्था 4) पौगंडावस्था; सामाजीकरणाची साधने/माध्यमे – कुटुंब, शेजार, समवयस्काचे समूह, शाळा
8. सामाजिक संस्था :
सामाजिक संस्था – व्याख्या; सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये किंवा आवश्यक तत्वे – निश्चित उद्दिष्ट्ये, सापेक्ष स्थैर्य, सांस्कृतिक व्यवस्थेचे एकक, प्रतिके, सांस्कृतिक साधने, लिखीत वा अलिखीत नियम; सामाजिक संस्थेचे महत्व/कार्य – मानवी व्यवहारावर नियंत्रण, संस्कृती वाहकता, व्यक्तीस दर्जा व भूमिका प्रदान करणे, मानवी आवश्यकताची पूर्ती व कार्यास दिशा देणे, व्यक्तीमत्व विकासास सहाय्यक अ) कुटुंबसंस्था – व्याख्या; कुटुंबाची सामान्य वैशिष्ट्ये – विवाहबंधन, रक्त आणि आप्तसंबंध, द्विपक्षीयता, वंशव्यवस्था, सामान्य निवास, सजातीयतेची भावना, आर्थिक आधार; कुटुंबाची वैशिष्ट्ये – सार्वत्रिकता, केंद्रीय स्थिती, सिमीत आकार, भावनात्मक आधार, सभासदाचे उत्तरदायित्व, स्थायी व अस्थायी स्वरूप, सामाजिक नियंत्रण; कुटुंबाच्या उत्पत्तीचे सिद्धांत – 1) प्राचीन किंवा शास्त्रीय सिद्धांत 2) लैंगिक स्वैराचार सिद्धांत 3) विकासवादी सिद्धांत – रक्तसंबंधी कुटुंब, समूहविवाह कुटुंब, सिन्डेस्मियन कुटुंब, पितृसत्ताक कुटुंब, एकविवाही कुटुंब 4) एकविवाही सिद्धांत 5) मातृसत्ताक कुटुंब; कुटुंबाची प्रकार्ये – अ) प्राथमिक कार्ये – 1) जैविक कार्ये 2) सामाजीकरण 3) मानसशास्त्रीय ब) दुय्यम कार्ये –
1) सामाजिक कार्ये 2) आर्थिक कार्ये ब) विवाहसंस्था – अर्थ; विवाहाचे उद्देश – लैंगिक गरजांची पूर्ती, प्रजनन व मुलांचे संगोपन, आर्थिक सहकार्य; विवाहाची वैशिष्ट्ये – संघस्वरूपता, समाजमान्यता, स्थायीत्व, समारंभ, अधिकार व कर्तव्य; विवाहाचे उत्पत्ती सिद्धांत – 1) विकासवादी सिद्धांत – रक्तसंबंधीत कुटुंबाची अवस्था, समूह कुटुंब अवस्था, सिन्डेस्मियन कुटुंब, पितृसत्ताक कुटुंब, एकविवाही कुटुंब 2) बॅशोफेनचा सिद्धांत 3) वेस्टरमार्कचा सिद्धांत; विवाहाचे प्रकार – अ) एकविवाह ब) बहुविवाह; विवाहसंस्थेचे बदलते स्वरूप – विवाह वयात वाढ, विवाह पद्धतीतील परिवर्तन, विवाह नियमात परिवर्तन, वैवाहिक जोडीदार निवडण्याच्या पद्धतीत परिवर्तन, विधवा विवाहास मान्यता, घटस्फोटास मान्यता
9. सामाजिक संस्था :
अ) राज्यसंस्था – व्याख्या; राज्यसंस्थेचे घटक – 1) लोकसंख्या 2) भूप्रदेश 3) सरकार/शासन 4) सार्वभौमत्व 5) अधिसत्ता; राज्यसंस्थेची उत्पत्ती –
1) दैवी सिद्धांत 2) सामाजिक करार सिद्धांत 3) ऐतिहासिक किंवा विकासवादी सिद्धांत; प्रभुत्वाची संकल्पना ब) धर्मसंस्था – व्याख्या; धर्माची वैशिष्ट्ये – अलौकीक शक्ती, श्रद्धा व विधी, सार्वत्रिकता, पवित्र, अपवित्र, प्रतिके किंवा चिन्हे, ईश्वरशास्त्र; धर्माची प्रकार्ये – व्यक्ती वर्तनाचे आदर्श, मानसिक शांती, सामाजिक ऐक्य व संघटन, धार्मिक वारशाचे संक्रमण, सामाजिक नियंत्रण, साहित्यकला समाजकार्य यांचा विकास, आर्थिक वर्तनास दिशा मिळते; धर्माची उत्पत्ती – चेतनवाद, निसर्गवाद, आत्मावादी सिद्धांत, प्रकार्यवादी सिद्धांत, सामाजिक सिद्धांत, जादू क्रिया
10. सामाजिक चळवळी :
सामाजिक चळवळ – अर्थ, व्याख्या; सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये – सामुहिक प्रयत्न, परिवर्तन आणणे किंवा परिवर्तनास विरोध करणे, संघटितता किंवा असंघटितता, शांततापूर्ण वा हिंसात्मक पद्धती, अनिश्चित कालावधी; सामाजिक चळवळीचे दृष्टीकोन – 1) मार्क्सवादी दृष्टीकोन 2) संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टीकोन 3) मॅक्स वेबरचा दृष्टीकोन; सामाजिक चळवळीचे उत्पत्तीचे सिद्धांत – 1) व्यक्तीमत्व आणि लोकसमाज सिद्धांत
2) सापेक्ष वंचितता सिद्धांत 3) संसाधनाची जुळवाजुळव सिद्धांत 4) राजकीय प्रक्रिया सिद्धांत; सामाजिक चळवळीची कारणे – सामाजिक मुल्य संघर्ष, सामाजिक विसंघटन, सामाजिक अन्याय; सामाजिक चळवळीचे प्रकार – विरोधी चळवळ, प्रतिगामी चळवळ, धार्मिक चळवळ, सामुदायिक चळवळी, व्यक्तीगत संप्रदाय
11. सामाजिक स्तरीकरण आणि परिवर्तन :
अ) सामाजिक स्तरीकरण – व्याख्या; सामाजिक स्तरीकरणाचे आधारभूत घटक – जन्म, लिंग, वय, शारीरिक क्षमता, शिक्षण, जातीव्यवस्था, वंश, धर्म, राजसत्ता, आर्थिक आधार; सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार – 1) बंद स्तरीकरण व्यवस्था – इस्टेट, गुलामगिरी, जातीव्यवस्था; जातीची वैशिष्ट्ये – खंडात्मक विभाजन, श्रेणीबद्ध रचना, सभासदत्व, खानपान व सामाजिक व्यवहारांवर कडक निर्बंध, जाती अंंतर्विवाह, व्यवसाय निर्बंध, जाती पंचायत, धार्मिक आधार 2) मुक्त स्तरीकरण व्यवस्थेचा प्रकार वर्ग व्यवस्था – व्याख्या; वर्गाची वैशिष्ट्ये – सोपान परंपरा, अर्जित दर्जाला महत्व, सामाजिक गतीशिलता, वर्ग जाणिव, कुटुंब एकक, जीवनशैली, सापेक्ष स्थैर्य, सामाजिक स्तरीकरणाची प्रकार्ये व अप्रकार्ये; स्तरीकरणाची प्रकार्ये – योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तींची निवड, उच्च दर्जा प्राप्त करण्यासाठी स्पर्धा, सामाजिक गतीशिलता, तणावांवर नियंत्रण, एकतेची भावना, सामाजिक नियंत्रण; सामाजिक स्तरीकरणाची अप्रकार्ये – व्यक्ती विकासाला मारक, कर्तृत्वशुन्य लोकांना महत्व, संपत्तीचे केंद्रीकरण; सामाजिक स्तरीकरणाचे महत्व, सामाजिक परिवर्तन – व्याख्या, सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये; सामाजिक परिवर्तनाचे प्रकार – 1) उत्क्रांती 2) प्रगती 3) क्रांती 4) विकास; सामाजिक परिवर्तनाची कारणे किंवा घटक – भौगोलिक घटक, लोकसंख्यात्मक घटक, तांत्रिक बदल, आर्थिक घटक, सांस्कृतिक व सामाजिक घटक
12. स्त्री सक्षमीकरण काळाची गरज :
प्रस्तावनाः, महिला सक्षमीकरणाची गरज/आवश्यकता, स्त्री सक्षमीकरणाचे बदलते पैलू – 1.वैदिक काळातील स्त्री सक्षमीकरण 2. बौद्ध काळातील स्त्री सक्षमीकरण 3. मध्ययुगातील महिला सक्षमीकरण 4. ब्रिटीश काळातील स्त्री सक्षमीकरण 5. स्वातंत्र्यप्राप्ती काळातील सक्षमीकरण. 21 वे शतक व महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरणास उत्तरदायी घटक – 1. सामाजिक सक्षमीकरण 2. आर्थिक सक्षमीकरण 3. शैक्षणिक सक्षमीकरण 4. राजकीय सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण व कायद्यांची अंमलबजावणी.